Skip to content

Inspiration बद्दल बायबलमधील वचने: General references

20 वचने · 1 पैलू

General references बद्दल वचने

  1. हे प्रायश्चिताचे झाकण कोशाच्या वर ठेवावे आणि कराराच्या नियमाच्या पाट्या ज्या मी तुला देणार त्या कोशाच्या आत ठेवाव्यात.

  2. तिथे, प्रायश्चिताच्या झाकणावर दोन करूब जे कोशावर ठेवलेले आहेत, त्यांच्यामध्ये मी तुला भेटेन आणि इस्राएल लोकांसाठी द्यावयाच्या सर्व आज्ञा मी तुला देईन.

  3. याहवेह मोशेला म्हणाले: “इस्राएली लोकांमधील सत्तर वडील ज्यांना तू पुढारी आणि अधिकारी म्हणून ओळखतो, त्यांना माझ्यासमोर आण. त्यांनी सभामंडपात यावे व तुझ्याबरोबर उभे राहावे.

  4. मी खाली येऊन तिथे तुझ्याशी बोलेन आणि जो आत्मा तुझ्यावर आहे, त्याचे काही सामर्थ्य मी घेऊन त्यांच्यावर ठेवेन. ते तुझ्याबरोबर लोकांचा भार वाहतील म्हणजे तुला एकट्याला तो वाहावा लागणार नाही.

  5. “लोकांना सांग: ‘उद्याच्या तयारीकरिता स्वतःला पवित्र करा, कारण उद्या त्यांना मांस खायला मिळेल. “आम्हाला मांस खायला मिळाले तर किती बरे! आम्ही इजिप्तमध्ये चांगले होतो!” हे तुमचे रडणे याहवेहने ऐकले आहे, आता याहवेह तुम्हाला मांस देणार आहेत आणि ते तुम्ही खाल.

  6. तुम्ही ते केवळ एक दिवस किंवा दोन दिवस, किंवा पाच दिवस, दहा, किंवा वीस दिवस,

  7. परंतु संपूर्ण एक महिना; ते तुमच्या नाकपुड्यातून बाहेर येईपर्यंत आणि ते तुम्हाला नकोसे वाटेपर्यंत ते तुम्ही खाल; कारण तुम्ही याहवेह जे तुमच्यामध्ये राहतात त्यांना नाकारले आहे, त्यांच्यासमोर रडत म्हणाला, “आम्ही इजिप्त का सोडले?” ’ ”

  8. पण मोशे म्हणाला, “इथे ज्या लोकांमध्ये मी आहे ते सहा लाख पुरुष पायदळ आहेत आणि तुम्ही म्हणता, ‘मी त्यांना एक महिनाभर मांस खायला देणार!’

  9. गुरे व शेरडेमेंढरे कापली तरी ते त्यांच्यासाठी पुरेसे होईल काय? समुद्रातील सर्व मासे पकडले तरी ते त्यांना पुरतील काय?”

  10. याहवेहने मोशेला उत्तर दिले, “याहवेहचा हात इतका आखूड आहे काय? माझे शब्द घडून येतात की नाही हे तू आता पाहशील.”

  11. मग मोशे निवासमंडपातून बाहेर आला आणि याहवेह जे काही बोलले ते त्याने लोकांना सांगितले. आणि त्याने सत्तर वडिलांना एकत्र करून तंबूच्या सभोवती उभे केले.

  12. मग याहवेह मेघातून खाली उतरले व मोशेशी बोलले आणि याहवेहने मोशेवर असलेल्या आत्म्याचे काही सामर्थ्य घेऊन त्या सत्तर वडिलांवर ठेवले. ज्यावेळी आत्मा त्यांच्यावर स्थिर झाला, त्यावेळी त्यांनी भविष्यवाणी केली—परंतु पुन्हा असे केले नाही.

  13. पण दोघे पुरुष ज्यांची नावे एलदाद व मेदाद छावणीतच राहिले होते. वडिलांच्या यादीत त्यांची नावे होती, परंतु ते बाहेर तंबूकडे गेले नाही. तरी त्यांच्यावरही आत्मा उतरला आणि त्यांनी छावणीतच भविष्यवाणी केली.

  14. एका तरुण पुरुषाने धावत जाऊन मोशेला सांगितले, “एलदाद व मेदाद छावणीत भविष्यवाणी करीत आहेत.”

  15. नूनाचा पुत्र यहोशुआ, जो तारुण्यापासून मोशेचा मदतनीस होता, तो म्हणाला, “मोशे, माझ्या स्वामी, त्यांना थांबवा!”

  16. पण मोशे म्हणाला, “माझ्यासाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? माझी तर इच्छा आहे की, याहवेहचे सर्व लोक संदेष्टे असावेत आणि याहवेहने सर्व लोकांवर आपला आत्मा ठेवावा!”

  17. “ज्यावेळी तुम्हाला सभागृह, पुढारी, राज्यकर्ते यांच्यापुढे आणण्यात येईल, तेव्हा तुम्ही स्वतःचा बचाव कसा करावा व काय बोलावे याविषयी चिंता करू नका.

  18. कारण तुम्ही तिथे उभे असताना, काय बोलावे हे पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल.”

  19. प्रभूच्या दिवशी मी आत्म्यात संचारलो आणि मी माझ्यामागे रणशिंगाच्या आवाजासारखा मोठा आवाज ऐकला.

  20. तो म्हणाला: “तुला जे दिसते, ते एका ग्रंथपटावर लिहून काढ आणि ते इफिस, स्मुर्णा, पर्गमम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया या सात मंडळ्यांना पाठव.”