मुख्य मजकुरावर जा

Impenitence बद्दल बायबलमधील वचने

170 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुम्हीच इस्राएलची आशा आहात, संकटसमयीच्या आमच्या त्रात्या, तुम्ही या देशात आमच्याशी परकेपणाने का वागता, केवळ रात्रभर मुक्काम करणार्‍या वाटसरूसारखे का झाला आहात?

  2. एखाद्या विस्मित झालेल्या व्यक्तीसारखे तुम्ही का आहात? एखाद्या वाचविण्यास अशक्त योद्ध्याप्रमाणे? हे याहवेह, तुम्ही तर येथेच आमच्यामध्ये आहात, आम्ही तुमचे नाव धारण केले आहे; आमचा त्याग करू नका!

  3. यावर याहवेहने या लोकांबद्दल असे म्हटले: “माझ्यापासून दूर भटकणे त्यांना फार आवडते; ते त्यांची पावले ताब्यात ठेवत नाहीत. म्हणून याहवेह तुमचा स्वीकार करीत नाहीत; आता मी तुमची दुष्कर्मे आठवेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हाला शासन करेन.”

  4. मग याहवेहने मला म्हटले, “त्यांच्या भल्यासाठी इतःपर प्रार्थना करू नकोस.

  5. जर ते उपवास करतील, तरी मी त्यांच्या रडण्याकडे मुळीच लक्ष देणार नाही; मला ते होमार्पणे आणि अन्नार्पणे आणतील, मी त्यांचा स्वीकार करणार नाही. याउलट तलवार, दुष्काळ व रोगराई यांनी मी त्यांची परतफेड करेन.”

  6. परंतु मी म्हटले, “अरेरे, हे सार्वभौम याहवेह! त्यांचे संदेष्टे त्यांना सांगतात, ‘तलवार किंवा दुष्काळ निश्चितच येणार नाहीत. मी या ठिकाणी तुम्हाला खात्रीने स्थायी शांतता देईन.’ ”

  7. त्यावर याहवेहने मला म्हटले, “संदेष्टे माझ्या नावाने असत्य संदेश सांगत आहेत. मी काही त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना नेमले नाही वा त्यांच्याशी बोललो नाही. खोट्या दृष्टान्तावरून, प्रकटीकरणांवरून, व्यर्थ शकुनविद्येवरून आणि स्वतःच्या मनाच्या भ्रांतीवरून ते तुम्हाला खोटी भविष्ये सांगतात.”

  8. म्हणून माझ्या नावाने भविष्यवाणी करणार्‍यांबद्दल याहवेह असे म्हणतात: “मी पाठविले नसतानाही ‘तलवार किंवा दुष्काळ या भूमीला स्पर्श करणार नाही,’ असे बोलणारे हे संदेष्टेच तलवारीला व दुष्काळाला बळी पडतील.

  9. आणि हे लबाड लोक ज्यांना संदेश देतात तेही तलवारीला व दुष्काळाला बळी पडून यरुशलेमच्या रस्त्यांवर फेकून दिले जातील आणि त्यांना, पत्नी, पुत्र व कन्यांना मूठमाती द्यायलाही कोणी राहणार नाही. कारण मी त्यांच्यावर घोर विपत्ती पाठविणार ज्याला ते पात्र आहेत.

  10. तुम्ही मला नाकारले आहे,” याहवेह असे म्हणतात. “तुमची घसरण सुरूच आहे. म्हणून मी माझे हात तुमच्याविरुद्ध करेन व तुमचा नाश करेन; विनाश राखून ठेवण्याचा मला वीट आला आहे.

  11. मी शहरांच्या वेशींमध्येच त्यांना पाखडेन. मी विध्वंस आणि शोककळा माझ्या लोकांवर आणेन, कारण ते आपल्या वाईट मार्गापासून वळले नाही.

  12. त्यांना सांग, ‘याहवेह म्हणतात: जर तुम्ही माझे ऐकणार नाही व मी तुमच्यापुढे ठेवलेले नियम तुम्ही पाळणार नाही,

  13. आणि मी पाठविलेल्या माझ्या सेवक संदेष्ट्यांचे संदेश तुम्ही ऐकणार नाही, मी माझे संदेष्टे तुम्हाला सावध करण्याकरिता पुनः पुनः पाठविले (पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही),

  14. तर या मंदिरास मी शिलोह आणि या नगरासारखे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांमध्ये शाप असे करेन.’ ”

  15. ‘रेखाबचा पुत्र यहोनादाब याने त्याच्या वंशजांना आज्ञा दिली होती की द्राक्षारस पिऊ नये, आणि ही आज्ञा त्यांनी पाळली. त्यांच्या पूर्वजांची आज्ञा पाळण्याकरिता, आजतागायत ते द्राक्षारस पीत नाहीत. मी तुमच्याशी पुन्हापुन्हा बोललो, पण माझ्या आज्ञा तुम्ही पाळल्या नाहीत.

  16. पुन्हापुन्हा मी तुमच्याकडे माझे सेवक संदेष्टे पाठविले. ते म्हणाले, “तुम्हा प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून मागे वळावे व आपल्या आचरणात सुधारणा करावी; इतर दैवतांची सेवा करणे सोडून द्यावे. तर मी जो देश तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिला होता, त्या देशात तुम्ही सुखरुपपणे राहाल.” परंतु तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही वा माझे ऐकले नाही.

  17. रेखाबचा पुत्र यहोनादाबच्या वंशजांनी आपल्या पित्याच्या आज्ञा संपूर्णपणे पाळल्या आहेत, पण या लोकांनी माझ्या आज्ञा पाळण्यास नकार दिला आहे.’

  18. “म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘ऐका! मी यहूदीयावर व यरुशलेमवर जी अरिष्टे आणण्याची घोषणा केली होती ती अरिष्टे आणेन. मी त्यांच्याशी बोललो, पण ते ऐकत नाहीत; मी हाक मारतो, तेव्हा ते उत्तर देत नाहीत.’ ”

  19. “याहवेहच्या नावाने तू देत असलेले संदेश आम्ही ऐकणार नाही!

  20. आम्ही जे करणार असे म्हटले होते, तसे आम्ही निश्चितच करू. आम्ही आकाशराणीस धूप जाळू आणि तिला पेयार्पण करू, जसे आम्ही व आमच्या पूर्वजांनी, आणि आमचे राजे व अधिपती यांनी यहूदीयाच्या नगरात, यरुशलेमच्या रस्त्यात नेहमी केले, तसेच आम्हीही करू. कारण त्या दिवसात आमच्याकडे विपुल अन्न होते आणि आम्ही सुखात होतो व आम्हाला काहीही इजा झाली नाही.

  21. आणि तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आहे ते खा, ही गुंडाळी खा; नंतर इस्राएली लोकांशी बोल.”

  22. तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला खाण्यासाठी गुंडाळी दिली.

  23. तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही जी गुंडाळी मी तुला देत आहे ती पोटभरून खा.” म्हणून ती मी खाल्ली आणि ती माझ्या तोंडात मधासारखी गोड लागली.

  24. नंतर तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, आता इस्राएली लोकांकडे जा आणि त्यांना माझी वचने सांग.

  25. अस्पष्ट बोलीच्या किंवा अनोळखी भाषेच्या लोकांकडे नाही, तर इस्राएली लोकांकडे तुला पाठवले जात आहे;