मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योहान ४:१४सुमारे इ.स. ३०

    परंतु जे पाणी मी देतो ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. खरोखर, जे पाणी मी त्यांना देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी जिवंत पाण्याचा झरा असे होईल.”

  2. योहान ४:१५सुमारे इ.स. ३०

    ती स्त्री म्हणाली, “महाराज, मला हे पाणी द्या, म्हणजे मला तहान लागणार नाही आणि सतत पाणी काढण्यासाठी येथे येण्याची गरजही पडणार नाही.”

  3. योहान ४:१६सुमारे इ.स. ३०

    येशूंनी तिला सांगितले, “जा आणि तुझ्या पतीला इकडे बोलावून आण.”

  4. योहान ४:१७सुमारे इ.स. ३०

    परंतु ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” त्यावर येशू म्हणाले, “मला पती नाही हे जे तू म्हणतेस ते अगदी खरे आहे.

  5. योहान ४:१८सुमारे इ.स. ३०

    कारण वस्तुस्थिती अशी आहे की तुला पाच पती होते आणि जो पुरुष सध्या तुझ्याबरोबर आहे, तो तुझा पती नाही. तू जे काही सांगितले, ते सर्व सत्य आहे.”

  6. योहान ४:१९सुमारे इ.स. ३०

    “महाराज,” ती स्त्री उद्गारली, “आपण खरोखर संदेष्टे आहात असे मला दिसते.

  7. योहान ४:२०सुमारे इ.स. ३०

    आमच्या पूर्वजांनी या डोंगरावर परमेश्वराची उपासना केली, परंतु तुम्ही यहूदी, उपासनेचे स्थान यरुशलेममध्येच आहे असा आग्रह धरता.”

  8. योहान ४:२१सुमारे इ.स. ३०

    येशू तिला म्हणाले, “बाई, माझ्यावर विश्वास ठेव, अशी वेळ येईल की त्यावेळी तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर किंवा यरुशलेमात करणार नाही.

  9. योहान ४:२२सुमारे इ.स. ३०

    तुम्ही शोमरोनी तुम्हाला माहीत नाही, अशाची उपासना करता; पण जो आम्हाला माहीत आहे आम्ही त्याची उपासना करतो. कारण उद्धार यहूदी लोकांपासून आहे.

  10. योहान ४:२३सुमारे इ.स. ३०

    अशी वेळ येत आहे आणि आली आहे की खरे उपासक पित्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करतील. पिता अशाच प्रकारच्या उपासकांना शोधीत आहे.

  11. योहान ४:२४सुमारे इ.स. ३०

    परमेश्वर आत्मा आहे आणि त्यांच्या भक्तांनी त्यांची उपासना आत्म्याने व खरेपणानेच करावयास पाहिजेत.”

  12. योहान ४:२५सुमारे इ.स. ३०

    ती स्त्री म्हणाली, “मला माहीत आहे की, ख्रिस्त म्हणतात तो मसिहा येणार आहे आणि तो आला म्हणजे सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करून सांगेल.”

  13. योहान ४:२६सुमारे इ.स. ३०

    यावर येशूंनी जाहीरपणे सांगितले, “मी, तुजबरोबर बोलत आहे तोच मी आहे.”

  14. योहान ४:२७सुमारे इ.स. ३०

    त्यांचे शिष्य परतले आणि ते एका बाईशी बोलत आहेत हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. परंतु, “तुम्हाला काय हवे आहे?” किंवा “तिच्याबरोबर कसला संवाद करीत होते?” असे त्यांना त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही.

  15. योहान ४:२८सुमारे इ.स. ३०

    मग, तिने आपली पाण्याची घागर तिथेच सोडली आणि नगरात जाऊन लोकांना म्हणाली,

  16. योहान ४:२९सुमारे इ.स. ३०

    “चला, या मनुष्याला पाहा, मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली. तोच ख्रिस्त असू शकेल का?”

  17. योहान ४:३०सुमारे इ.स. ३०

    तेव्हा ते नगरातून बाहेर आले व त्यांच्याकडे वाटचाल करू लागले.

  18. योहान ४:३१सुमारे इ.स. ३०

    “गुरुजी, आपण काही खावे,” म्हणून शिष्य त्यांना आग्रह करू लागले.

  19. योहान ४:३२सुमारे इ.स. ३०

    पण ते त्यांना म्हणाले, “माझ्याजवळ असे अन्न आहे ज्याबद्दल तुम्हाला काहीच ठाऊक नाही.”

  20. योहान ४:३३सुमारे इ.स. ३०

    त्यावर शिष्य एकमेकांना विचारू लागले, “यांना कोणी अन्न आणून दिले का?”

  21. योहान ४:३४सुमारे इ.स. ३०

    येशूंनी म्हटले, “ज्याने मला पाठविले त्यांच्या इच्छेप्रमाणे करणे व त्यांचे कार्य पूर्ण करणे हेच माझे अन्न.

  22. योहान ४:३५सुमारे इ.स. ३०

    ‘चार महिन्यांचा अवधी कापणी करण्यासाठी आहे असे तुमचे म्हणणे आहे ना?’ तर मी तुम्हाला सांगतो, आपली नजर वर करून शेते पाहा! ती कापणीसाठी तयार आहेत.

  23. योहान ४:३६सुमारे इ.स. ३०

    आता कापणार्‍याला मजुरी मिळत आहे व तो सार्वकालिक जीवनासाठी पीक साठवून ठेवत आहे; यासाठी की, पेरणार्‍याने व कापणार्‍यानेही एकत्रित मिळून आनंद करावा.

  24. योहान ४:३७सुमारे इ.स. ३०

    ‘एक पेरतो व दुसरा कापणी करतो,’ अशी जी म्हण आहे ती खरी आहे.

  25. योहान ४:३८सुमारे इ.स. ३०

    जिथे तुम्ही पेरणी केली नाही, तिथे कापणी करण्यासाठी मी तुम्हाला पाठविले; इतरांनी पेरणी करण्याचे कष्ट केले होते आणि त्यांच्या श्रमाचे प्रतिफळ तुम्हाला मिळाले आहे.”