Skip to content

Ring बद्दल बायबलमधील वचने: Given as a token

11 वचने · 5 पैलू

Given as a token बद्दल वचने

  1. तेव्हा राजाने आपल्या बोटातील मुद्रा काढून ती यहूद्यांचा शत्रू, अगागी लोकातील हम्मदाथाचा पुत्र हामानाच्या स्वाधीन केली.

  2. नंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या चिटणीसांना हजर राहण्याचा हुकूम करण्यात आला. त्यांनी साम्राज्यातील प्रत्येक प्रांतात व सर्व भाषेतून निरनिराळ्या राज्यपालांना आणि अधिकार्‍यांना हामानाच्या राजाज्ञेचा मजकूर लिहून घेतला. जी पत्रे लिहिलेली होती त्यांच्यावर अहश्वेरोश राजाच्या नावाने राजमुद्रेची मोहर लावण्यात आली.

  3. तेव्हा राजाने हामानापासून परत घेतलेली आपली मुद्रा मर्दखयाला दिली. व एस्तेरने त्याला हामानाच्या मालमत्तेचा कारभारी नेमले.

  4. आता पुन्हा एकदा एस्तेर राजाच्या पायांवर पडून व अश्रू ढाळून तिने राजाजवळ विनवणी केली. यहूद्यांच्या विरुद्ध अगागी हामानाने केलेली दुष्ट योजना स्थगित करावी, अशी तिची मागणी होती.

  5. राजाने पुन्हा आपली सोनेरी राजदंड एस्तेरपुढे धरला, तेव्हा ती उठली आणि त्याच्यासमोर उभी राहिली.

  6. ती म्हणाली, “महाराज, आपल्या मर्जीस येत असेल व मजवर आपली कृपादृष्टी असेल, व ते योग्य वाटत असेल, आणि आपण मजवर प्रसन्न असाल तर, सर्व प्रांतांतील यहूद्यांचा नायनाट करण्याविषयीचा अगागी हम्मदाथाचा पुत्र हामानाचा हुकूम रद्द करणारे फर्मान काढून ते सर्वत्र पाठविण्यात यावे.

  7. कारण माझ्या लोकांची कत्तल आणि नायनाट झालेला पाहणे, मला कसे सहन होईल? माझ्या कुटुंबाचा नाश पाहणे मी कसे सहन करेन?”

  8. मग अहश्वेरोश राजा एस्तेर राणीला आणि यहूदी मर्दखयाला म्हणाला, “कारण हामानाने यहूद्यांवर हल्ला केला, म्हणून मी हामानाची संपत्ती एस्तेरला दिली आहे आणि त्याला त्यानेच उभ्या केलेल्या फासावर लटकावले.

  9. आता तुम्ही राजाच्या नावाने यहूद्यांच्या वतीने तुम्हाला योग्य वाटेल तशी दुसरी राजाज्ञा लिहा आणि त्यावर राजाची मोहोर लावा—कारण राजाच्या नावाने लिहिलेले व राजाची मोहोर लावलेले पत्र कधीही रद्द होत नाही.”

  10. तेव्हा ताबडतोब राजाच्या चिटणीसांना बोलाविण्यात आले—तो तिसऱ्या, म्हणजे सिवान महिन्याचा, तेविसावा दिवस होता. त्यांनी मर्दखयाने भारतापासून कूशपर्यंतच्या 127 प्रांतातील यहूद्यांना, प्रांतप्रमुखांना, राज्यपालांना, व प्रतिष्ठितांना पाठविण्यासाठी फर्मान लिहून घेतले. राज्यातील विविध लोकांच्या विविध भाषांमधून व लिप्यांमधून, तसेच यहूद्यास त्यांच्या भाषेत व लिपीत ते फर्मान लिहिण्यात आले. मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या नावाने पत्र लिहून, ते बंद करून त्यावर राजाच्या मुद्रेची मोहोर लावली. मग ती पत्रे राजाच्या निरोपासाठी वापरले जाणारे खास वाढविलेले वेगवान घोडे, यांच्या स्वारांबरोबर पाठविली.

  11. And he wrote in the king Ahasuerus' name, and sealed it with the king's ring, and sent letters by posts on horseback, and riders on mules, camels, and young dromedaries: