मुख्य मजकुरावर जा

Depravity of Man बद्दल बायबलमधील वचने: General references

94 वचने · 1 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पृथ्वीवर मानवामध्ये दुष्टाई खूप वाढलेली आहे आणि त्यांचे विचार आणि कल्पना या सतत दुष्टाईच्याच असतात हे याहवेहने पाहिले.

  2. आपण मनुष्य निर्माण केल्याचा याहवेहला पश्चात्ताप झाला आणि त्यांच्या हृदयाला अतोनात वेदना झाल्या.

  3. म्हणून याहवेह म्हणाले, “मी निर्माण केलेल्या मानवजातीला पृथ्वीतलावरून नष्ट करेन—त्यांच्यासह पशू, सरपटणारे प्राणी, आकाशातील पक्षी यांनाही नष्ट करेन—कारण त्यांना निर्माण केल्याचा मला पश्चात्ताप होत आहे.”

  4. परमेश्वराच्या दृष्टीने पृथ्वी पापाने भ्रष्ट झालेली आणि हिंसाचाराने पूर्णपणे भरलेली होती.

  5. जग किती पातकी झाले आहे आणि समस्त मानवजात किती भ्रष्ट झाली आहे हे परमेश्वराने पाहिले.

  6. तेव्हा परमेश्वर नोआहला म्हणाले, “मी सर्व मनुष्यांचा नाश करेन, कारण त्यांच्यामुळे पृथ्वी हिंसाचाराने भरून गेली आहे. मी निश्चितपणे त्यांचा आणि पृथ्वीचा नाश करणार आहे.

  7. ‘मनुष्य परमेश्वरापेक्षा नीतिमान असू शकतो काय? बलवान मनुष्य त्याच्या उत्पन्नकर्त्यापेक्षा अधिक शुद्ध असू शकतो काय?

  8. जर परमेश्वर आपल्या सेवकांवर भरवसा ठेवत नाही, जर तो आपल्या दूतांवर दोषारोप करतो,

  9. तर मग जे मातीच्या घरात राहतात, ज्यांचा पाया धुळीत आहे, जे पतंगा समान चिरडले जातात, त्यांच्यावर परमेश्वर भरवसा ठेवील काय?

  10. “खरोखर, हे सत्य आहे हे मी जाणतो. परंतु सामान्य मनुष्य परमेश्वरासमोर आपली निर्दोषता कशी सिद्ध करेल?

  11. त्याने जरी परमेश्वराशी वाद करण्याचे ठरविले, तरी हजारातून एकाचेही उत्तर त्याला देता येणार नाही.

  12. मी आधी दोषी ठरविला गेलो आहे, तर मग मी व्यर्थ प्रयत्न का करावे?

  13. जरी मी स्वतःला साबणाने, आणि माझे हात क्षाराने धुतले,

  14. तरी देखील तुम्ही मला चिखलाच्‍या खड्ड्यात टाकाल, आणि माझी वस्त्रे सुद्धा माझा तिरस्कार करतील.

  15. “मनुष्यप्राणी काय आहेत की ते शुद्ध असावेत, किंवा स्त्रीपासून जन्मलेले नीतिमान असावेत?

  16. जर परमेश्वर आपल्या पवित्र जनांचाही देखील भरवसा करीत नाही, त्यांच्या दृष्टीने जर प्रत्यक्ष स्वर्गदेखील शुद्ध नाही,

  17. तर असत्य आणि भ्रष्ट मनुष्य जो पाण्याप्रमाणे दुष्टता पितो, तो किती कमी दर्जाचा असावा!

  18. मग मर्त्य परमेश्वरासमोर कसा नीतिमान ठरेल? स्त्रीपासून जन्मलेला व्यक्ती पवित्र असू शकतो काय?

  19. जर चंद्र सुद्धा परमेश्वरासमोर प्रकाशमान नाही आणि तारेही त्यांच्या नजरेत शुद्ध नाहीत,

  20. मग मानव तो काय, जो केवळ एक कीटक आहे— मानवप्राणी, तो तर केवळ अळीप्रमाणे आहे!”

  21. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर नाही.” ते बहकलेले असून त्यांची कृत्ये दुष्ट आहेत, सत्कर्म करणारा कोणी नाही.

  22. मानवांमध्ये कोणी समंजस आहे का? परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का? हे पाहण्यासाठी याहवेह स्वर्गातून खाली पाहतात.

  23. प्रत्येकजण भटकून गेले आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे; सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.

  24. संगीत दिग्दर्शकासाठी. माहलथवर आधारित, दावीदाचे मासकील. मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर अस्तित्वात नाही.” ते बहकलेले आहेत आणि त्यांची कृत्ये दुष्टच समजावी, कारण सत्कर्म करणारा कोणी नाही.

  25. मानवांमध्ये कोणी समंजस आहे का परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का हे पाहण्यासाठी परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतात.