मुख्य मजकुरावर जा

Sin Offering बद्दल बायबलमधील वचने: Fat of the inside, kidneys, burned on the altar of burnt offering

7 वचने · 25 पैलू

Fat of the inside, kidneys, burned on the altar of burnt offering बद्दल वचने

  1. नंतर पापार्पणाच्या गोर्‍ह्याची सर्व चरबी, म्हणजे आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी,

  2. दोन गुरदे व त्यावरील कंबरेजवळची चरबी व काळीज काढून त्यांचे वेदीवर होमार्पण करावे.

  3. शांत्यर्पणाच्या यज्ञात जसे गोर्‍ह्याचे भाग काढून घेतात तसे ते वेगळे काढून याजकाने त्यांचे होमवेदीवर होम करावे.

  4. त्याने त्यावरील सर्व चरबी काढावी आणि तिचे वेदीवर होम करावे.

  5. शांत्यर्पणाच्या अर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे या सर्व चरबीचा वेदीवर होम करावा. अशाप्रकारे पुढार्‍याच्या पापाबद्दल, याजक प्रायश्चित करेल आणि त्याची क्षमा होईल.

  6. मग सर्व चरबी काढून शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे याजकाने तिचा याहवेहसाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा. अशाप्रकारे याजकाने त्या व्यक्तीसाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.

  7. याहवेहनी मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनाने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा यांचा वेदीवर होम केला.