Skip to content

Hanun

8 वचने · 1 कुटुंब सदस्य

Hanun चा उल्लेख असलेली वचने

  1. कालांतराने, अम्मोन्यांचा राजा मरण पावल्यानंतर, त्याचा पुत्र हानून राजा झाला.

  2. तेव्हा दावीदाने विचार केला, “जशी त्याचा पिता नाहाशने माझ्यावर दया दाखविली होती, तशी दया मी त्याचा पुत्र हानूनवर दाखवेन.” म्हणून दावीदाने हानूनच्या पित्याविषयी आपली सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवले. जेव्हा दावीदाची माणसे अम्मोनी लोकांच्या प्रदेशात आले,

  3. तेव्हा अम्मोनी अधिकार्‍यांनी त्यांचा धनी हानून याला विचारले, “दावीदाने सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवून आपल्या पित्याचा आदर केला आहे असे आपणास वाटते काय? दावीदाने त्यांना आपणाकडे केवळ शहराची पहाणी करण्यास, ते हेरण्यास व ते उद्ध्वस्त करण्यास पाठवले नाही काय?”

  4. तेव्हा हानूनने दावीदाच्या राजदूतांना ताब्यात घेऊन, प्रत्येक मनुष्याच्या अर्ध्या दाढीचे मुंडण केले व त्यांची वस्त्रे मधोमध नितंबापर्यंत फाडून त्यांना परत पाठवून दिले.

  5. दावीदाने विचार केला, “हानूनचा पिता नाहाशने माझ्यावर दया दाखविली होती, तशी दया मी हानूनवर दाखवेन.” म्हणून दावीदाने हानूनच्या पित्याविषयी आपली सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवले. जेव्हा दावीदाचे राजदूत अम्मोनी लोकांच्या प्रदेशात आले,

  6. तेव्हा अम्मोनी अधिकार्‍यांनी हानूनला विचारले, “दावीदाने सहानुभूती व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे राजदूत पाठवून तुमच्या पित्याचा आदर केला आहे असे आपणास वाटते काय? दावीदाने त्यांना आपणाकडे केवळ देशाची पहाणी करण्यास, ते हेरण्यास व ते उद्ध्वस्त करण्यास पाठवले नाही काय?”

  7. तेव्हा हानूनने दावीदाच्या राजदूतांना ताब्यात घेऊन, प्रत्येकाचे मुंडण केले व त्यांची वस्त्रे मधोमध नितंबापर्यंत फाडून त्यांना परत पाठवून दिले.

  8. जेव्हा अम्मोनी लोकांना समजून आले की, दावीदाला आपण घृणास्पद झालो आहोत, तेव्हा हानून व अम्मोन्यांनी अराम-नहराईम, अराम-माकाह व सोबाह येथून एक हजार तालांत चांदी देऊन सैन्य, रथ व घोडदळ ही भाड्याने आणली.