Skip to content

Sabbatic Year बद्दल बायबलमधील वचने

45 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु तुमच्या दासाची तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रीती असेल आणि त्याला तुमच्या घरी राहण्यात आनंद वाटत असेल आणि तो तुम्हाला म्हणेल की “तुम्हाला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही,”

  2. तर आरी घेऊन, त्याचा कान दरवाजावर धरून, तो आरपार टोचावा. मग तो तुमचा कायमचाच दास होईल. तुमच्या दासीचेही असेच करावे.

  3. पण जेव्हा तुम्ही तुमच्या दासदासींना दास्यातून मुक्त कराल, तेव्हा वाईट वाटून घेऊ नये; कारण लक्षात ठेवा की, सहा वर्षात एखाद्या मोलकर्‍यासाठी जितका खर्च तुम्हाला आला असता, त्याच्या निम्म्याहूनही कमी खर्चात त्यांनी तुमचे काम केले आहे आणि त्यांना मुक्त करण्यासाठी तुम्ही जे काही कराल, त्याबद्दल याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतील.

  4. मग मोशेने त्यांना आज्ञा दिली: “प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी, कर्ज माफीच्या वर्षी, मंडपांच्या उत्सवात,

  5. याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेल्या ठिकाणी जेव्हा सर्व इस्राएली लोक उपस्थित होतील, तेव्हा हे नियमशास्त्र त्यांना ऐकू जाईल असे वाचावे.

  6. लोकांना एकत्र करा—पुरुष, स्त्रिया आणि मुले आणि तुमच्या नगरात राहत असलेले परदेशी—म्हणजे ते ऐकतील आणि याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगण्यास शिकतील व या नियमशास्त्रामधील सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील.

  7. त्यांची बालके, ज्यांना हे नियमशास्त्र ठाऊक नाही, त्यांनीही यार्देन नदी ओलांडून, त्या वचनदत्त देशात, जी भूमी ताब्यात घेण्यास तुम्ही जात आहात तिथे जोपर्यंत राहाल, तोपर्यंत हे ऐकावे आणि याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगण्यास शिकावे.”

  8. सणाच्या या दिवसांच्या काळात, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एज्रा परमेश्वराच्या नियमशास्त्राचे वाचन करीत असे. सात दिवस सण साजरा केल्यानंतर आठव्या दिवशी मोशेच्या नियमशास्त्राला अनुसरून महासभा घेण्यात आली.

  9. “शेजारील देशात असणार्‍या लोकांनी विक्रीसाठी धान्य किंवा इतर उत्पन्न आणले, तर शब्बाथ दिवशी किंवा इतर पवित्र दिवशी आम्ही ते विकत घेणार नाही. दर सातव्या वर्षी शेतात कोणतेही पीक न घेण्याचे आम्ही मान्य केले आणि सर्व कर्ज प्रत्येक सातव्या वर्षी माफ करू.

  10. मग यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले:

  11. “इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर काढले, त्यांच्या गुलामगिरीतून बाहेर आणले, त्यावेळी मी त्यांच्याशी एक करार केला होता. मी म्हटले,

  12. ‘प्रत्येक सातव्या वर्षी कोणत्याही इब्री गुलामाला, ज्याने स्वतःस तुम्हाला विकले होते, त्यांना तुम्ही मुक्त केले पाहिजे. सहा वर्षे त्यांनी तुमची सेवा केल्यानंतर तुम्ही त्यांना मुक्त केले पाहिजे.’ तुमच्या पूर्वजांनी मात्र माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही.

  13. अलीकडेच तुम्ही पश्चात्ताप केला व माझ्या दृष्टीने योग्य ते केले: आपल्या लोकांची मुक्तता करण्याची घोषणा केली. आम्ही तसे करू, असे तुम्ही मला माझे नाव धारण केलेल्या मंदिरात शपथपूर्वक वचन दिले होते.

  14. परंतु आता तुम्ही मागे वळले व माझे नाव अपवित्र केले; प्रत्येकाने त्यांना हवे तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य असण्यास मुक्त केलेले दास व दासी परत घेतले. यांना परत गुलाम होण्याची बळजबरी केली.

  15. “म्हणून याहवेह असे म्हणतात: तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही; तुमच्या स्वतःच्या लोकांची मुक्तता करण्याची घोषणा करीत नाही. म्हणून मी आता तुमची ‘मुक्तता’ करेन, असे याहवेह जाहीर करतात—युद्ध, दुष्काळ व मरी यांच्याद्वारे तुम्हाला मरणाची ‘मुक्तता’ मिळेल. सर्व जगातील राज्यात मी तुम्हाला घृणास्पद असे करेन.

  16. ज्यांनी माझा करार मोडला व माझ्या करारातील अटी पूर्ण करण्याचे नाकारले आहे, त्यांना ज्याप्रमाणे वासरू कापून त्याचे दोन भाग करून त्यामधून चालत जावे, त्याचप्रमाणे मी त्यांना वागवेन.

  17. यहूदीया व यरुशलेममधील अधिपती, न्यायालयीन अधिकारी, याजक व सामान्य लोक जे दोन भाग केलेल्या वासराच्या मधून चालत गेले,

  18. मी जे तुम्हाला ठार करू पाहतात त्या तुमच्या शत्रूंच्या हवाली करेन. त्यांची प्रेते पक्षी व हिंस्र श्वापदांचे अन्न होतील.

  19. “बाबेलच्या राजाचे सैन्य या शहरातून काही काळासाठी गेले असले, तरी मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह व त्याचे अधिकारी यांना जे त्यांना ठार करू पाहतात, त्या त्यांच्या शत्रूंच्या हवाली करेन.

  20. मी हा आदेश देणार आहे, असे याहवेह जाहीर करतात, मी त्यांना या शहरात परत आणेन. ते पुन्हा या नगरांविरुद्ध लढतील, ते जिंकतील व त्यास जाळून टाकतील. यहूदीयाची सर्व शहरे मी अशी ओसाड करेन जिथे कोणीही वसती करू शकणार नाही.”