Skip to content

Bath-Sheba बद्दल बायबलमधील वचने

34 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हग्गीथेचा पुत्र अदोनियाह हा शलोमोनची आई बथशेबाकडे आला. बथशेबाने त्याला विचारले, “तू शांतीने आला आहेस काय?” त्याने उत्तर दिले “होय, मी शांतीने आलो आहे.”

  2. नंतर तो पुढे म्हणाला, “मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.” ती म्हणाली, “तू बोलू शकतो.”

  3. तेव्हा तो म्हणाला, “तुम्हाला तर ठाऊकच आहे की वास्तविकता राज्य माझे होते. त्यांचा राजा म्हणून सर्व इस्राएलची नजर माझ्याकडे होती. परंतु ते पालटले आणि राज्य माझ्या भावाकडे गेले आहे; कारण त्याला ते याहवेहकडून आले आहे.

  4. तर आता मला तुमच्याकडे एक विनंती करावयाची आहे. मना करू नका.” ती म्हणाली, “बोल.”

  5. तो पुढे म्हणाला, “शलोमोन राजा तुम्हाला मना करणार नाही; कृपया त्यांना विचार की त्यांनी शूनेमकरीण अबीशग ही मला पत्नी म्हणून द्यावी.”

  6. बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी तुझ्या वतीने राजाशी बोलेन.”

  7. जेव्हा बथशेबा शलोमोन राजाकडे त्याच्याशी अदोनियाहसाठी बोलण्यास गेली, तिला पाहताच राजा तिला भेटण्यास उभा राहिला, त्याने तिच्यापुढे डोके लवविले. राजाच्या आईसाठी आसन मागविले आणि ती त्याच्या उजवीकडे बसली.

  8. ती म्हणाली, “मला तुझ्याकडे एक लहानशी विनंती करावयाची आहे, मला मना करू नकोस.” राजाने म्हटले, “माझ्या माते, माग, मी तुला मना करणार नाही.”

  9. तेव्हा ती म्हणाली, “शूनेमकरीण अबीशग हिला तुझा भाऊ अदोनियाह याला पत्नी म्हणून दे.”