Skip to content

Gluttony बद्दल बायबलमधील वचने

29 वचने · 15 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तो याकोबाला म्हणाला, “लवकर, मला तो तांबडा पदार्थ घेऊ दे! मला भयंकर भूक लागली आहे!” (म्हणूनच त्याला एदोम असेही म्हणतात.)

  2. याकोबाने उत्तर दिले, “प्रथम तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे.”

  3. एसाव म्हणाला, “एखादा मनुष्य भुकेने मरत असताना त्याला त्याच्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?”

  4. परंतु याकोब म्हणाला, “आधी शपथ घे.” म्हणून त्याने शपथ घेतली आणि आपला ज्येष्ठ पुत्रत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला.

  5. तेव्हा याकोबाने एसावाला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले; एसावाने ते खाल्ले आणि निघून गेला. अशा रीतीने एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ मानला.

  6. तरीही काहींनी मोशेच्या शब्दाकडे लक्ष दिले नाही; व त्याचा काही भाग सकाळपर्यंत ठेवला, पण त्यात किडे पडून त्याला दुर्गंधी सुटली होती, तेव्हा मोशे त्यांच्यावर रागावला.

  7. मग रोज सकाळी प्रत्येकाला लागते तेवढेच ते गोळा करीत असत आणि जेव्हा सूर्य प्रखर होई, तेव्हा ते वितळून जात असे.

  8. त्या दिवशी लोकांनी बाहेर जाऊन तो संपूर्ण दिवस आणि रात्र आणि संपूर्ण दुसरा दिवस लावे पक्षी गोळा केले. कोणीही दहा होमेर वजनापेक्षा कमी गोळा केले नाही, मग त्यांनी ते छावणीत सर्वत्र पसरून ठेवले.

  9. परंतु ते मांस त्यांच्या मुखातच होते आणि ते खाण्याच्या आधी याहवेहचा क्रोध लोकांविरुद्ध भडकला आणि याहवेहने त्यांना भयंकर पीडेने मारले.

  10. त्यांनी वडील मंडळीपुढे सांगावे, “हा आमचा पुत्र हट्टी आणि बंडखोर आहे. तो आमच्या आज्ञा पाळत नसून आमचे ऐकत नाही. तो खादाड व मद्यपी आहे.”

  11. मग त्या नगरातील सर्व लोकांनी त्याला धोंडमार करून ठार मारावे. अशा रीतीने तुमच्यामधील दोष तुम्ही घालवून टाकावे म्हणजे सर्व इस्राएली लोक हे ऐकतील आणि घाबरतील.

  12. एलीचे पुत्र अतिशय नीच होते; ते याहवेहचा आदर करीत नसत.

  13. याजकांची अशी रीत होती की, ज्यावेळेस लोकांमधील कोणी यज्ञार्पण केले व जेव्हा ते मांस शिजविले जात असे, तेव्हा याजकांचा सेवक तीन टोके असलेला काटा घेऊन येत असे

  14. आणि परातीत किंवा पातेल्यात किंवा कढईत किंवा गंगाळात तो काटा टाकून जितके मांस त्या काट्याने वरती येईल याजक ते आपल्या स्वतःसाठी घेत असे, शिलोह येथे आलेल्या सर्व इस्राएल लोकांशी ते असाच व्यवहार करीत असत.

  15. परंतु चरबी जळण्याच्या आधी, याजकाचा सेवक येऊन यज्ञ करीत असलेल्या व्यक्तीला म्हणत असे, “भाजून घेण्यासाठी याजकाला थोडे मांस दे; तो तुझ्याकडून शिजविलेले मांस स्वीकारणार नाही, तर कच्चेच मांस घेईल.”

  16. जर तो व्यक्ती त्याला म्हणाला, “प्रथम चरबी जळू दे, त्यानंतर तुला हवे ते तू घे,” तो सेवक उत्तर देत असे, “नाही, ते आताच दे; जर तू दिले नाही, तर मी ते सक्तीने घेईन.”

  17. या तरुणांचे हे पाप याहवेहच्या दृष्टीने फार मोठे होते, कारण लोकांना याहवेहच्या अर्पणाचा तिरस्कार येऊ लागला होता.

  18. “तीन गोष्टीमुळे पृथ्वी हादरते, चार गोष्टी ती सहन करू शकत नाही:

  19. एक नोकर जो राजा होतो, देवहीन मूर्ख ज्याला भरपूर खाण्यास मिळते,

  20. तुम्ही हस्तिदंतांनी सजविलेल्या पलंगावर लोळता; आणि तुम्ही अंथरुणावर पडून राहतात. उत्तम कोकरे आणि चरबीयुक्त वासरे खाता.

  21. तुम्ही वीणेच्या सुरावर निरर्थक गाणी गाता, आणि दावीदासारखे आहोत याची भ्रामक कल्पना करता.

  22. तुम्ही वाट्या भरून द्राक्षारस पिता. उत्तम तेलांनी स्वतःला माखता, परंतु तुम्ही योसेफाच्या नाशाबद्दल दुःख करत नाही.

  23. म्हणून तुम्ही प्रथम बंदिवासात जाल; आणि तुमची चैनबाजी आणि मौज मस्ती नाहीशी होईल.

  24. आणि मी स्वतःस म्हणेन, “पुढे अनेक वर्षे पुरेल एवढ्या धान्यांचा तुझ्याकडे साठा आहे. आता विसावा घे; खा, पी आणि आनंद कर.” ’

  25. “पण परमेश्वर त्याला म्हणाले, ‘अरे मूर्खा! आज रात्रीच जर तुझा जीव मागितला गेला तर; जे सर्व तू स्वतःसाठी तयार केले आहे ते कोणाचे होईल?’