मुख्य मजकुरावर जा

The Apostles बद्दल बायबलमधील वचने: Witnesses of the resurrection and ascension of Christ

17 वचने · 26 पैलू

Witnesses of the resurrection and ascension of Christ बद्दल वचने

  1. तेव्हा त्याच घटकेस ते उठून यरुशलेमास माघारी गेले, तिथे येशूंचे अकरा शिष्य आणि इतर अनुयायी एकत्र जमले आहेत, असे त्यांनी पाहिले.

  2. जमलेले लोक म्हणत होते, “प्रभू खरोखर उठले आहे व त्यांनी शिमोनाला दर्शन दिले आहे.”

  3. तेव्हा त्या दोघांनी सांगितले की, ते रस्त्याने असताना काय घडले होते आणि येशूंनी भाकर मोडली तेव्हा त्यांनी त्यांना कसे ओळखले.

  4. ते हे सर्व सांगत असतानाच, प्रत्यक्ष येशू स्वतः अकस्मात त्यांच्यामध्ये उभे राहिले आणि म्हणाले, “तुम्हाला शांती असो.”

  5. आपण एखादा दुष्टात्मा पाहत आहोत असे वाटून, ते सर्व विलक्षण भयभीत झाले.

  6. येशूंनी त्यांना विचारले, “तुम्ही का घाबरला आणि तुमच्या मनात संशय का आला?

  7. माझे हात व माझे पाय पाहा. मी तोच आहे. भुतांना मांस व हाडे नसतात, पण मला ती आहेत हे तुम्ही पाहत आहात.”

  8. हे बोलल्यावर येशूंनी आपले हात व पाय त्यांना दाखविले.

  9. त्यावेळी त्यांची हृदये आनंदाने भरली, पण त्याबरोबरच त्यांच्या मनात संशयही दाटला होता. तेव्हा येशूंनी त्यांना विचारले, “तुमच्याजवळ येथे खावयास काही आहे काय?”

  10. त्यांच्या निवडलेल्या प्रेषितांना पवित्र आत्म्याद्वारे आज्ञा केल्यानंतर येशू वर स्वर्गात घेतले गेले, त्या दिवसापर्यंत घडलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत.

  11. त्यांचे क्लेश संपल्यानंतर, त्यांनी आपण जिवंत आहोत हे पुष्कळ खात्रीलायक पुराव्यांनी सिद्ध केले. चाळीस दिवसांच्या काळात ते स्वतः त्यांना प्रकट झाले आणि परमेश्वराच्या राज्यासंबंधी बोलले.

  12. अशाच एका प्रसंगी, ते त्यांच्याबरोबर भोजन करीत असताना, त्यांनी आज्ञा केली: “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर माझ्या पित्याने अभिवचन दिलेल्या ज्या देणगीबद्दल तुम्ही मला बोलताना ऐकले होते, त्याची वाट पाहा.

  13. कारण योहान पाण्याने बाप्तिस्मा करीत होता, परंतु थोड्या दिवसातच तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने केला जाईल.”

  14. मग ते त्यांच्याभोवती गोळा झाले आणि त्यांनी विचारले, “हे प्रभू, यावेळी आपण इस्राएलच्या राज्याची पुनर्स्थापना करणार आहात काय?”

  15. ते त्यांना म्हणाले, “पित्याने वेळ व तारीख आपल्या अधिकाराने निश्चित केली आहे आणि त्याबद्दल तुम्हाला जाणून घेण्याची गरज नाही.

  16. परंतु जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरुशलेममध्ये आणि सर्व यहूदीयात आणि शोमरोनात आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत माझे साक्षीदार व्हाल.”

  17. असे म्हटल्यानंतर ते त्यांच्या नजरेसमोर वर घेतले गेले आणि ढगांनी त्यांना त्यांच्या दृष्टिआड केले.