Skip to content

Demons बद्दल बायबलमधील वचने

28 वचने · 15 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा एक आत्मा पुढे आला आणि याहवेहपुढे उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोहात पाडेन.’

  2. “याहवेहने विचारले, ‘तू हे कसे करशील?’ “तो म्हणाला, ‘मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा होईन.’ “याहवेहने म्हटले, ‘तू त्याला मोहात पाडण्यास यशस्वी होशील. जा आणि तसे कर.’

  3. “तर आता पाहा, याहवेहने तुझ्या या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा घातला आहे. आणि तुझ्यावर अरिष्ट यावे असे याहवेह बोलले आहेत.”

  4. “एखाद्या मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला, म्हणजे तो रुक्ष ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी जागा शोधतो, आणि ती त्याला सापडत नाही,

  5. त्यावेळी तो म्हणतो, ‘जे घर मी सोडले, तिथे परत जाईन.’ तो परत आला म्हणजे त्याला ते घर रिकामे, झाडून स्वच्छ केलेले व व्यवस्थित ठेवलेले असे आढळते.

  6. नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा अधिक दुष्ट असे आणखी सात दुरात्मे आपल्याबरोबर घेऊन येतो व ते आत जाऊन तिथे राहतात, आणि मग त्या मनुष्याची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच या दुष्ट पिढीचे होईल.”

  7. इतक्यात, सभागृहामध्ये अशुद्ध आत्म्याने पछाडलेला एक मनुष्य ओरडला,

  8. “हे नासरेथकर येशू, तुम्हाला आमच्याशी काय काम? तुम्ही आमचा नाश करावयास आले काय? तुम्ही कोण आहात हे मला माहीत आहे—परमेश्वराचा पवित्रजन आहेस!”

  9. आणि यरुशलेमहून आलेले नियमशास्त्र शिक्षक म्हणाले, “तो बालजबूलाने पछाडलेला आहे! तो भुतांचा राजा सैतान याच्या साहाय्याने भुते घालवितो.”

  10. येशूंनी त्यांना जवळ बोलाविले आणि त्यांच्याबरोबर दाखल्याने बोलण्यास सुरुवात केली: “सैतानच सैतानाला कसा काढू शकेल?

  11. जर एखाद्या राज्यात फूट पडली तर ते राज्य स्थिर राहू शकत नाही.

  12. जर एखाद्या घरात फूट पडलेली आहे, तर ते घर स्थिर राहू शकत नाही.

  13. सैतानच स्वतःविरुद्ध झाला आणि सैतानातच फूट पडली तर त्याचा टिकाव लागणार नाही; त्याचा शेवट झालाच आहे.

  14. खरोखर, एखाद्या बळकट माणसाच्या घरात प्रवेश करून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. प्रथम त्या बळकट मनुष्याला बांधले पाहिजे मगच त्याचे घर लुटता येईल.

  15. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, मनुष्याला सर्व पापांची व प्रत्येक दुर्भाषण केल्याची क्षमा होईल,

  16. परंतु जे कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात त्यांना कधीही क्षमा केली जाणार नाही; ते सार्वकालिक पापाचे दोषी आहेत.”

  17. असे त्यांनी म्हटले कारण येशूंमध्ये, “अशुद्ध आत्मा आहे” असे ते म्हणत होते.

  18. नंतर येशू आत गेल्यानंतर, शिष्यांनी खाजगी रीतीने विचारले, “त्याला आम्ही का काढू शकलो नाही?”

  19. त्याने उत्तर दिले, “असा प्रकार फक्त प्रार्थनेद्वारेच निघू शकतो.”

  20. काही यहूदी प्रभू येशूंचे नाव घेऊन फिरत होते आणि ज्यांना दुरात्म्यांनी पछाडलेले होते त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न करीत होते. ते असे म्हणत होते, “ज्या येशूंच्या नावाची पौल घोषणा करीत आहे, त्या नावाने मी तुला आज्ञा करतो की याच्यामधून बाहेर नीघ.”

  21. स्कवा, हा यहूदी मुख्य याजक असून त्याचे सात पुत्र हे काम करीत होते.

  22. एके दिवशी त्या दुरात्म्याने त्यांना म्हटले, “येशू मला माहीत आहे आणि पौलही मला माहीत आहे, परंतु तुम्ही कोण आहात?”

  23. मग ज्या मनुष्यास दुरात्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी मारली आणि त्याच्या शक्तीने त्या सर्वांना शरण आणले. त्यांना अशी मारपीट केली की ते उघडेनागडे व घायाळ होऊन त्या घरातून पळून गेले.

  24. नाही! गैरयहूदी लोक परमेश्वराला यज्ञ अर्पण करीत नसून भुतांना अर्पण करतात आणि भुतांशी तुम्ही सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही.

  25. तुम्ही प्रभूचा प्याला आणि भुतांचा प्याला यातून एकाच वेळी पिऊ शकणार नाही. तसेच प्रभूचा मेज आणि भुतांचा मेज या दोन्हीमध्ये तुम्हाला एकाच वेळी सहभागी होता येत नाही.