मुख्य मजकुरावर जा

The Excellency and Glory of Christ बद्दल बायबलमधील वचने

33 वचने · 40 पैलू

"The Excellency and Glory of Christ" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. उज्जीयाह राजा मरण पावला त्या वर्षी, मी प्रभूला सिंहासनावर बसलेले उच्चतम आणि गौरवी असे पाहिले; आणि त्यांच्या अंगरख्याच्या घोळाने मंदिर भरून गेले होते.

  2. त्यांच्या वरच्या बाजूला सराफीम होते, प्रत्येकाला सहा पंख होते: दोन पंखांनी त्यांनी स्वतःचे मुख झाकले होते, दोन पंखांनी पाय झाकले होते आणि दोन पंखांनी ते उडत होते.

  3. आणि ते एकमेकांना म्हणत होते: “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वसमर्थ याहवेह आहेत; त्याच्या तेजाने सर्व पृथ्वी भरली आहे!”

  4. त्यांच्या आवाजाने मंदिराच्या दाराच्या चौकटी व उंबरठा हादरला व सर्व मंदिर धुराने भरले.

  5. “मला धिक्कार असो!” मी ओरडलो. “मी उद्ध्वस्त झालो! कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतो आणि माझ्या डोळ्यांनी महाराज सर्वसमर्थ याहवेह यांचे मुखावलोकन केले आहे!”

  6. एदोमाहून व बस्रा शहराहून, किरमिजी रंगाने रंगविलेली वस्त्रे घालून, वैभवी वस्त्रे परिधान करून त्यांच्या महान सामर्थ्याने वेगाने पावले पुढे टाकत येणारे हे कोण आहेत? “विजयाची घोषणा करीत, तारण करण्यास समर्थ असलेला, हा मी आहे.”

  7. तुमची वस्त्रे द्राक्षकुंडात तुडविणार्‍यांसारखी लाल रंगाची का आहेत?

  8. “द्राक्षकुंड मी एकट्यानेच तुडविले; राष्ट्रातून माझ्यासोबत कोणी नव्हते. माझ्या क्रोधाने मी ती तुडविली आणि त्यांना आपल्या संतापाने चिरडले; त्यांचेच रक्त माझ्या वस्त्रांवर उडाले, म्हणून माझी सर्व वस्त्रे माखली.

  9. प्रारंभी शब्द होता आणि शब्द परमेश्वरा समवेत होता आणि शब्द परमेश्वर होता.

  10. तोच प्रारंभीपासून परमेश्वराबरोबर होता.

  11. शब्दाद्वारे सर्वगोष्टी निर्माण झाल्या आणि जे काही निर्माण झाले ते त्यांच्याशिवाय निर्माण झाले नाही.

  12. त्यांच्यामध्ये जीवन होते आणि तेच जीवन संपूर्ण मनुष्यजातीला प्रकाश देत होते.

  13. तो प्रकाश अंधारात उजळत होता आणि अंधाराने त्या प्रकाशाला ओळखले नाही.

  14. ते असेही म्हणाले, “हे प्रभू, प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला, आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत.

  15. ती नष्ट होतील, परंतु तुम्ही निरंतर राहाल; ती सर्व जुन्या वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील.

  16. तुम्ही ती वस्त्राप्रमाणे गुंडाळणार; आणि वस्त्राप्रमाणे ते बदलतील. परंतु तुम्ही निरंतर समान राहणार, आणि तुमची वर्षे कधीही संपुष्टात येणार नाहीत.”

  17. असे महायाजक खरोखर आपल्या गरजा भागविण्यास समर्थ आहेत—ते पवित्र, निर्दोष, शुद्ध, आणि पापी माणसांपासून वेगळे केलेले, स्वर्गाहून अधिक उंच केलेले आहेत.

  18. त्यांना त्या महायाजकांप्रमाणे प्रथम स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी दिवसेंदिवस यज्ञ करण्याची गरज नाही; कारण त्यांनी त्यांच्या पापासाठी एकदाच यज्ञ करून स्वतःला अर्पण केले.

  19. नियमशास्त्र दुर्बलतेने भरलेल्या माणसांना महायाजक नेमते; पण नियमशास्त्रानंतर आलेली शपथ ती जो युगानुयुग परिपूर्ण आहे त्या पुत्राला नेमते.

  20. चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य आणि आगमन यासंबंधाने कळविले होते असे नाही, परंतु आम्ही त्यांच्या वैभवाचे साक्षी आहोत.

  21. त्यांना परमेश्वरपित्याकडून सन्मान आणि गौरव मिळाले, तेव्हा सर्वोच्च गौरवी परमेश्वराकडून अशी वाणी झाली, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”

  22. आम्ही त्यांच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून झालेली वाणी आम्ही स्वतः ऐकली आहे.

  23. कोकर्‍याने ती गुंडाळी घेतली, तेव्हा त्या चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजनांनी कोकर्‍याच्या पुढे दंडवत केले. त्या प्रत्येकाजवळ एकएक वीणा आणि धूपद्रव्याने भरलेले सोन्याचे धूपपात्र होते. यातील धूप म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना आहेत.

  24. ते नवे गीत गाऊ लागले. गीताचे शब्द असे: “ती गुंडाळी घ्यावयास व त्याचे शिक्के फोडून तो उघडण्यास तुम्ही पात्र आहात, कारण तुमचा वध करण्यात आला होता आणि तुम्ही आपल्या रक्ताने परमेश्वरासाठी प्रत्येक वंश, भाषा, लोक व राष्ट्रे विकत घेतले आहे,

  25. तुम्ही त्या सर्वांना एक राज्य आणि आमच्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी याजक केले आहे; ते पृथ्वीवर राज्य करतील.”