Idleness बद्दल बायबलमधील वचने: General references
General references बद्दल वचने
परंतु हे आळशी माणसा, तू तिथे किती वेळ झोपून राहशील? तुझ्या झोपेतून तू केव्हा जागा होणार आहेस?
आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती—
आणि दारिद्र्य एका चोराप्रमाणे तुझ्यावर येईल आणि हत्यारबंद मनुष्याप्रमाणे गरिबी येईल.
आळशी हात दरिद्री आणतो, परंतु उद्योगी हात समृद्धी आणतो.
जो उन्हाळ्यात धान्याचा संचय करतो तो शहाणा पुत्र होय; परंतु जो कापणीच्या हंगामात झोपून राहतो, तो लज्जेचे कारण होतो.
एका आळशी मनुष्याच्या शेताच्या बाजूने मी गेलो, ज्याच्याकडे विवेकबुद्धी नाही अशा माणसाच्या द्राक्षमळ्याच्या बाजूने मी गेलो;
सर्वत्र काटेरी झुडपे उगविलेली होती, आणि संपूर्ण भूमी तणाने झाकली गेलेली होती; त्याचे दगडी कुंपणही ढासळले होते.
आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती—
आणि दारिद्र्य एका चोराप्रमाणे तुझ्यावर येईल आणि सशस्त्र मनुष्याप्रमाणे गरिबी येईल.
आळशी म्हणतो “बाहेर रस्त्यावर सिंह आहे, एक भयानक सिंह मार्गात फिरत आहे!”
दार त्याच्या बिजागर्यांवर फिरते तसा आळशी बिछान्यावर कूस बदलत असतो.
आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो; तो हात पुन्हा तोंडापर्यंत नेण्यासाठीही त्याला आळस वाटतो.
स्वदृष्टीत शहाणा असणार्या आळशास वाटते कि तो यथायोग्य उत्तर देणाऱ्या सात लोकांपेक्षाही जास्त शहाणा आहे.
पाच वाजता तो बाहेर गेला असताना, काही लोक रिकामे उभे असलेले त्याने पाहिले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही येथे दिवसभर काही काम न करता का थांबला आहात?’
“ ‘आम्हाला कोणी मजुरीवर लावले नाही,’ त्यांनी उत्तर दिले. “तो त्यांना म्हणाला, ‘मग तुम्ही सुद्धा जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा.’
“मग तिसरा दास पुढे येऊन म्हणाला, ‘महाराज, ही तुमची मीना घ्या; मी ती एका कापडात गुंडाळून जपून ठेवली होती,
तुम्ही एक कठोर गृहृस्थ आहात, म्हणून मला तुमची भीती वाटली. जिथे तुम्ही ठेवले नाही, तिथे घेता आणि जे पेरलेले नाही, ते कापून नेता.’
“यावर त्याचा धनी म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा! मी आता तुझ्या शब्दाप्रमाणेच तुझा न्याय करतो, तुला माहीत होते की मी कठोर स्वभावाचा आहे, जे माझे नाही ते बळकावितो आणि मी स्वतः पेरले नाही ते कापून नेतो,
तर माझे रुपये सावकाराकडे गुंतवून ठेवावयास हवे होते, म्हणजे मी परत आल्यावर त्यावर काही व्याज तरी मिळाले असते?’
“नंतर तो त्याच्याजवळ जे उभे होते त्यांना म्हणाला, ‘त्याच्याकडून त्याची मीना घ्या आणि ज्याच्याजवळ दहा मीना आहेत त्याला द्या.’
“पण ‘महाराज,’ ते म्हणाले, ‘त्याच्याजवळ आधीच दहा मीना आहेत.’
आम्ही तुम्हाजवळ होतो, तेव्हाही तुम्हाला हाच नियम दिला होता: “जो कोणी काम करू इच्छित नाही, त्याने खाऊ नये.”
तुमच्यापैकी काहींची जीवनशैली आळशी आहे आणि काही लोक व्यत्यय आणणारे व इतरांच्या कामात लुडबुड करतात असे आम्ही ऐकतो.