Skip to content

Mesopotamia बद्दल बायबलमधील वचने

10 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. मग त्या सेवकाने अब्राहामाचे दहा उंट घेऊन, आपल्या धन्याच्या मालमत्तेतील उत्तमोत्तम वस्तू निवडून त्या सर्व उंटांवर लादल्या. मग तो प्रवास करीत अराम-नहराईम मधील नाहोराच्या नगरास गेला.

  2. जेव्हा इसहाकाने रिबेकाहशी विवाह केला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता. रिबेकाह पद्दन-अराम येथील अरामी बेथुएलाची कन्या आणि लाबानाची बहीण होती.

  3. कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आला, तेव्हा हे मार्गात अन्न व पाणी घेऊन तुम्हाला भेटण्यास आले नाहीत, एवढेच नव्हे तर अराम-नहराईम येथील पथोर नगरात राहणारा बौराचा पुत्र बलामास द्रव्य देऊन तुम्हाला शाप देण्यासाठी आणले.

  4. याहवेहचा क्रोध इस्राएलावर भडकला म्हणून त्यांनी, जिथे इस्राएली लोक आठ वर्षे गुलामगिरीत होते त्या अराम-नहराईम राजा कुशन-रिशाथईमच्या हाती त्यांना विकले.

  5. परंतु जेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहचा धावा केला, तेव्हा त्यांनी त्यांना सोडविण्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ केनाजचा पुत्र ओथनिएलला सुटका करणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली.

  6. याहवेहचा आत्मा त्याच्यावर उतरला, जेणेकरून तो इस्राएलाचा शास्ता झाला आणि युद्धासाठी निघाला. याहवेहने अरामचा राजा कुशन-रिशाथईमला अथनिएलाच्या हाती दिले, ज्याने त्याच्यावर ताबा घेतला.

  7. जेव्हा अम्मोनी लोकांना समजून आले की, दावीदाला आपण घृणास्पद झालो आहोत, तेव्हा हानून व अम्मोन्यांनी अराम-नहराईम, अराम-माकाह व सोबाह येथून एक हजार तालांत चांदी देऊन सैन्य, रथ व घोडदळ ही भाड्याने आणली.

  8. त्याने भाड्याने बत्तीस हजार रथ व सारथी आणले. तसेच माकाहचा राजा व त्याचे संपूर्ण सैन्य बोलाविले. त्या सैन्याने मेदबा येथे तळ दिला. अम्मोन्यांनी आपल्या नगरातून भरती केलेल्या सैन्यासह तिथे येऊन युद्धासाठी मोर्चा बांधला.

  9. आम्ही येथे पार्थी, मेदिया आणि एलामी लोक आहोत; मेसोपोटामिया रहिवासी, यहूदीया आणि कप्पदुकिया, पंत आणि आशिया,

  10. स्तेफनाने त्यावर असे उत्तर दिले: “बंधुजनहो व वडिलांनो, माझे ऐका! आपला पिता अब्राहाम हारानात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटामिया देशात असताना गौरवशाली परमेश्वर त्याला प्रकट झाले.