Skip to content

Judgments बद्दल बायबलमधील वचने

271 वचने · 91 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमच्यापैकी जे शिल्लक राहतील ते तुमच्या शत्रूंच्या देशात त्यांच्या पापांमुळे नष्ट होतील; आणि ते त्यांच्या पूर्वजांच्या पापांमुळे नष्ट होतील.

  2. मोशेच्या कूशी पत्नीमुळे मिर्याम आणि अहरोन मोशेच्या विरुद्ध बोलू लागले, कारण त्याने कूशी देशातील एका स्त्रीशी विवाह केला होता.

  3. त्यांनी विचारले, “याहवेह मोशेद्वारेच बोलले आहेत काय? याहवेह आमच्याद्वारे सुद्धा बोलले नाहीत काय?” आणि याहवेहने हे ऐकले.

  4. (मोशे तर अतिशय नम्र मनुष्य होता, भूतलावरील इतर लोकांपेक्षा अधिक नम्र होता.)

  5. याहवेह लगेचच मोशे, अहरोन आणि मिर्यामला म्हणाले, “तुम्ही तिघेही सभामंडपाकडे बाहेर या.” तेव्हा ते तिघे बाहेर गेले.

  6. मग याहवेह मेघस्तंभातून खाली आले; आणि निवासमंडपाच्या दाराशी उभे राहून अहरोन व मिर्याम यांना बोलाविले. जेव्हा ते पुढे गेले,

  7. याहवेह त्यांना म्हणाले, “माझे शब्द ऐका: “जेव्हा तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा आहे, मी याहवेह, त्यांना दृष्टान्ताद्वारे स्वतःला प्रकट करतो, स्वप्नाद्वारे मी त्यांच्याशी बोलतो.

  8. परंतु माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही; तो माझ्या सर्व घराण्यात विश्वासू आहे.

  9. मी त्याच्याशी कोड्यात नाही, तर समोरासमोर स्पष्टपणे बोलतो; तो याहवेहचे रूप पाहतो. माझा सेवक मोशे याच्याविरुद्ध बोलण्यास तुम्हाला भीती का वाटली नाही?”

  10. मग याहवेहचा क्रोध त्यांच्याविरुद्ध भडकला आणि याहवेह त्यांना सोडून निघून गेले.

  11. जेव्हा मंडपावरून मेघ वरती घेतला गेला, तेव्हा मिर्यामची त्वचा रोगाने भरली होती; ती बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनाने तिच्याकडे वळून बघितले तेव्हा त्याने पाहिले की तिच्या त्वचेवर कोड फुटले होते,

  12. तेव्हा तो मोशेला म्हणाला, “माझे स्वामी, मी तुला विनंती करतो, कृपया, आम्ही मूर्खपणाने केलेले पाप आमच्याविरुद्ध मोजू नको.

  13. जसे एक तान्हे मृत बाळ आपल्या आईच्या उदरातून जन्माला येताच त्याचे अर्धे शरीर नष्ट झालेले असते, असे तिला राहू देऊ नको.”

  14. तेव्हा मोशेने याहवेहचा धावा केला, “हे याहवेह कृपा करून तिला बरे करा!”

  15. तेव्हा याहवेहने मोशेला उत्तर दिले, “जर तिचा पिता तिच्या तोंडावर थुंकला असता, तर तिला सात दिवस लाजेने घालवावे लागले असते की नाही? तिला सात दिवस छावणीच्या बाहेर वेगळे राहू दे, त्यानंतर तिला परत आणावे.”

  16. मग मिर्यामला सात दिवस छावणीबाहेर वेगळे ठेवण्यात आले आणि तिला पुन्हा छावणीत आणेपर्यंत लोक पुढच्या प्रवासास गेले नाही.

  17. ते जिवंतपणीच अधोलोकात गेले आणि त्यांचा व त्यांच्या मालकीचे जे होते त्यांचा नाश झाला; मग जमीन पूर्ववत झाली, त्यांचा नाश होऊन ते सर्वजण समुदायातून नाहीसे झाले.

  18. त्यांच्या आक्रोशामुळे, “पृथ्वी आपल्यालाही गिळून टाकील!” असे म्हणत इस्राएली लोक भीतीने ओरडत पळत सुटले.

  19. नंतर याहवेहपासून अग्नी निघाला आणि त्याने धूपाचे अर्पण करणार्‍या त्या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले.

  20. ज्या भूमीत तुम्ही राहणार आहात तेथील राष्ट्रांचा याहवेह तुमचे परमेश्वर नाश करतील. मग त्यांना तिथून घालवून दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी वस्ती करावी,

  21. आणि तुमच्यासमोर ते नष्ट झाल्यानंतर, तुम्ही त्यांच्या दैवतांची चौकशी कराल “ही राष्ट्रे त्यांच्या दैवतांची उपासना कशी करीत होती? आपणही तसेच करावे,” तसे करण्याचा तुम्हाला मोह होईल, तेव्हा त्यांच्या दैवतांच्या मोहात अडकू नये याची खबरदारी घ्या.

  22. त्यांच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची उपासना कदापि करू नये, कारण त्यांच्या दैवतांच्या उपासनेमध्ये ते अशी घृणित कृत्ये करतात, ज्यांचा याहवेह तिरस्कार करतात. ते आपल्या पुत्रांना जाळतात आणि कन्यांचा त्यांच्या दैवतांना होम करतात.

  23. मी देत असलेल्या सर्व आज्ञांचे तुम्ही पालन करावे; त्यात काहीही भर घालू नये किंवा त्यातून काही कमी करू नये.

  24. परंतु याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही ऐकले नाही व त्यांच्या सर्व आज्ञा व विधी ज्या मी तुम्हाला आज देत आहे त्यांचे तुम्ही काळजीपूर्वक पालन केले नाही, तर हे सर्व शाप तुम्हावर येतील आणि तुम्हाला येऊन गाठतील:

  25. तुम्ही नगरात शापित व्हाल व शेतात शापित व्हाल.