Skip to content

Lending बद्दल बायबलमधील वचने

42 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “तुमच्यामध्ये असलेल्या माझ्या गरजवंत लोकांना जर तुम्ही उसने पैसे दिले, तर त्यांच्याशी सावकारी व्यवहार करू नका; व व्याज लावू नका.

  2. तुम्ही आपल्या शेजार्‍याचे पांघरूण मागून घेतले, तर सूर्यास्तापूर्वी ते परत करा,

  3. कारण तुमच्या शेजार्‍याजवळ पांघरावयाला तेवढेच असेल, तर ते रात्री काय घेऊन झोपतील? आणि जेव्हा ते माझ्याकडे धावा करतील, तेव्हा मी त्यांचे ऐकेन, कारण मी दयाळू आहे.

  4. “ ‘जर तुमच्या कोणी इस्राएल बंधूला दारिद्र्य आले आणि ते तुमच्यामध्ये स्वतःचे पालनपोषण करू शकत नसतील, तर जसे तुम्ही परदेशी आणि परक्यांना मदत कराल तशी त्यांना करा, जेणेकरून ते तुमच्यामध्ये राहतील.

  5. परमेश्वराची भीती बाळगावी आणि तुमच्या बंधूला तुमच्या घरात राहू द्यावे. त्याला उसने म्हणून दिलेल्या पैशावर तुम्ही व्याज घेऊ नये.

  6. तुम्ही त्यांना व्याजाने पैसे देऊ नयेत किंवा जे खाद्यपदार्थ तुम्ही त्यांना विकाल त्यावर नफा घेऊ नये.

  7. प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी सर्व कर्ज माफ करावे.

  8. कर्जमाफीची प्रक्रिया अशी असावी: प्रत्येक सावकाराने आपल्याजवळ असलेल्या कोणाही इस्राएली बंधूचे कर्ज माफ करावे. त्यांना स्वतःच्या लोकांपैकी कोणाकडूनही पैसे घ्यावे लागणार नाहीत, कारण कर्जाची फेड करण्याची वेळ याहवेहने घोषित केली आहे.

  9. परदेशी पासून असलेले कर्ज तुम्हाला वसूल करता येईल, परंतु तुमच्याच बांधवांची देणी तुम्ही मुळीच वसूल करू नयेत.

  10. तरीसुद्धा तुमच्यात कोणीही दरिद्री असा राहू नये, कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतनादाखल देऊ केलेल्या या देशात भरपूर आशीर्वाद देतील,

  11. जर तुम्ही पूर्णपणे याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेत राहाल आणि आज मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळाल तरच.

  12. कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने अभिवचन दिल्याप्रमाणे ते तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुम्ही अनेक राष्ट्रांना कर्ज द्याल पण तुम्ही मात्र कर्ज घेणार नाही. तसेच तुम्ही अनेक राष्ट्रांवर राज्य कराल, पण ती राष्ट्रे तुम्हावर राज्य करणार नाहीत.

  13. परंतु याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला देत आहेत, त्यातील कोणत्याही नगरात कोणी इस्राएली बांधव गरीब असेल, तर त्यांच्याकरिता तुमचे हृदय कठोर करू नका किंवा तुमची मूठ बांधून ठेऊ नका.

  14. त्यांना गरज लागेल तितके तुम्ही त्यांना उदारमनाने व निर्व्याज उसने द्यावे.

  15. हा दुष्ट विचार मनात न आणण्याची खबरदारी घ्या: “कर्जमाफी करण्याचे सातवे वर्ष जवळ आले आहे.” म्हणून तुम्ही एखाद्या इस्राएली बांधवाबद्दल वाईट इच्छा दाखवू नका आणि मदत नाकारू नका. जर तो याहवेहकडे आपले गार्‍हाणे घेऊन गेला, तर ते तुमच्याविरुद्ध पाप असे मोजण्यात येईल.

  16. तुम्ही त्यांना उदारपणे दिले पाहिजे आणि त्याबद्दल तुम्ही अंतःकरणात कुरकुर करू नये; मग तुम्ही जे काही कराल आणि जे कार्य हातात घ्याल त्यात याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतील.

  17. देशात नेहमीच गरीब असतील. म्हणून मी तुम्हाला आज्ञा देत आहे की तुमच्या देशातील इस्राएली बांधव जे गरीब आणि गरजवंत आहेत, त्यांना उदारहस्ते मदत करावी.

  18. तुमच्या इस्राएली बंधूला दिलेल्या कर्जावर व्याज मागू नका, मग ते कर्ज पैशाच्या, अन्नाच्या अथवा दुसर्‍या कशाच्याही रूपाने दिलेले असो, त्याच्यावर व्याज मागू नका.

  19. तुम्ही एखाद्या परदेशीकडून व्याज घेऊ शकता, पण कोणाही इस्राएली बांधवाकडून घेऊ नका, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर जेव्हा तुम्हाला वतन म्हणून ज्या देशात आणतील, तेव्हा तुम्ही केलेल्या प्रत्येक कार्याला आशीर्वाद देतील.

  20. जेव्हा तुम्ही आपल्या शेजार्‍याला काही उसने देता, तर तारण घेण्यासाठी तुम्ही त्याच्या घरात शिरू नये,

  21. तुम्ही बाहेर उभे राहावे आणि ज्या शेजार्‍याला तुम्ही कर्ज देत आहात त्याने तुम्हाला बाहेर तारण आणून द्यावे.

  22. जर शेजारी गरीब असेल, तर तुम्ही त्याने तारण म्हणून दिलेले पांघरूण अंगावर घेऊन झोपू नका.

  23. गहाणादाखल त्याने आपले पांघरूण दिले असेल व तर सूर्यास्तसमयी ते त्याला परत करावे म्हणजे ते पांघरूण अंगावर घेऊन तो झोपेल. तो तुमचे आभार मानेल आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने तुमचे हे कृत्य नीतिमत्व असे ठरेल.

  24. काही काळानंतर स्त्रीपुरुषांनी आपल्या यहूदी बांधवांविरूद्ध तक्रार करण्यास सुरुवात केली.

  25. काहीजण म्हणाले, “आम्ही व आमचे पुत्र व कन्या असे बरेच लोक आहोत आणि जिवंत राहण्यासाठी आम्हाला धान्याची गरज आहे.”