मुख्य मजकुरावर जा

Pharaoh

138 वचने

Pharaoh चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे सर्व यासाठी घडले की इस्राएलने याहवेह त्यांच्या परमेश्वराविरुद्ध पाप केले, ज्यांनी त्यांना इजिप्तचा राजा फारोहच्या हातून इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले होते, त्यांनी इतर दैवतांची उपासना केली

  2. फारोह व त्याच्या अधिकाऱ्याविरुद्ध व त्याच्या प्रदेशातील सर्व लोकांविरुद्ध तुम्ही चिन्ह व चमत्कार केले, कारण ते लोक त्यांना किती कठोरपणाची वागणूक देत होते, हे तुम्हाला ठाऊक होते. तुमच्या नावाचा महिमा तुम्ही प्रकट केला आणि तो आजवर आहे.

  3. हे इजिप्त, त्यांनीच तुझ्यामध्ये महान चमत्कार केले, जे फारोह आणि त्याच्या सर्व लोकांविरुद्ध होते.

  4. परंतु फारोह आणि त्याचे सैन्य तांबड्या समुद्रात बुडवून टाकले; त्यांची करुणा सनातन आहे.

  5. माझ्या प्रिये, फारोहच्या रथामधील घोडीशी, मी तुझी तुलना करतो.

  6. इजिप्तच्या फारोहच्या सैन्याने इजिप्तमधून कूच केले आहे, ही बातमी जेव्हा बाबेल्यांनी ऐकली, तेव्हा त्यांनी यरुशलेमच्या वेढ्यापासून माघार घेतली.

  7. “इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: यहूदीयाच्या राजाने माझा संदेश विचारण्यासाठी तुला पाठविले आहे, तर त्याला सांग, ‘फारोहचे सैन्य इजिप्तमधून तुमच्या साहाय्यासाठी आले असले, तरी ते इजिप्तला परत जातील.

  8. जेव्हा फारोहच्या सैन्यामुळे बाबेलच्या सैन्याने यरुशलेमहून माघार घेतली,

  9. “यहूदी लोक तुझ्याकडे पाहत असताना त्यांच्या समक्ष तहपनहेस येथील फारोहच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी फरसबंदीचे जे दगड आहेत, त्यांच्यामध्ये काही मोठे धोंडे मातीत पुरून टाक,

  10. मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करेन आणि माझी तलवार त्याच्या हाती देईन पण फारोहचे हात मोडेन आणि तो बाबेलच्या राजासमोर मरणपंथास टेकलेल्या घायाळ मनुष्याप्रमाणे कण्हेल.

  11. त्याला बाहेर ठेवले असताना, फारोहच्या कन्येने त्याला घेतले आणि स्वतःचा पुत्र म्हणून त्याचे पालनपोषण करून त्याला वाढवले.

  12. शास्त्रलेख फारोहला सांगते: “मी तुला याच एका उद्देशाने राखून ठेवले की, माझे सामर्थ्य तुझ्यामध्ये प्रकट व्हावे आणि माझे नाव अखिल पृथ्वीवर जाहीर व्हावे.”

  13. मोशे मोठा झाल्यावर त्यानेही विश्वासाद्वारे फारोह राजाचा नातू म्हणवून घेण्यास नाकारले,