मुख्य मजकुरावर जा

Dishonesty बद्दल बायबलमधील वचने

44 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “जर कोणी त्याच्या शेजारच्या मनुष्यावर त्याने सोपविलेल्या काही गोष्टीबाबत फसवणूक करून किंवा त्याची काळजी न घेता किंवा काहीतरी चोरी करून किंवा त्यांच्या शेजार्‍याला फसवून याहवेहविरुद्ध विश्वासघात केला असेल, तर तो पाप करतो

  2. किंवा जर कोणाला हरवलेली वस्तू सापडली आणि त्याबद्दल ते खोटे बोलतील आणि तिच्याविषयी खोटी शपथ वाहतील किंवा जर लोकांनी केलेल्या अशा पापाबद्दल ते खोटे बोलतील,

  3. अशा कोणत्याही प्रकारे जर ते पाप करतील आणि त्यांच्या पापांची त्यांना जाणीव होईल, तेव्हा त्यांनी ती चोरलेली वस्तू किंवा बळजबरीने जे घेतले असेल ते किंवा जे काही त्यांच्यावर सोपविलेले असेल किंवा हरवलेली संपत्ती सापडल्यास ती परत करावी—

  4. किंवा अशा कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांनी खोटी शपथ घेतली असेल तर, ज्या दिवशी दोषार्पण आणतील, त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या गुन्ह्याबद्दल वीस टक्के अधिक दंड म्हणून त्या वस्तूच्या मालकाला द्यावा.

  5. आणि दंड म्हणून त्यांनी याजकाकडे, म्हणजेच याहवेहसाठी, कळपातून एक निर्दोष व योग्य किमतीचा एक मेंढा दोषार्पण म्हणून आणावा.

  6. याप्रकारे त्यांच्यासाठी याजक याहवेहसमोर प्रायश्चित करेल आणि ज्या गोष्टींमुळे ते दोषी झाले असतील, त्याबद्दल त्यांना क्षमा केली जाईल.”

  7. “ ‘लांबी, वजन किंवा प्रमाण मापण्यात अप्रामाणिक मापे वापरू नका.

  8. तोलण्यात खरे तराजू आणि वजन उपयोगात आणावे आणि मापण्यात तुम्ही खरे एफा आणि हीन उपयोगात आणावे; कारण ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले तो याहवेह मी तुमचा परमेश्वर आहे.

  9. तुमच्या झोळीत तुम्ही वेगवेगळी वजने ठेऊ नये—एक जड व एक हलके.

  10. तुमच्या घरात दोन वेगवेगळी मापे वापरू नये—एक मोठे व एक लहान.

  11. तुम्ही तुमच्याजवळ तंतोतंत आणि प्रामाणिक वजने आणि मापे बाळगावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला देणार आहे, त्या देशात तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल.

  12. कारण याहवेह तुमचे परमेश्वर या गोष्टी अप्रामाणिकपणे करणार्‍यांचा तिरस्कार करतात.

  13. असे काही लोक आहेत की जे हद्दीच्या खुणा सरकवितात; चोरी करून आणलेले कळप ते चारतात.

  14. अनाथांची गाढवे ते हाकलून लावतात आणि विधवेचा बैल तारण म्हणून ठेवून घेतात.

  15. गरजवंतांना वाटेवरून बाजूला ढकलून देतात देशातील सगळ्या गरिबांना लपून राहण्यास भाग पाडतात.

  16. रानातील रानगाढवां प्रमाणे, गरीब मनुष्य अन्नासाठी कष्ट करीत भटकतात; पडीक जमिनीतून त्यांच्या लेकरांस भोजन पुरवठा होतो.

  17. ते रानातून चारा गोळा करतात आणि दुष्टांच्या द्राक्षमळ्यातून वेचून घेतात.

  18. पुरेशी वस्त्र नसल्याने त्यांना वस्त्रहीनच झोपावे लागते. थंडीत पांघरण्यास देखील त्यांच्याकडे काही नसते.

  19. पर्वतीय वृष्टीने ते ओलेचिंब होतात आणि आश्रय नसल्यामुळे ते खडकांचा आधार घेतात.

  20. पितृहीन बालकांस मातेच्या स्तनापासून ओढून काढले जाते; ऋण फेडून घेण्यासाठी गरिबांची तान्ही बाळे जप्त करतात.

  21. पुरेशी वस्त्र नसल्याने, ते उघडेच असतात; ते धान्याच्या पेंढ्या वाहतात तरी उपाशीच राहतात.

  22. आपल्याच आवारात ते जैतुनाचे तेल काढतात; द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवितात, परंतु तहानेने व्याकूळ झालेले असतात.

  23. ज्यांचे भले करण्याचे तुझ्या आटोक्यात असले, तर ते करण्यास नाकारू नकोस.

  24. एखादी वस्तू तुझ्याजवळ असताना “तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे मी ती तुला देईन” असे तुझ्या शेजार्‍याला म्हणू नकोस.

  25. परंतु पाहा, तुम्ही खोट्या आश्वासनावर भरवसा ठेवता जी निरर्थक आहेत.