Maachah बद्दल बायबलमधील वचने: 4. Called Michaiah, mother of Abijam and grandmother of Asa
4. Called Michaiah, mother of Abijam and grandmother of Asa बद्दल वचने
आणि त्याने यरुशलेमात एकेचाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आजीचे नाव माकाह होते ती अबशालोमची कन्या होती.
आसाने आपला पूर्वज दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.
त्याने मंदिरातून पुरुषगामी करणार्यांना देशाबाहेर घालवून दिले आणि त्याच्या पूर्वजांनी केलेल्या मूर्ती देखील काढून टाकल्या.
त्याने आपली आजी माकाह हिला राजमातेच्या पदावरून काढून टाकले, कारण तिने तिरस्करणीय अशी अशेराची उपासना करण्यासाठी एक मूर्ती घडविली होती. आसाने ती तोडली व किद्रोनच्या खोऱ्याजवळ जाळून टाकली,
नंतर त्याने अबशालोमची कन्या माकाह हिच्याशी विवाह केला, जिने अबीयाह, अत्तय, जीजा आणि शेलोमीथ यांना जन्म दिला.
रेहोबोअमने त्याच्या इतर पत्नी आणि उपपत्नींपेक्षा अबशालोमची कन्या माकाहवर जास्त प्रीती केली. त्याला एकूण अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी, अठ्ठावीस मुले आणि साठ मुली होत्या.
रेहोबोअमने माकाहचा मुलगा अबीयाह याला राजा करण्यासाठी त्याच्या सर्व भावांमध्ये राजपुत्र म्हणून त्याची नेमणूक केली.
तो फार हुशारीने वागला आणि त्याच्या काही मुलांना यहूदीया आणि बिन्यामीन प्रांतात आणि सर्व तटबंदीच्या शहरांमध्ये पांगविले. त्याने त्यांना विपुल पुरवठा दिला आणि त्यांच्यासाठी अनेक पत्नी केल्या.