Skip to content

Maachah बद्दल बायबलमधील वचने

12 वचने · 10 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. आणि त्याने यरुशलेमात एकेचाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आजीचे नाव माकाह होते ती अबशालोमची कन्या होती.

  2. आसाने आपला पूर्वज दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.

  3. त्याने मंदिरातून पुरुषगामी करणार्‍यांना देशाबाहेर घालवून दिले आणि त्याच्या पूर्वजांनी केलेल्या मूर्ती देखील काढून टाकल्या.

  4. त्याने आपली आजी माकाह हिला राजमातेच्या पदावरून काढून टाकले, कारण तिने तिरस्करणीय अशी अशेराची उपासना करण्यासाठी एक मूर्ती घडविली होती. आसाने ती तोडली व किद्रोनच्या खोऱ्याजवळ जाळून टाकली,

  5. माखीराने हुप्पीम व शुप्पीमची बहीण पत्नी केली; तिचे नाव माकाह. त्याच्या दुसर्‍या पुत्राचे नाव सलाफहाद. सलाफादाला फक्त कन्याच होत्या.

  6. माखीराची पत्नी माकाहला पुत्र झाला. त्याचे नाव तिने पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेष, त्याचे पुत्र ऊलाम व रेकेम.

  7. जेव्हा अम्मोनी लोकांना समजून आले की, दावीदाला आपण घृणास्पद झालो आहोत, तेव्हा हानून व अम्मोन्यांनी अराम-नहराईम, अराम-माकाह व सोबाह येथून एक हजार तालांत चांदी देऊन सैन्य, रथ व घोडदळ ही भाड्याने आणली.

  8. त्याने भाड्याने बत्तीस हजार रथ व सारथी आणले. तसेच माकाहचा राजा व त्याचे संपूर्ण सैन्य बोलाविले. त्या सैन्याने मेदबा येथे तळ दिला. अम्मोन्यांनी आपल्या नगरातून भरती केलेल्या सैन्यासह तिथे येऊन युद्धासाठी मोर्चा बांधला.

  9. नंतर त्याने अबशालोमची कन्या माकाह हिच्याशी विवाह केला, जिने अबीयाह, अत्तय, जीजा आणि शेलोमीथ यांना जन्म दिला.

  10. रेहोबोअमने त्याच्या इतर पत्नी आणि उपपत्नींपेक्षा अबशालोमची कन्या माकाहवर जास्त प्रीती केली. त्याला एकूण अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी, अठ्ठावीस मुले आणि साठ मुली होत्या.

  11. रेहोबोअमने माकाहचा मुलगा अबीयाह याला राजा करण्यासाठी त्याच्या सर्व भावांमध्ये राजपुत्र म्हणून त्याची नेमणूक केली.

  12. तो फार हुशारीने वागला आणि त्याच्या काही मुलांना यहूदीया आणि बिन्यामीन प्रांतात आणि सर्व तटबंदीच्या शहरांमध्ये पांगविले. त्याने त्यांना विपुल पुरवठा दिला आणि त्यांच्यासाठी अनेक पत्नी केल्या.