Skip to content

Spices बद्दल बायबलमधील वचने

15 वचने · 9 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. मग ते भोजन करण्यास बसले असता त्यांना दूर अंतरावरून उंटांचा एक काफिला त्यांच्याकडे येताना दिसला. ते इश्माएली व्यापारी असून गिलआदहून इजिप्तला डिंक, मसाले व गंधरस घेऊन चालले होते.

  2. नंतर त्यांचे वडील इस्राएल त्यांना म्हणाले, “जर असेच असेल तर मग हे करा: या देशात उत्पादन होणारे सर्वोत्तम पदार्थ—थोडे औषधी बलसान, थोडे मध, मसाले, गंधरस, पिस्ते व बदाम आपल्या गोण्यात घ्या आणि या वस्तू त्या मनुष्याला देणगी म्हणून घेऊन जा.

  3. दिव्यासाठी जैतुनाचे तेल; अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप यासाठी सुवासिक मसाले;

  4. दिव्यासाठी जैतुनाचे तेल; अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप यासाठी सुवासिक मसाले;

  5. मोठा तांडा घेऊन; उंटांबरोबर सुगंधी द्रव्ये, पुष्कळ सोने आणि मौल्यवान रत्ने घेऊन ती यरुशलेमास आली; शलोमोनकडे येऊन जे काही तिच्या मनात होते त्याविषयी ती त्याच्याशी बोलली.

  6. आणि तिने राजाला एकशेवीस तालांत सोने, पुष्कळ सुगंधी द्रव्ये व मौल्यवान रत्ने दिली. शबाच्या राणीने शलोमोन राजाला इतकी सुगंधी द्रव्ये आणली की त्यानंतर तेवढी द्रव्ये परत कोणी आणली नाहीत.

  7. हिज्कीयाहने राजदूतांचे स्वागत केले आणि त्याच्या भांडारांमध्ये काय आहे ते सर्व दाखविले—चांदी, सोने, मसाले, आणि उत्तम जैतुनाचे तेल—त्याचे संपूर्ण शस्त्रागार आणि त्याच्या खजिन्यामध्ये असलेली सर्व संपत्ती. त्याच्या राजवाड्यात किंवा त्याच्या संपूर्ण राज्यात हिज्कीयाहने त्यांना दाखविले नाही असे काहीही नव्हते.

  8. त्यांच्यापैकी काहीजणांकडे सामानसुमान, पवित्रस्थानातील सर्व पात्रे, सपीठ, द्राक्षारस, तेल, ऊद व सुगंधी द्रव्ये यांची व्यवस्था असे.

  9. त्यांनी त्याला दावीदाच्या नगरात, त्याने स्वतःसाठी तयार केलेल्या कबरेत पुरले. त्यांनी त्याला मसाले आणि विविध मिश्रित अत्तरांनी झाकलेल्या शवपेटीत ठेवले आणि त्याच्या सन्मानार्थ प्रचंड अग्नी पेटविला.

  10. “ ‘शबा आणि रामाहच्या व्यापारांनी तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला सर्वप्रकारचे उत्तम मसाले, मोलवान रत्ने व सोने दिले.

  11. शब्बाथ संपल्यानंतर मरीया मग्दालिया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी जाऊन येशूंच्या शरीराला अभिषेक करावा म्हणून सुगंधी मसाले विकत आणले.

  12. नंतर त्या घरी गेल्या आणि त्यांनी मसाले आणि सुगंधी द्रव्ये तयार केली. परंतु यहूदी नियमशास्त्राच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी शब्बाथाच्या दिवशी विसावा घेतला.

  13. आठवड्याच्या पहिल्या दिवशी, भल्या पहाटेस, त्या स्त्रियांनी त्यांनी तयार केलेले मसाले घेतले आणि त्या कबरेकडे गेल्या;

  14. जो येशूंकडे रात्री आलेला होता, तो निकदेमही त्याच्याबरोबर होता व त्याने आपल्याबरोबर गंधरस व अगरू यांचे सुमारे चौतीस कि.ग्रॅ. मिश्रण आणले होते.

  15. येशूंचे शरीर घेऊन त्या दोघांनी ते सुगंधी द्रव्यासह तागाच्या वस्त्राने गुंडाळले. हे यहूद्यांच्या उत्तरक्रियेच्या रीतीप्रमाणे होते.