Skip to content

Ahithophel बद्दल बायबलमधील वचने

35 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु एका तरुण मनुष्याने त्यांना पाहिले आणि त्याने जाऊन अबशालोमला सांगितले. तेव्हा दोघेजण त्वरित बहूरीम येथे एका माणसाच्या घरी गेले. त्याच्या घराच्या अंगणात एक विहीर होती, तिच्यात ते उतरले.

  2. त्याच्या पत्नीने विहिरीच्या तोंडावर एक झाकण टाकले व त्यावर धान्य पसरले. त्याबद्दल कोणालाही काहीही कळले नाही.

  3. अबशालोमाच्या माणसांनी जेव्हा त्या बाईच्या घरी येऊन विचारपूस केली, “अहीमाज व योनाथान कुठे आहेत?” तिने उत्तर दिले, “ते ओढ्यापलीकडे गेले आहेत.” त्या माणसांनी शोध केला, पण त्यांना ते सापडले नाही. म्हणून ते यरुशलेमास परत गेले.

  4. ते तिथून निघून गेल्यानंतर, दोघेजण विहिरीतून बाहेर आले आणि दावीद राजाला जाऊन सांगितले, ते त्याला म्हणाले, “लवकर निघा आणि नदी पार करा; अहीथोफेलने तुमच्याविरुद्ध अमुक सल्ला दिला आहे.”

  5. तेव्हा दावीद आणि त्याच्या बरोबरच्या सर्व लोकांनी यार्देन नदी पार केली. दिवस उजाडेपर्यंत यार्देन पार केली नाही असा कोणीही मागे राहिला नाही.

  6. इकडे अबशालोमने आपल्या सल्ल्यानुसार केले नाही असे अहीथोफेलने पाहिले, तेव्हा त्याने आपल्या गाढवावर खोगीर घातले आणि आपल्या जन्मगावी, आपल्या घराकडे निघून गेला. त्याने आपले घर नीटनेटके करून फाशी घेतली. तो मरण पावला आणि त्याला त्याच्या पित्याच्या कबरेत पुरले.

  7. अहीथोफेल राजाचा सल्लागार होता. हूशाई अर्की खाजगी सल्लागार होता.

  8. ज्याने माझी निंदा केली, तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; मी लपून बसलो असतो आणि निसटून गेलो असतो.

  9. परंतु माझी निंदा करणारा तूच होतास, माझ्यासारखाच मनुष्य, माझा सोबती आणि माझा जिवलग मित्र,

  10. जेव्हा आम्ही आराधकांसह चालत होतो, तेव्हा त्याच्यासोबत परमेश्वराच्या भवनातील मधुर सहभागितेचा मी आनंद घेतला होता.