Skip to content

Jabesh-Gilead बद्दल बायबलमधील वचने

27 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर त्यांनी विचारले “मिस्पाह येथे याहवेहसमोर इस्राएलचा कोणता गोत्र आला नव्हता?” तेव्हा त्यांना कळून आले की, याबेश गिलआदातील लोकांपैकी कोणीही हजर नव्हते.

  2. कारण जेव्हा त्यांनी लोकांची मोजणी केली, त्यांना आढळून आले की याबेश गिलआदातील लोकांपैकी कोणीही तिथे नव्हते.

  3. म्हणून सभेने बारा हजार योद्ध्यांना सूचना देऊन याबेश-गिलआद येथे पाठविले आणि त्यांनी जाऊन तिथे राहणार्‍यांचा, स्त्रियांचा आणि लेकरांचा तलवारीने संहार करावा.

  4. तुम्हाला हे करावयाचे आहे ते म्हणाले, “सर्व पुरुष आणि स्त्रिया ज्या कुमारिका नाहीत त्या सर्वांना तुम्ही मारावे.”

  5. त्यांना याबेश-गिलआद येथे राहणार्‍या लोकांमध्ये चारशे तरुण स्त्रिया आढळल्या ज्या कधीही पुरुषांसोबत निजल्या नव्हत्या आणि त्यांनी त्यांना कनान देशातील शिलोह येथील छावणीत आणले.

  6. मग संपूर्ण सभेने बिन्यामीन गोत्राकडे जे रिम्मोन खडकावर राहत होते, निरोप पाठवून त्यांच्याकडे शांतीची बोलणी केली.

  7. बिन्यामीन लोक त्यावेळेस परत आले आणि याबेश-गिलआद येथील उर्वरित स्त्रिया त्यांना पत्नी म्हणून देण्यात आल्या आणि मग ते आपापल्या घरी परतले. परंतु त्या त्यांना पुरेसा नव्हत्या.

  8. बिन्यामीन गोत्रासाठी लोकांनी दुःख केले, कारण याहवेहने इस्राएलांच्या गोत्रांमध्ये दरी निर्माण केली.

  9. अम्मोनी नाहाशने जाऊन याबेश-गिलआदला वेढा घातला. याबेशचे सर्व पुरुष त्याला म्हणाले, “आमच्यासह एक करार कर, म्हणजे आम्ही प्रजा होऊन तुमची सेवा करू.”

  10. परंतु अम्मोनी नाहाश म्हणाला, “मी एकाच अटीवर तुमच्याशी करार करेन की मी तुम्हा प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून संपूर्ण इस्राएलवर अप्रतिष्ठा आणेन.”

  11. याबेशचे वडीलजन त्याला म्हणाले, “आम्हाला सात दिवसांचा अवकाश दे म्हणजे आम्ही संपूर्ण इस्राएलमध्ये निरोप पाठवू; जर आमची सुटका करण्यासाठी कोणी आला नाही तर आम्ही तुला स्वाधीन होऊ.”

  12. जेव्हा निरोप्यांनी शौलाच्या गिबियाह येथे जाऊन तेथील लोकांस हे वर्तमान दिले, तेव्हा त्या सर्वांनी मोठ्याने आकांत केला.

  13. त्याचवेळेस शौल त्याच्या बैलांमागून शेतातून परत येत होता, त्याने विचारले, “प्रत्येकाला काय झाले आहे? ते का रडत आहेत?” तेव्हा याबेशाच्या लोकांनी जे काही सांगितले होते ते त्यांनी त्याला सांगितले.

  14. जेव्हा शौलाने त्यांचे शब्द ऐकले, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने आला आणि तो क्रोधाने पेटला.

  15. त्याने बैलाची एक जोडी कापून त्यांचे तुकडे केले आणि निरोप्यांच्या हाती ते तुकडे सर्व इस्राएलमध्ये पाठविले आणि जाहीर केले, “जे कोणी शौल आणि शमुवेल यांचे अनुसरण करणार नाही, त्यांच्या बैलांचे असेच केले जाईल.” तेव्हा लोकांना याहवेहचे भय वाटू लागले आणि ते एकजूट होऊन बाहेर आले.

  16. बेजेक येथे शौलाने त्यांची मोजणी केली, तेव्हा ते तीन लाख इस्राएली पुरुष होते आणि यहूदाहचे तीस हजार पुरुष होते.

  17. जे निरोप घेऊन आले होते त्यांना त्यांनी सांगितले, “याबेश-गिलआदच्या पुरुषांना सांगा, ‘उद्या सूर्य तापलेला असेल, त्या वेळेपर्यंत तुमची सुटका केली जाईल.’ ” जेव्हा निरोप्यांनी जाऊन हे वर्तमान याबेशच्या लोकांना सांगितले तेव्हा ते आनंदित झाले.

  18. याबेशवासी अम्मोनी लोकांना म्हणाले, “उद्या आम्ही स्वतःला तुमच्या स्वाधीन करू आणि तुम्हाला आवडेल तसे तुम्ही आमचे करा.”

  19. दुसर्‍या दिवशी शौलाने आपल्या लोकांना तीन भागांमध्ये विभागले; रात्रीच्या शेवटच्या प्रहरी ते अम्मोन्यांच्या छावणीत घुसले आणि सूर्य तापेपर्यंत त्यांना मारून टाकले. जे वाचले त्यातील दोन व्यक्तीही एकत्र येणार नाही असे विखरून गेले.

  20. पलिष्टी लोकांनी शौलाचे काय केले हे जेव्हा याबेश-गिलआदच्या लोकांनी ऐकले,

  21. तेव्हा त्यांचे सर्व शूरवीर रात्रभर चालून बेथ-शान येथे गेले. त्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचे मृतदेह बेथ-शानच्या भिंतीवरून खाली उतरविले आणि याबेश येथे आणले व तिथे त्यांनी ते जाळून टाकले.

  22. त्यानंतर त्यांनी त्यांच्या अस्थी याबेश येथे चिंचेच्या झाडाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला.

  23. दावीद गेला आणि याबेश-गिलआद येथील नागरिकांकडून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी घेतल्या. (त्यांनी त्यांची शरीरे बेथ-शान नगराच्या चौकातून चोरली होती, जिथे पलिष्ट्यांनी शौलाला गिलबोआत मारून टाकल्यानंतर त्यांना तिथे टांगले होते.)

  24. तेव्हा दावीदाने शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी तिथून आणल्या आणि ज्यांना मारून टाकून डोंगरावर प्रदर्शित केले होते त्यांच्या अस्थी सुद्धा गोळा केल्या.

  25. त्यांनी बिन्यामीन प्रांतातील सेला येथे शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी, शौलाचा पिता कीश याच्या कबरेत पुरल्या आणि राजाने आज्ञापिल्याप्रमाणे सर्वकाही केले, त्यानंतर देशाच्या वतीने केलेल्या प्रार्थनेचे परमेश्वराने उत्तर दिले.