मुख्य मजकुरावर जा

Gifts from God बद्दल बायबलमधील वचने: Unclassified scriptures relating to both temporal and spiritual

41 वचने · 5 पैलू

Unclassified scriptures relating to both temporal and spiritual बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते समय व ॠतू बदलतात; ते राजांना पदच्युत करतात व इतरांना उंच करतात. शहाण्यांना तेच शहाणपण देतात, सुज्ञांना बुध्दीही देतात.

  2. गहन आणि गूढ रहस्य तेच प्रकट करतात; अंधारात काय आहे हे ते जाणतात आणि प्रकाश त्यांच्यामध्ये राहतो.

  3. हे आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा, मी तुम्हाला धन्यवाद देतो व तुमची स्तुती करतो: तुम्हीच मला ज्ञान आणि सामर्थ्य दिले, मी तुम्हाला जे काही मागितले, ते मला ज्ञात करून दिले, तुम्ही आम्हाला राजाचे स्वप्न ज्ञात करून दिले.”

  4. “पुन्हा, ते प्रवासाला निघालेल्या एका मनुष्यासारखे आहे. त्याने त्याच्या दासांना एकत्र बोलाविले आणि प्रत्येकाला त्याने ठराविक रक्कम दिली.

  5. त्याने एकाला सोन्याचे पाच तालांत, दुसर्‍याला दोन आणि तिसर्‍याला एक, असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि मग तो आपल्या प्रवासाला निघून गेला.

  6. नंतर, ज्या सेवकाला पाच सोन्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने ताबडतोब कामधंदा सुरू केला आणि लवकरच त्याने पाच थैल्या अधिक मिळविल्या.

  7. त्याचप्रमाणे ज्याला दोन सोन्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्यानेही आणखी दोन थैल्या मिळविल्या.

  8. पण ज्याला एक थैली मिळाली, तो गेला व त्याने जमिनीत एक खोल खड्डा केला आणि सुरक्षित राहावी म्हणून त्याच्या मालकाची थैली दडवून ठेवली.

  9. “बर्‍याच काळानंतर त्यांचा धनी परतला आणि त्याने आपल्या सेवकांना पैशाचा हिशोब देण्यासाठी बोलाविले.

  10. ज्याला पाच थैल्या मिळाल्या होत्या, त्याने धन्याला दहा आणून दिल्या. तो म्हणाला, ‘महाराज, तुम्ही मला पाच थैल्या दिल्या होत्या; पाहा, मी त्यावर आणखी पाच मिळविल्या आहेत.’

  11. “त्याचा धनी म्हणाला, ‘शाबास, चांगल्या व विश्वासू दासा! तू लहान गोष्टीत विश्वासू राहिलास; मी तुझी पुष्कळ गोष्टींवर नेमणूक करेन; ये आणि तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो!’

  12. “यानंतर ज्याला दोन थैल्या दिल्या होत्या, तो सेवक सुद्धा पुढे आला; तो म्हणाला, ‘महाराज, तुम्ही मला दोन थैल्या दिल्या होत्या, त्या मी दुप्पट केल्या आहेत.’

  13. “त्याचा धनी म्हणाला, ‘शाबास, चांगल्या व विश्वासू दासा! तू लहान गोष्टीत विश्वासू राहिलास; मी तुझी पुष्कळ गोष्टींवर नेमणूक करेन; ये आणि तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो!’

  14. “नंतर ज्याला एक थैली दिली होती, तो सेवक पुढे आला. तो म्हणाला, ‘महाराज, तुम्ही एक कठोर गृहृस्थ आहात, हे मला माहीत होते. जिथे तुम्ही पेरले नाही, तिथे कापणी करता आणि जिथे तुम्ही विखुरले नाही तिथे गोळा करता.

  15. मला तुमची भीती वाटली, म्हणून मी गेलो व तुम्ही दिलेली एक थैली भूमीत दडवून ठेवली. पाहा, ती आता मी तुम्हाला परत करण्याकरिता आणली आहे.’

  16. “यावर त्याचा धनी म्हणाला, ‘अरे, दुष्ट आणि आळशी दासा, जिथे मी पेरले नाही तिथे मी कापणी करतो आणि जिथे मी विखुरले नाही तिथे गोळा करतो, तुला एवढे तुला माहीत होते.

  17. तर मग तू माझे सोने सावकाराकडे तरी गुंतवून ठेवावयास होते, म्हणजे मी परत आल्यावर मला ते व्याजासहित मिळाले असते.

  18. “ ‘तर त्या सोन्याची थैली त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा थैल्या आहेत त्याला द्या.

  19. कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल, म्हणजे त्यांना विपुलतेने मिळेल. ज्यांच्याकडे नाही, त्यांच्याजवळ जे काही असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.

  20. आता त्या कुचकामी सेवकाला बाहेरच्या अंधारात फेकून द्या; ज्या ठिकाणी रडणे आणि दातखाणे चालेल.’

  21. त्या दिवशी तुम्ही माझ्याजवळ काही मागणार नाही. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, तुम्ही जे काही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते तो तुम्हाला देईल.

  22. आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. माझ्या नावाने मागा म्हणजे मिळेल आणि तुमचा आनंद पूर्ण होईल.

  23. परमेश्वराचे वरदान एका मनुष्याने केलेल्या पापाच्या परिणामासारखे नाही आणि एकाच्या पापामुळे न्याय दंड मिळाला, परंतु वरदान अनेक अपराधानंतर आले आणि आपल्याला नीतिमान गणण्यात आले.

  24. कारण जर एका मनुष्याच्या अपराधामुळे, त्याच मनुष्याच्या द्वारे मरणाने राज्य केले, तर ज्यांना कृपेची व नीतिमत्वाची विपुल दाने मिळाली आहेत, ते येशू ख्रिस्त जे एक मानव आहेत, त्यांच्याद्वारे जीवनात किती विशेषकरून राज्य करतील!

  25. यास्तव एका अपराधामुळे सर्व मनुष्यजाती दंडास पात्र झाली, तसेच न्यायीपणाच्या एका कृत्यामुळे सर्व मनुष्यजात जीवनासाठी नीतिमान ठरविली जाते.