मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर पौल सभागृह सोडून तीतुस यूस्त नावाच्या माणसाच्या घरी गेला. तो परमेश्वराचा उपासक होता आणि सभागृहा शेजारीच राहत असे.

  2. तेव्हा पौल त्यांना करिंथ येथे दीड वर्ष परमेश्वराचे वचन शिकवीत राहिला.

  3. त्यांनी पौलावर असा आरोप केला, “हा मनुष्य, आमच्या नियमशास्त्राविरुद्ध परमेश्वराची उपासना करण्यासाठी लोकांची मने वळवित आहे.”

  4. परंतु निघताना मात्र त्याने त्यांना वचन दिले, “परमेश्वराची इच्छा असेल, तर मी पुन्हा येईन.” मग इफिस सोडून जलमार्गाने तो निघाला.

  5. तो धैर्याने सभागृहामध्ये बोलू लागला. जेव्हा प्रिस्किल्ला आणि अक्विला यांनी त्याचा संदेश ऐकला, तेव्हा त्यांनी त्याला त्यांच्या घरी आमंत्रित केले आणि परमेश्वराचा मार्ग त्याला अधिक स्पष्टपणे समजावून सांगितला.

  6. मग पौलाने सभागृहामध्ये प्रवेश केला आणि अतिशय धैर्याने परमेश्वराच्या राज्याविषयी संवाद करीत व प्रमाण पटवीत तीन महिने चर्चा करीत राहिला.

  7. परमेश्वराने पौलाद्वारे असाधारण अशी आश्चर्यकृत्ये केली,

  8. या रीतीने प्रभूचे वचन वाढत जाऊन प्रबळ झाले.

  9. त्यांनी पश्चात्ताप करून परमेश्वराकडे वळणे आवश्यक आहे आणि आपल्या प्रभू येशूंवर विश्वास ठेवावा याविषयी यहूदी व गैरयहूदी लोकांमध्ये मी घोषणा करीत आलो आहे.

  10. तरीपण, माझे जीवन माझ्याकरिता मोलाचे नाही; माझे एकच ध्येय आहे की धाव संपविणे व जे कार्य प्रभू येशूंनी मला दिले आहे ते पूर्ण करणे म्हणजे परमेश्वराने जी कृपा केली आहे, त्याची शुभवार्ता इतरांना सांगणे हे होय.

  11. “आणि आता मला माहीत झाले आहे की ज्या तुम्हामध्ये मी परमेश्वराच्या राज्याचा प्रचार करीत फिरत होतो, त्या तुम्ही मला पुन्हा पाहणार नाही.

  12. कारण परमेश्वराचे संपूर्ण मनोरथ सांगण्यास मी कधीही मागेपुढे पाहिले नाही.

  13. तुम्ही स्वतःवर आणि सर्व कळपावर लक्ष ठेवा, कारण पवित्र आत्म्याने तुम्हाला देखरेख करण्यासाठी नेमले आहे. परमेश्वराने स्वतःच्या रक्ताने ज्या मंडळीला विकत घेतले आहे, त्या परमेश्वराच्या मंडळीचे तुम्ही मेंढपाळ व्हा.

  14. “आणि आता मी तुम्हाला परमेश्वरावर व त्यांच्या कृपेच्या वचनांवर सोपवितो, ते वचन तुमची वृद्धी करण्यास आणि पवित्र केलेल्या सर्वांमध्ये वतन द्यावयास समर्थ आहे.

  15. क्षेमकुशल विचारल्यानंतर पौलाने आपल्या सेवेद्वारे परमेश्वराने गैरयहूद्यांमध्ये जे कार्य केले होते त्याचा सविस्तर अहवाल दिला.

  16. “मी एक यहूदी आहे आणि माझा जन्म किलिकियामधील तार्सस शहरात झाला, परंतु मी या शहरात वाढलो. माझे शिक्षण गमालियेलच्या मार्गदर्शनात झाले व आपल्या पूर्वजांच्या नियमशास्त्राचे सविस्तर प्रशिक्षण मला मिळाले. जसे तुम्ही आज परमेश्वराविषयी आवेशी आहात तसाच मीही होतो.

  17. “नंतर त्याने मला असे सांगितले: ‘आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराने तुझी निवड यासाठी केली आहे की, तू त्यांची इच्छा जाणून घ्यावीस आणि जे नीतिमान आहेत त्यांना पाहावेस व त्यांच्या तोंडचे शब्द ऐकावेस.

  18. मग न्यायसभेकडे निरखून पाहत पौल म्हणाला, “माझ्या बंधूंनो, मी आजपर्यंत माझे परमेश्वरा संबंधीचे कर्तव्य पूर्ण सदसद्विवेकबुद्धीने करीत आलो आहे.”

  19. तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुन्याचा लेप लावलेल्या भिंती, परमेश्वर तुझ्यावर वार करतील! तू येथे नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो, परंतु तू स्वतः नियमशास्त्राचा भंग करून माझ्यावर वार करण्याची आज्ञा देतोस काय!”

  20. पौलाच्या शेजारी जे उभे होते ते त्याला म्हणाले, “तू परमेश्वराच्या महायाजकाचा अपमान करण्याचे धैर्य कसे केले!”

  21. तेव्हा मोठा गोंधळ सुरू झाला, काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परूशी होते ते उठून उभे राहिले आणि जोरजोराने वादविवाद करू लागले. “आम्हाला या मनुष्यात काही अयोग्य असे आढळत नाही, ते म्हणाले, जर त्याच्याशी कदाचित एखादा आत्मा किंवा देवदूत बोलला असेल तर कसे समजावे?”

  22. तरी एक गोष्ट कबूल करतो की मी आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराची उपासना करतो व त्या मार्गाचा अनुयायी आहे ज्याला हे लोक पंथ असे म्हणतात. त्याबरोबरच जे नियमशास्त्राला धरून आहे त्या प्रत्येक गोष्‍टीवर व संदेष्ट्यांच्या लिखाणात जे लिहिले आहे, त्या प्रत्येक वचनावर माझा विश्वास आहे,

  23. परमेश्वरामध्ये या लोकांची जी आशा आहे तीच माझीसुद्धा आहे, ती ही की नीतिमान व अनीतिमान या दोघांचेही पुनरुत्थान होईल.

  24. यामुळेच मी परमेश्वरासमोर आणि मनुष्यासमोर माझी विवेकबुद्धी सतत स्वच्छ ठेवण्यासाठी खूप कष्ट घेतो.

  25. परमेश्वराने आपल्या पूर्वजांना दिलेल्या अभिवचनांवर माझी आशा आहे म्हणून माझी आज चौकशी होत आहे व मी येथे उभा आहे.