Skip to content

Citizens बद्दल बायबलमधील वचने

43 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तरी, या गोष्टी निर्विवाद आहेत, म्हणून तुम्ही शांत राहा व उतावळेपणाने भलतेच काही करू नका.

  2. तुम्ही या माणसांना येथे आणले आहे, त्यांनी मंदिरे लुटली नाहीत व आपल्या देवीची निंदाही केली नाही.

  3. जर देमेत्रिय आणि त्याच्या बरोबरच्या कारागिरांना कोणाविरुद्ध काही तक्रार असेल तर न्यायालये उघडी आहेत आणि न्यायाधीशही आहेत. ते आरोप करू शकतात.

  4. जर यापेक्षा इतर गोष्टी असतील तर, त्या न्यायसभेमध्ये मिटविता येतील.

  5. वास्तविक, आजच्या घटनांमुळे आपल्यावर दंगल केल्याचा आरोप येण्याचा धोका आहे, तेव्हा याचे विशिष्ट कारण आपल्याला देता येणार नाही, कारण या दंगलीस तसे काही कारण नव्हते.”

  6. असे बोलून त्याने सभा बरखास्त केली.

  7. प्रत्येकाने प्रशासकीय अधिकार्‍यांच्या अधीन असावे, कारण परमेश्वराने जो नेमून दिला नाही, असा अधिकारच नाही. जे अधिकारी आहेत, ते स्वतः परमेश्वराने नेमलेले आहेत.

  8. यास्तव, जो अधिकारी व्यवस्थेविरुद्ध बंड करतो, तो परमेश्वराने स्थापित केलेल्या व्यवस्थेविरुद्ध बंड करीत असतो आणि जे असे करतात, ते स्वतःवर दंड ओढवून घेतील.

  9. जे योग्य गोष्टी करतात, त्यांना राज्यकर्त्यांची भीती वाटत नाही, परंतु जे अयोग्य करतात त्यांनाच त्याची भीती वाटते. जे अधिकारी आहेत त्यांच्या भयापासून मुक्त असावे, अशी तुमची इच्छा आहे काय? तर मग योग्य तेच करा, म्हणजे तो तुमची प्रशंसा करेल.

  10. यास्तव केवळ संभवनीय दंडाकरिताच नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळे अधिकार्‍यांच्या अधीन राहणे आवश्यक आहे.

  11. याकारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी परमेश्वराचे सेवक आहेत आणि त्यांना पूर्णवेळ सेवा करणे आवश्यक आहे.

  12. प्रत्येकाला त्याचे जे काही देणे असेल, ते द्या: जर कर द्यायचे तिथे कर द्या, महसूल असेल तर महसूल द्या. आणि जिथे सन्मान तिथे सन्मान, जिथे आदर तिथे आदर द्या.

  13. तर सर्वात प्रथम मी विनंती करतो की, सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या आणि उपकारस्तुती करावी.

  14. अशाच प्रकारे राजांसाठी आणि अधिकार्‍यांसाठी करावी, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्यक्रमण करावे.

  15. तुम्ही प्रभूकरिता मनुष्यांमध्ये स्थापित केलेल्या प्रत्येक अधिकार्‍याच्या अधीन असा: मग तो सर्वोच्च अधिकारी म्हणून राजासुद्धा असेल

  16. अथवा राज्यपाल असेल, कारण जे अयोग्य गोष्टी करतात त्यांना शिक्षा करण्यासाठी आणि जे योग्य गोष्टी करतात, त्यांची प्रशंसा करण्यासाठी ते परमेश्वराकडून पाठविलेले आहेत.

  17. कारण परमेश्वराची अशी इच्छा आहे की चांगली कार्ये करून तुम्ही मूर्ख लोकांची अज्ञानी बोलणी बंद करावीत.

  18. तुम्ही मुक्त आहात, परंतु तुमचे स्वातंत्र्य वाईट कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी वापरू नका, तर परमेश्वराच्या दासासारखे जगा.