मुख्य मजकुरावर जा

Elah बद्दल बायबलमधील वचने: 5. Son and successor of Baasha, king of Israel

9 वचने · 7 पैलू

5. Son and successor of Baasha, king of Israel बद्दल वचने

  1. बाशा त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला तिरजाह येथे पुरले गेले. त्याचा पुत्र एलाह त्याचा वारस म्हणून राजा झाला.

  2. त्याचप्रमाणे, हनानीचा पुत्र येहू संदेष्ट्याच्या द्वारे याहवेहचे जे वचन बाशा व त्याच्या घराण्याकडे आले, कारण त्याने याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले व त्याने केलेल्या कृत्यांमुळे याहवेहचा क्रोध भडकविला, त्यामुळे यरोबोअमच्या घराण्यासारखे त्याचे झाले; आणि त्याचा नाश झाला.

  3. यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या सव्विसाव्या वर्षी, बाशाचा पुत्र एलाह तिरजाह येथे इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने दोन वर्षे राज्य केले.

  4. जिम्री, जो त्याच्या अधिकार्‍यांपैकी एक होता, जो त्याच्या निम्म्या रथांचा सेनापती होता, त्याने त्याच्याविरुद्ध कट रचला. एलाह त्यावेळी तिरजाह येथे, राजवाड्याचा अधिकारी अरजाच्या तिरजाह येथील घरी मद्यधुंद झाला होता.

  5. तेव्हा जिम्री आत आला व त्याच्यावर वार करून त्याला मारून टाकले आणि त्याचा उत्तराधिकारी म्हणून राजा झाला. यहूदीयाचा राजा आसाच्या सत्ताविसाव्या वर्षी असे झाले.

  6. तो राजा झाला व राजासनावर बसताच, त्याने बाशाच्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकले. कोणीही पुरुष, नातेवाईक किंवा मित्र त्याने जिवंत सोडला नाही.

  7. याप्रकारे बाशाविरुद्ध याहवेहचे जे वचन येहू संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले गेले होते त्यानुसार, जिम्रीने बाशाच्या संपूर्ण घराण्याचा नाश केला;

  8. कारण बाशाने व त्याचा पुत्र एलाहनी जी पापे केली आणि इस्राएली लोकांना देखील ती पापे करावयाला भाग पाडले होते, म्हणून त्यांनी त्यांच्या व्यर्थ मूर्तींमुळे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला होता.

  9. एलाहच्या कारकिर्दीच्या इतर घटना आणि त्याने जे काही केले, ते इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय?