Skip to content

Patience बद्दल बायबलमधील वचने: General references

60 वचने · 37 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेहसमोर निश्चिंत राहा व धीराने त्यांची वाट पाहा; जेव्हा लोकांना त्यांच्या मार्गात यश मिळते, त्यांच्या दुष्ट योजना सफल होतात, तेव्हा तू संतापू नकोस.

  2. तुझा राग सोडून दे आणि चिरडीस येऊ नको; हेवा करू नको—नाहीतर वाईट करण्यास तू प्रवृत्त होशील.

  3. दुष्टांचा नाश ठरलेलाच आहे. परंतु ज्यांची आशा याहवेहवर आहे, त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.

  4. तापट मनुष्य कलह उत्पन्न करतो, तर शांत स्वभावाचा मनुष्य तंटा मिटवितो.

  5. एखाद्या कामाचा शेवट त्याच्या आरंभापेक्षा बरा, आणि गर्वापेक्षा सहनशीलता बरी.

  6. क्रोधित होण्यास तुझ्या अंतःकरणात घाई करू नकोस, क्रोध तर मूर्खाच्या मांडीवर वास करतो.

  7. याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणे हितकारक आहे.

  8. मनुष्याने त्याच्या तारुण्यात जू वाहणे त्याच्या हितासाठी आहे.

  9. काही बी उत्तम जमिनीत पडते, ते प्रामाणिक व चांगल्या अंतःकरणाच्या लोकांचे प्रतीक आहे, जे परमेश्वराचे वचन ऐकतात व धरून राहतात आणि धीराने पीक देतात.

  10. खंबीरपणे उभे राहा, म्हणजे जीवन मिळवाल.

  11. जे धीराने चांगले कार्य करीत राहून गौरव, सन्मान व अविनाशीतेसाठी खटपट करतात, त्यांना ते सार्वकालिक जीवन देतील.

  12. इतकेच केवळ नव्हे तर क्लेशातही आनंद करतो, कारण आपणास माहीत आहे की दुःख हे धीर उत्पन्न करते.

  13. धीरामुळे, चारित्र्य; आणि चारित्र्यामुळे, आशा.

  14. पण जे अद्यापि प्राप्त झाले नाही त्याबद्दल आशा ठेवतो, तर आपण धीराने वाट पाहतो.

  15. आशेमध्ये हर्षित, संकटात सहनशील आणि प्रार्थनेमध्ये विश्वासू असा.

  16. कारण जे काही पूर्वी लिहिण्यात आले, ते सर्व आपल्याला शिक्षण मिळावे म्हणून लिहिले गेले, यासाठी की धीर धरून शास्त्रलेखापासून मिळणार्‍या प्रोत्साहनाद्वारे आपण आपल्या आशेला दृढ धरून राहवे.

  17. धीर व प्रोत्साहन देणारा परमेश्वर तुम्हाला एकमेकांबरोबर एकचित्ताने राहण्यास साहाय्य करो. प्रत्येकाने एकमेकांशी ख्रिस्त येशूंच्या ठायी असलेल्या वृत्तीने व विचाराने वागावे,

  18. प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे. ती कधीही हेवा किंवा मत्सर करीत नाही, कधीही अभिमान बाळगत नाही, गर्व करीत नाही.

  19. ती कधीही इतरांचा अपमान करीत नाही, स्वार्थ पाहत नाही किंवा सहज चिडत नाही. ती अयोग्य गोष्टींची कधीही नोंद ठेवीत नाही.

  20. आम्ही परमेश्वराचे सेवक या नात्याने सर्वप्रकारे आमची योग्यता पटवून देण्याचा प्रयत्न करतो: मोठ्या धैर्याने, दुःख, ओझे व संकटे आम्ही सहन करतो.

  21. आम्हाला मारहाण, तुरुंग, दंगल, कष्ट, जागरणे आणि उपवास;

  22. शुद्धतेने, बुद्धीने, धीराने आणि दयेने; पवित्र आत्म्याने आणि खर्‍या प्रीतीने भरलेले;

  23. मी तुमच्याबरोबर राहत असताना मी निश्चित प्रेषित आहे, याचा पुरावा धीराने तुमच्यामध्ये अनेक चमत्कार, चिन्हे आणि महत्कृत्ये केली यामधून दिसून येते.

  24. योग्य ते करण्याचा आपल्याला कंटाळा येऊ नये, कारण आपण थकलो नाही तर योग्य वेळी पिकांची कापणी करू.

  25. प्रभूसाठी बंदिवान म्हणून, मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो, की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे जीवन जगावे.