Skip to content

Perfection बद्दल बायबलमधील वचने: Unclassified scriptures relating to

67 वचने · 19 पैलू

Unclassified scriptures relating to बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे. माझ्यापुढे विश्वासयोग्य आणि निर्दोष राहा.

  2. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळण्याची तुम्ही खबरदारी घ्या; उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका.

  3. तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे निर्दोषपणे चालावे.

  4. “अत्यंत बलवान व्हा; मोशेच्या नियमशास्त्रात जे सर्व लिहिले आहे, त्याचे काळजीपूर्वक पालन करा, त्याच्या उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका.

  5. आणि आज आहे त्याप्रमाणे तुम्ही याहवेहच्या विधीनुसार राहावे व त्यांच्या आज्ञा पाळाव्या म्हणून तुमची मने याहवेह आमच्या परमेश्वराशी पूर्णपणे समर्पित असावी.”

  6. “आणि तू, माझ्या पुत्रा शलोमोना, आपल्या पित्याच्या परमेश्वराचा अंगीकार कर, त्यांची सेवा पूर्ण अंतःकरणाने व स्वखुशीने कर, कारण याहवेह प्रत्येकाचे अंतःकरण पाहतात आणि त्यातील प्रत्येक इच्छा व विचार त्यांना कळतो. जर तू त्यांना शोधशील, तर ते तुला सापडतील; पण जर तू त्यांचा त्याग करशील, तर ते तुझा कायमचा त्याग करतील.

  7. माझा पुत्र शलोमोनाने एकचित्त हृदयाने तुमच्या सर्व आज्ञा, आदेश व नियम पाळावे, व हे भव्यदिव्य बांधकाम पूर्ण करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करावा, ज्याच्यासाठी मी संपूर्ण तयारी करून ठेवली आहे.”

  8. “जेव्हा ते तुमच्याविरुद्ध पाप करतील; कारण पाप करीत नाही असा कोणीही मनुष्य नाही आणि त्यामुळे रागावून तुम्ही त्यांना त्यांच्या शत्रूच्या हाती दिले, आणि त्यांनी त्यांना गुलाम म्हणून जवळच्या किंवा दूरच्या देशात कैद करून नेले;

  9. मी जरी निर्दोष असलो, तरी माझे मुख माझा निषेध करेल; मी दोषरहित असतो, तरी माझे मुख मलाच दोषी ठरवेल.

  10. “मी जरी निर्दोष असलो, मला स्वतःबद्दल चिंता नाही; मी स्वतः माझे जीवन तुच्छ मानतो.

  11. परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात, आणि माझे मार्ग सरळ ठेवतात.

  12. परमेश्वराचे नियम त्याच्या अंतःकरणात असतात; त्याची पावले घसरणार नाही.

  13. सात्विक मनुष्याकडे लक्ष लाव, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतताप्रिय मनुष्याचा भावी काळ सुखाचा आहे.

  14. सुज्ञपणाने जीवन जगणे हे माझे लक्ष्य आहे— तुम्ही माझ्याकडे कधी येणार? माझ्या घरातील माझा व्यवहार मी निष्कलंक तर्‍हेने करेन.

  15. जे इतरांशी न्यायाने वागतात, आणि नेहमीच नीतीने आचरण करतात, ते आशीर्वादित असतात.

  16. ज्यांचे मार्ग निष्कलंक असतात, जे याहवेहच्या नियमानुसार आचरण करतात, ते सर्वजण धन्य होत.

  17. जे मनःपूर्वक त्यांचा शोध घेतात— आणि याहवेहचे अधिनियम पाळतात, ते सर्वजण धन्य होत.

  18. ते अनीती न करता त्यांच्या मार्गाने चालतात.

  19. मी तुमचे नियम पाळले, तर माझी फजिती होणार नाही.

  20. प्रत्येक परिपूर्णतेला सीमा असते, परंतु तुमच्या आज्ञा निस्सीम आहेत.

  21. कारण सरळ मनाचे लोकच देशात वस्ती करतील, आणि निर्दोष लोक त्यात टिकून राहतील;

  22. खरोखर, या पृथ्वीवर नीतिमान असा कोणीही नाही, असा एकही व्यक्ती नाही जो चांगलेच करतो आणि कधीच पाप करीत नाही.

  23. धन्य आहेत ते, ज्यांना नीतिमत्वाची तहान व भूक लागली आहे, कारण ते तृप्त केले जातील.

  24. म्हणून जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे, तसे तुम्हीही परिपूर्ण असावे.”

  25. येशू म्हणाले, “तू परिपूर्ण होऊ इच्छित असल्यास जा, तुझी मालमत्ता विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.”