मुख्य मजकुरावर जा

Christian Conduct बद्दल बायबलमधील वचने: Fulfilling domestic duties

15 वचने · 48 पैलू

Fulfilling domestic duties बद्दल वचने

  1. लेकरांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे.

  2. “तुमच्या आई आणि वडिलांचा मान राखा” अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे.

  3. “यासाठी की तुमचे कल्याण व्हावे आणि तुम्हाला पृथ्वीवर दीर्घायुष्याचा लाभ घेता यावा.”

  4. पित्यांनो, तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका; याउलट प्रभूच्या शिक्षणात व बोधवचनात त्यांना वाढवा.

  5. दासांनो, जसे आपण ख्रिस्ताचे आज्ञापालन करतो, तसेच खर्‍या मनाने आपल्या ऐहिक धन्याचा मान राखा व भय धरा व त्यांच्या आज्ञा पाळा

  6. केवळ त्यांची नजर तुमच्यावर असतानाच त्यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून त्यांचे आज्ञापालन करू नका, तर मनापासून परमेश्वराची इच्छा पूर्ण करणारे ख्रिस्ताचे दास असे व्हा.

  7. ही सेवा लोकांची म्हणून नाही परंतु पूर्ण मनाने आपण जशी प्रभूची करतो अशी समजून करा.

  8. तुम्ही दास किंवा स्वतंत्र असला, तरी प्रत्येक चांगल्या गोष्टीचे वेतन प्रभू तुम्हा प्रत्येकाला देईल, हे लक्षात ठेवा.

  9. पत्नींनो याचप्रकारे तुम्ही तुमच्या पतीच्या आज्ञेत राहा, म्हणजे त्यांच्यापैकी कोणी जर परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवीत नाहीत, तर ते वचनाशिवाय त्यांच्या पत्नींच्या वर्तणुकीद्वारे जिंकले जाऊ शकतात;

  10. कारण ते तुमच्या जीवनातील शुद्धता आणि आदर पाहतात.

  11. जसे की केशरचना आणि सोन्याचे दागदागिने घालणे किंवा आकर्षक वस्त्रे घालणे या बाह्य गोष्टींवर तुमचे सौंदर्य केवळ अवलंबून नसावे,

  12. तर याउलट ते तुमच्या अंतःकरणाच्या, न झिजणार्‍या पण सौंदर्यपूर्ण शांत आणि सौम्य आत्म्याचे असावे, जे परमेश्वराच्या दृष्टीने अति मोलवान आहे.

  13. कारण पूर्वीच्या काळातील पवित्र स्त्रिया ज्यांची परमेश्वरावर आशा होती, त्या अशाच प्रकारे स्वतःला सजवित असत. त्यांनी स्वतःला त्यांच्या पतीच्या अधीन केले होते,

  14. ज्याप्रमाणे सारा अब्राहामाच्या आज्ञेत राहिली आणि त्याला तिचा प्रभू असे म्हणाली. जर तुम्ही भीती न बाळगता जे चांगले ते करीत आहात, तर तुम्ही तिच्या मुली आहात.

  15. पतींनो, त्याच प्रकारे तुम्ही आपल्या पत्नीबरोबर राहत असताना त्या नाजूक आहेत म्हणून सुज्ञतेने राहा, तुमच्याबरोबर त्यादेखील कृपेच्या जीवनाच्या देणग्यांच्या वतनदार आहेत, म्हणून त्यांना मान द्या म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येणार नाही.