Skip to content

Rock बद्दल बायबलमधील वचने

21 वचने · 5 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. विषारी सापाचा आणि विंचवांचा धोका असलेल्या अफाट व भयानक रानातून व उष्ण आणि कोरड्या भूमीतून त्यांनी तुम्हाला आणले. शुष्क भूमीत खडक फोडून तुम्हाला पाणी दिले.

  2. तेच आमचे खडक आहेत, त्यांचे कार्य परिपूर्ण आहे. आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य असतात. विश्वासयोग्य परमेश्वर, जे कधीच चूक करीत नाही, ते न्यायी आणि सत्यनिष्ठ आहेत.

  3. याहवेहने त्याला देशातील उंचीवर स्वार केले, आणि शेतातील फळे खायला दिली. खडकातून पाझरणारा मध, आणि डोंगर कपारीतून तेलाचा पौष्टिक आहार पुरविला,

  4. याहवेहखेरीज दुसरा कोण परमेश्वर आहे? आणि आमच्या परमेश्वराशिवाय कोण खडक आहे?

  5. “याहवेह जिवंत आहे! माझ्या खडकाची स्तुती असो! माझे परमेश्वर, खडक, माझे तारणकर्ता सर्वोच्च असोत!

  6. इस्राएलचे परमेश्वर बोलले, इस्राएलच्या खडकाने मला म्हटले: ‘जेव्हा एखादा मनुष्य न्यायाने लोकांवर राज्य करतो, जेव्हा तो परमेश्वराचे भय बाळगून राज्य करतो,

  7. जेव्हा माझी वाट लोण्याने भिजली जात असे आणि खडक माझ्यासाठी जैतुनाच्या तेलाचे झरे ओतून देत असे.

  8. याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे; माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो, माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग ते माझे शरणस्थान आहेत.

  9. तुम्ही आपले कान माझ्याकडे लावा; त्वरेने येऊन मला सोडवा; माझ्या आश्रयाचे खडक व्हा, मला वाचवण्यासाठी बळकट दुर्ग व्हा.

  10. निसरड्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्यांनी मला बाहेर काढले; त्यांनी माझी पावले खडकावर ठेवली, आणि त्यांनी मला उभे राहण्यास भक्कम ठिकाण दिले.

  11. त्यांनी रानात खडक फोडले आणि समुद्राइतके भरपूर पाणी त्यांना दिले.

  12. त्यांनी खडकाळ सुळक्यातून पाण्याचे झरे काढले आणि नद्यांप्रमाणे पाण्याला वाहविले.

  13. खरे आहे, त्यांनी खडकावर मारले, आणि पाण्याचे स्त्रोत फुटले, प्रचंड प्रवाह वाहू लागले; पण काय ते आम्हाला भाकरदेखील देऊ शकतात? काय ते आपल्या लोकांना मांस पुरवतील?”

  14. तुम्ही तुमचे तारणकर्ते परमेश्वरांना विसरले आहात; तुम्ही तुमचा दुर्ग, तुमच्या खडकाची आठवण केली नाही. जरी तुम्ही अत्युत्तम झाडांची लागवड केली आहे, आणि विदेशी द्राक्षवेलींची लागवड केली आहे,

  15. प्रत्येकजण वाऱ्यापासून आश्रयस्थान आणि वादळापासून आश्रयस्थान, वाळवंटामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रवाहासारखा आणि तहानलेल्या भूमीमध्ये मोठ्या खडकाच्या सावलीसारखा असेल.

  16. तुम्ही दहशतीस दिलेले प्रोत्साहन आणि तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे, तुम्ही जे खडकांच्या कपारीत राहता, तुम्ही ज्यांनी डोंगरावरील उच्च स्थाने व्यापली आहेत. जरी तुम्ही तुमची घरटी गरुडांच्या घरट्यांप्रमाणे उंच बांधली आहेत, तरी तिथून मी तुला खाली आणेन. असे याहवेह जाहीर करतात.

  17. तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे, तुम्ही जे खडकांच्या कपारीत राहता आणि तुमचे घर उंचावर बांधता, तुम्ही जे स्वतःला म्हणता, ‘मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल?’

  18. “यास्तव माझी शिकवण ऐकणारे व त्याप्रमाणे वागणारे सर्वजण एका शहाण्या मनुष्यासारखे आहेत. त्याने आपले घर खडकावर बांधले.

  19. पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता.

  20. आणि मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी माझी मंडळी उभारेन; तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचा विजय होणार नाही.

  21. And did all drink the same spiritual drink: for they drank of that spiritual Rock that followed them: and that Rock was Christ.