Skip to content

Perseverance बद्दल बायबलमधील वचने

159 वचने · 26 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह व त्यांच्या सामर्थ्याकडे पाहा; सतत त्यांचे मुख शोधा.

  2. तरीही, नीतिमान आपल्या मार्गात स्थिर राहतील, आणि शुद्ध हृदयाचे लोक अधिक बलवान होत जातील.

  3. जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही, कारण याहवेह त्याला आपल्या हाताने सावरतील.

  4. कारण याहवेहस न्यायी प्रिय आहे; ते आपल्या विश्वासू भक्तांचा कधीही त्याग करणार नाही. दुष्टपणा करणारे लोक मात्र पूर्णपणे नाश पावतील, दुष्टांची संतती नष्ट होऊन जाईल.

  5. तुमची सल्लामसलत माझे मार्गदर्शन करेल, आणि त्यानंतर गौरवात तुम्ही माझा स्वीकार कराल.

  6. याहवेह माझे निर्दोषत्व सिद्ध करतील; परमेश्वरा, तुमची करुणा सनातन आहे— आपल्या हस्तकृतीचा त्याग करू नका.

  7. नीतिमान मनुष्याचा मार्ग सकाळच्या सूर्याप्रमाणे आहे, दुपारपर्यंत अधिकच तेजस्वी होणाऱ्या प्रकाशाप्रमाणे तो आहे.

  8. मी त्यांच्याबरोबर अनंतकाळचा करार करेन: मी त्यांचे कल्याण करणे कधीही थांबविणार नाही, त्यांना माझे भय धरण्यास प्रोत्साहित करेन, जेणेकरून ते माझ्यापासून कधीही विमुख होणार नाहीत.

  9. पण तू आपल्या परमेश्वराकडे परत आलेच पाहिजे; प्रीती आणि न्यायाचे पालन कर आणि सतत आपल्या परमेश्वराची प्रतीक्षा कर.

  10. माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील. परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहतील, त्याचे मात्र तारण होईल.

  11. परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील त्याचे मात्र तारण होईल.

  12. “ऐका! एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला.

  13. तो बी पेरीत असताना, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी खाऊन टाकले.

  14. काही बी खडकाळ जमिनीवर पडले, तिथे पुरेशी माती नव्हती व माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले.

  15. परंतु सूर्य उगवल्यावर, ती रोपे करपून गेली आणि मूळ नसल्यामुळे वाळून गेली.

  16. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले, ते उगवले खरे पण काटेरी झुडूपांनी त्याची वाढ खुंटविली व त्याला पीक आले नाही.

  17. पण काही बी सुपीक जमिनीत पडले. ते उगवले, त्याची वाढ झाली आणि त्या काही ठिकाणी तीसपट, साठपट किंवा शंभरपट पीक आले.”

  18. पण वचनामुळे संकटे आली किंवा त्यांचा छळ होऊ लागला की ते लगेच मागे जातात. पण त्यांना मूळ नसल्यामुळे थोडा काळ टिकतात.

  19. माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील, त्याचे मात्र तारण होईल.

  20. परंतु वास्तविक, केवळ एकाच गोष्टीची गरज आहे. मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”

  21. “शिमोना, शिमोना, तुम्हा सर्वांची गव्हासारखी चाळणी करावी म्हणून सैतानाने विचारले आहे.

  22. परंतु शिमोना, तुझा विश्वास डळमळू नये म्हणून मी प्रार्थना केली आहे, की तू आपल्या विश्वासात खचू नये. ज्यावेळी तू परत वळशील, त्यावेळी आपल्या बंधूंना बळकट कर.”

  23. जे सर्वजण पिता मला देतात, ते माझ्याकडे येतील आणि जे माझ्याकडे येतील त्यांना मी कधीच घालवून देणार नाही.

  24. आणि ज्यांनी मला पाठविले त्यांची इच्छा हीच आहे की त्यांनी जे मला दिलेले आहेत, त्यातील एकालाही मी हरवू नये, तर त्यांना शेवटच्या दिवशी मरणातून उठवावे.

  25. कारण माझ्या पित्याची इच्छा ही आहे की जे प्रत्येकजण पुत्राकडे पाहतात व त्याजवर विश्वास ठेवतात, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि मी शेवटच्या दिवशी त्यांना उठवेन.”