Bread बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
शांततेने कण्ह; मेलेल्यासाठी शोक करू नकोस. तुझा पागोटा काढू नकोस आणि आपली पायतणे पायातच असू दे; तुझे तोंड झाकू नकोस किंवा प्रथेनुसार शोक करणार्यांसाठी आणलेले अन्न तू खाऊ नकोस.”
म्हणून सकाळी मी लोकांशी बोललो आणि संध्याकाळी माझी पत्नी मरण पावली. दुसर्या सकाळी मला आज्ञापिल्याप्रमाणे मी केले.
तेव्हा लोकांनी मला विचारले, “या सर्व गोष्टींचे आमच्याशी काय देणे घेणे आहे? तू असे का वागत आहेस?”
तेव्हा मी त्यांना म्हटले, “याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
इस्राएली लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझे पवित्रस्थान; तो बलवान गड ज्याविषयी तुम्ही अभिमान बाळगता, तुमच्या डोळ्यांचा आनंद, ज्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता, तो मी अपवित्र करणार आहे. तुमची मुले व मुली जे तुम्ही मागे सोडले ते तलवारीने पडतील.
आणि जसे मी केले तसेच तुम्हीही कराल. तुम्ही आपली मिशी आणि दाढी झाकणार नाही किंवा प्रथेनुसार शोक करणार्यांसाठी आणलेले अन्न तुम्ही खाणार नाही.
ते सर्वच व्यभिचारी आहेत; रोटी भाजणार्याच्या सतत पेटलेल्या भट्टीप्रमाणे ते आहेत. पीठ मळून ते फुगेपर्यंत तो विस्तव चाळविण्याचे थांबवितो.
आमच्या राजाच्या उत्सवाच्या दिवशी अधिपती द्राक्षारसाने धुंद होतात, आणि त्याने आपला हात कुचेष्टा करणार्यांबरोबर मिळविला आहे.
कारस्थाने करताना त्यांची हृदये तापलेल्या भट्टीसारखी होतात. त्यांची उत्कटता रात्रभर धुमसत असते; सकाळी तो प्रज्वलित अग्नीसारखा पेट घेतो.
ते सर्व भट्टीसारखे तप्त आहेत; ते त्यांच्या अधिपतींना गिळून टाकतात. त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत, त्यातील कोणी मला हाक मारीत नाही.
येशूंनी लोकांना गवतावर बसावयास सांगितले. मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले, स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरी मोडून शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले.
ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या उचलल्या.
जेवणार्या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती. यात स्त्रिया व मुले यांची संख्या धरलेली नाही.
येशूंनी विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात आणि काही लहान मासे.”
तेव्हा त्यांनी जमावाला जमिनीवर बसावयास सांगितले.
मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्या भाकरीबद्दल परमेश्वराचे आभार मानले आणि त्या मोडल्या व शिष्यांना दिल्या आणि त्यांनी ते लोकांना वाढले.
ते सर्वजण जेवले व तृप्त झाले. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे गोळा केले तेव्हा सात टोपल्या भरल्या.
ही परमेश्वराची भाकर आहे, जी स्वर्गातून उतरली आहे आणि जगाला जीवन देते.”
ते म्हणाले, “प्रभूजी, हीच भाकर आपण आम्हाला नेहमी द्या.”
त्यावर येशू जाहीरपणे म्हणाले, “मीच जीवनाची भाकर आहे. जो मजकडे येतो त्याला पुन्हा कधीही भूक लागणार नाही आणि जो मजवर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.
जे मला प्रभूपासून प्राप्त झाले ते मी तुम्हाला सोपवून दिले आहे: ज्या रात्री प्रभू येशूंचा विश्वासघात करण्यात आला, त्या रात्री त्यांनी भाकर घेतली,
आणि आभार मानून ती मोडली आणि ते म्हणाले, “हे माझे शरीर तुमच्याकरिता दिले जात आहे; माझ्या स्मरणार्थ हे करा.”