मुख्य मजकुरावर जा

Betrayal बद्दल बायबलमधील वचने

31 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा येशूंच्या बारा शिष्यांपैकी एक म्हणजे यहूदाह इस्कर्योत याच्यात सैतानाने प्रवेश केला.

  2. तो प्रमुख याजकवर्ग आणि मंदिराचे सुरक्षा अधिकाऱ्यांकडे गेला आणि येशूंना विश्वासघाताने कसे धरून देता येईल, याविषयी त्याने त्यांच्याशी चर्चा केली.

  3. त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला मोबदला देण्याचे मान्य केले.

  4. या गोष्टीला त्याने मान्यता दिली आणि येशूंभोवती समुदाय नसताना त्यांना त्यांच्या हाती देण्याची योग्य संधी तो शोधू लागला.

  5. ते बोलत असतानाच लोकांचा मोठा जमाव तिथे आला आणि येशूंच्या बारा शिष्यांपैकी एक, ज्याला यहूदाह म्हणत होते तो त्यांना मार्ग दाखवित होता. तो येशूंचे चुंबन घ्यावयास जवळ आला,

  6. तेव्हा येशूने त्याला विचारले, “यहूदा, चुंबन घेऊन तू मानवपुत्राचा विश्वासघात करतो काय?”