The Apostles बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
आता मी तुम्हाला अंधारात सांगत आहे, ते दिवसाच्या प्रकाशात सांगा; जे मी तुमच्या कानात सांगत आहे, ते घराच्या धाब्यावरून जाहीर करा.
जे तुमच्या शरीराचा वध करू शकतात, परंतु आत्म्याचा नाश करू शकत नाहीत, अशांना भिऊ नका. तर तुमचा आत्मा आणि शरीर या दोहोंचा नरकामध्ये जे नाश करू शकतात, त्या परमेश्वराचे मात्र भय धरा.
दोन चिमण्या एका पैशात विकत नाहीत काय? तरी त्यापैकी एकही चिमणी तुमच्या पित्याच्या इच्छेविना जमिनीवर पडणार नाही.
आणि तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत.
म्हणून भीती बाळगू नका, कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात.
“जो कोणी मला इतरांपुढे जाहीरपणे स्वीकारेल, तर मीही त्याचा माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे स्वीकार करेन.
जे मला लोकांसमोर नाकारतात, मीही त्यांना माझ्या स्वर्गीय पित्यासमोर जाहीरपणे नाकारेन.
“जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या आईवडीलांवर अधिक प्रेम करीत असेल, तर तो मला पात्र नाही; जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या पुत्र व कन्यांवर अधिक प्रेम करीत असेल, तर ते मला पात्र नाही.
जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, तो मला पात्र नाही.
कारण जो कोणी आपला जीव मिळवितो तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल.
मग ते कफर्णहूमात आले. घरात गेल्यानंतर येशूने त्यांना विचारले, “तुम्ही रस्त्यात कशाविषयी चर्चा करीत होता?”
परंतु शिष्य शांत राहिले कारण मार्गावर असताना आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण यासंबंधी शिष्यांचा वादविवाद सुरू झाला होता.
ते खाली बसले, त्यांनी आपल्या बारा शिष्यांना बोलाविले आणि म्हणाले, “तुमच्यामध्ये जो कोणी प्रथम होऊ पाहतो, त्याने सर्वात शेवटचा, आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”
मग त्यांनी एका लहान लेकराला त्यांच्यामध्ये ठेवले. मग त्या लेकराला कवेत उचलून घेत त्यांना म्हणाले,
“जो कोणी माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो माझा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याचा स्वीकार करतो.”
नंतर शिष्यात आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण असा वादविवाद सुरू झाला.
येशू त्यांना म्हणाले, “गैरयहूदी लोकांचे राजे त्यांच्यावर हुकमत चालवितात आणि त्यांच्यावर अधिकार गाजविणारे स्वतःला त्यांचे उपकारकर्ते म्हणतात.
परंतु तुम्ही त्यांच्यासारखे असू नये. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने लहानासारखे झाले पाहिजे आणि जो अधिकार चालवितो त्याने तुमचा सेवक असावे.
श्रेष्ठ कोण आहे, जो भोजन करतो, की जो सेवा करतो? अर्थात् जो बसून जेवतो तोच ना? पाहा, सेवा करणार्यासारखा मी तुम्हामध्ये आहे.
माझ्या परीक्षामध्ये माझ्या बाजूने जे उभे राहिले, ते तुम्हीच आहात.
मी तुम्हाला राज्य बहाल करतो, ज्याप्रमाणे माझ्या पित्याने मला एक राज्य बहाल केले आहे,
तसेच माझ्या राज्यामध्ये माझ्याबरोबर बसून खातापिता येईल आणि तुम्ही सिंहासनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्यायनिवाडा कराल.
तेव्हा त्याच घटकेस ते उठून यरुशलेमास माघारी गेले, तिथे येशूंचे अकरा शिष्य आणि इतर अनुयायी एकत्र जमले आहेत, असे त्यांनी पाहिले.
जमलेले लोक म्हणत होते, “प्रभू खरोखर उठले आहे व त्यांनी शिमोनाला दर्शन दिले आहे.”
तेव्हा त्या दोघांनी सांगितले की, ते रस्त्याने असताना काय घडले होते आणि येशूंनी भाकर मोडली तेव्हा त्यांनी त्यांना कसे ओळखले.