- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Geshur बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
जे प्रदेश अजूनही बाकी होते ते हे: पलिष्टी आणि गशूरींचा सर्व प्रदेश;
पूर्व इजिप्तच्या शिहोर नदीपासून उत्तरेकडे असलेल्या एक्रोनच्या सीमेपर्यंत सर्व मिळून कनानी लोकांचा प्रदेश समजला जात असे, जरी इथे गाझा, अश्दोद, अष्कलोन, गथ आणि एक्रोन असे पाच पलिष्टी शासक होते; अव्वी लोकांचा प्रदेश:
दक्षिणेकडे कनानी लोकांचा सर्व प्रदेश; सीदोनी लोकांचा माराह, अफेक आणि अमोर्यांची सीमा इथपर्यंत आहे;
गिबली लोकांचा प्रदेश; बआल-गादपासून खाली हर्मोन पर्वत ते लेबो हमाथपर्यंत पूर्वेकडील सर्व लबानोन.
“लबानोनपासून मिसरेफोत-मयिम डोंगराळ प्रदेशात राहणारे सर्व रहिवासी, म्हणजे सर्व सीदोन्यांना मी स्वतः इस्राएली लोकांपुढून घालवून देईन. मी तुला सूचना दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांना हा देश त्यांचे वतन म्हणून विभागून देण्यात येईल याची खात्री कर.
इस्राएलचे नऊ गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला तो वतन म्हणून तू विभागणी करून दे.”
मनश्शेहचे बाकीचे अर्धे गोत्र, रऊबेन आणि गाद यांच्या गोत्रांना यार्देनेच्या पूर्वेकडे आपले वतन मिळाले होते, याहवेहचा सेवक मोशेने त्यांच्याशी ठरविल्याप्रमाणे तो प्रदेश त्यांना वाटून दिला होता.
आर्णोन नदीच्या खोर्याच्या सीमेवर असलेले अरोएर व खोर्यांमधील शहरापासून दिबोनपर्यंतचा मेदबाचा सर्व पठाराचा प्रदेश,
अम्मोन्यांच्या सीमेपर्यंतची हेशबोनात राज्य करणारा अमोर्यांचा राजा सीहोन याची सर्व नगरे.
आणि गिलआद देश, गशूरी व माकाथी या लोकांचा सर्व प्रदेश; सर्व हर्मोन पर्वत; सलेकाहपर्यंत सर्व बाशान;
म्हणजे अष्टारोथ व एद्रेईवर ज्याने राज्य केले त्या ओग राजाचे बाशानातील संपूर्ण राज्य. (रेफाईम लोकांपैकी तो शेवटचा होता.) मोशेने त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना वतनातून बाहेर घालवून दिले.
परंतु इस्राएली लोकांनी गशूरी व माकाथी लोकांना घालवून दिले नव्हते, म्हणून आज देखील ते लोक इस्राएली लोकात राहत आहेत.
अबशालोम तिथून पळाला आणि अम्मीहूदाचा पुत्र, गशूरचा राजा तलमय याच्याकडे गेला. परंतु दावीद राजाने आपल्या पुत्रासाठी पुष्कळ दिवस शोक केला.
अबशालोम तिथून पळून गशूरकडे गेला व तिथे तीन वर्ष राहिला.