मुख्य मजकुरावर जा

Constitution बद्दल बायबलमधील वचने: Agreement between the ruler and people.

13 वचने · 1 पैलू

Agreement between the ruler and people. बद्दल वचने

  1. जेव्हा तो आपल्या राजासनावर बसेल, तेव्हा त्याने लेवी याजकांच्या जवळ असणार्‍या नियमशास्त्रामधून हे सर्व नियम व आज्ञा स्वतः लिहून काढाव्यात.

  2. ती प्रत नेहमीच त्याच्याजवळ असेल. त्याने त्या नियमांचे दररोज वाचन करावे म्हणजे तो याहवेह त्याच्या परमेश्वराचा आदर करण्यास शिकेल आणि या नियमाचे आणि विधीचे सर्व शब्द काळजीपूर्वक पाळेल

  3. व त्याने स्वतःला आपल्या इस्राएली बांधवांपेक्षा अधिक श्रेष्ठ समजू नये आणि नियमांपासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नये. मग तो आणि त्याचे वंशज अनेक पिढ्या इस्राएलावर दीर्घकाळ राज्य करतील.

  4. त्यांनी यहूदीयामध्ये सर्वत्र फिरून सर्व गावातून लेवी आणि इस्राएली कुटुंबप्रमुखांना एकत्र केले. जेव्हा ते यरुशलेमकडे आले,

  5. तेव्हा सर्व मंडळीने परमेश्वराच्या मंदिरात राजाबरोबर एक करार केला. यहोयादा त्यांना म्हणाला, “याहवेहनी दावीदाच्या वंशजांविषयी वचन दिल्याप्रमाणे राजाचा पुत्र राज्य करेल.

  6. यहूदीयाचा राजा, सिद्कीयाह, याने सर्व गुलामांची मुक्तता करण्याचा यरुशलेममधील लोकांशी करार केल्यानंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले.

  7. प्रत्येकाने आपआपले इब्री दास व दासी यांना मुक्त करावे; कोणत्याही यहूदी मनुष्याने दुसर्‍या यहूदी मनुष्यास बंदी बनवून ठेऊ नये.

  8. सर्व अधिपतींनी व लोकांनी हा करार स्वीकारला की ते त्यांच्या दास व दासींना मुक्त करतील व यापुढे त्यांना बंदी बनवून ठेवणार नाहीत. त्यांनी हे मान्य केले व सर्व दास व दासींना मुक्त केले.

  9. पण नंतर त्यांनी आपले मन बदलले व मुक्त केलेल्या आपल्या सेवकांना पुन्हा गुलाम केले.

  10. मग ते राजाकडे गेले आणि त्याच्यासोबत त्याच्या फर्मानाबद्दल बोलले: तुम्ही फर्मान काढले नाही काय की येणार्‍या तीस दिवसांमध्ये कोणीही, महाराजांऐवजी इतर कोणत्याही देवाकडे किंवा मनुष्याकडे प्रार्थना करेल, तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावे? राजाने उत्तर दिले, “हे फर्मान कायम आहे—मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार जो रद्द करता येणार नाही.”

  11. नंतर ते राजाला म्हणाले, “महाराज, यहूदी कैद्यांपैकी दानीएल, तो आपली किंवा आपल्या फर्मानाची मुळीच पर्वा करीत नाही. तो आताही दिवसातून तीन वेळा प्रार्थना करतो.”

  12. जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो फारच अस्वस्थ झाला; दानीएलला यातून वाचवावे असा त्याने निश्चय केला आणि त्याने सूर्यास्त होईपर्यंत दानीएलला कसे सोडवावे याचे सर्वतोपरी प्रयत्न केले.

  13. नंतर लोक जमावाने राजाकडे आले आणि त्यांना म्हटले, “महाराज, मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार राजा जे फर्मान काढतो त्याला ते रद्द करता येणार नाही.”