Skip to content

Beds बद्दल बायबलमधील वचने

12 वचने · 28 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तो ते नाकारत म्हणाला, “मी खाणार नाही.” परंतु त्याच्या माणसांनीही त्या स्त्रीबरोबर त्याला आग्रह केला, तेव्हा त्याने त्यांचे म्हणणे मानले. तो जमिनीवरून उठून पलंगावर बसला.

  2. त्या स्त्रीच्या घरी एक पुष्ट वासरू होते, ते तिने लवकर कापले. तिने थोडेसे पीठ घेतले, ते मळले आणि खमीर न घालता भाकरी भाजल्या.

  3. नंतर तिने शौल आणि त्याची माणसे यांच्यासमोर ते वाढले आणि त्यांनी ते खाल्ले. नंतर त्याच रात्री ते तिथून निघून गेले.

  4. पाहा! ही तर शलोमोनाची पालखी आहे! इस्राएलातील निवडलेल्या साठ योद्ध्याच्या दलाच्या पहाऱ्यात आलेली आहे.

  5. ते सर्व धनुर्धारी, आणि युद्धात अनुभवी आहेत. रात्री होणार्‍या आतंकासाठी सज्ज असलेले, प्रत्येकाने आपली तलवार सोबत घेतली आहे.

  6. शलोमोन राजाने लबानोनाच्या लाकडाची ही पालखी; स्वतःसाठी बनविली आहे.

  7. तुम्ही हस्तिदंतांनी सजविलेल्या पलंगावर लोळता; आणि तुम्ही अंथरुणावर पडून राहतात. उत्तम कोकरे आणि चरबीयुक्त वासरे खाता.

  8. तुम्ही वीणेच्या सुरावर निरर्थक गाणी गाता, आणि दावीदासारखे आहोत याची भ्रामक कल्पना करता.

  9. तुम्ही वाट्या भरून द्राक्षारस पिता. उत्तम तेलांनी स्वतःला माखता, परंतु तुम्ही योसेफाच्या नाशाबद्दल दुःख करत नाही.

  10. एका परूश्याने येशूंना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रण दिले व येशूंनी ते स्वीकारले. ते भोजनास बसले असताना,

  11. येशू परूश्याच्या घरी भोजनास गेले आहेत हे ऐकून, त्या नगरातील एक पापी स्त्री मोलवान सुगंधी तेलाने भरलेली एक संगमरवरी कुपी घेऊन तिथे आली.

  12. आत जाऊन ती येशूंच्या मागे उभी राहिली व रडू लागली आणि आपल्या अश्रूंनी त्यांचे पाय भिजवू लागली. मग तिने ते आपल्या केसांनी पुसले. त्यांच्या पायांची चुंबने घेतली आणि सुगंधी तेल त्यावर ओतले.