मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: पश्चात्ताप करा! तुमच्या मूर्तींपासून वळा आणि आपली अमंगळ कृत्ये टाकून द्या!

  2. “ ‘जेव्हा इस्राएलातील किंवा इस्राएलमध्ये राहत असलेला कोणी परदेशी स्वतःला माझ्यापासून वेगळे करतात आणि त्यांच्या हृदयात मूर्ती बसवितात आणि आपल्या मुखासमोर दुष्ट अडखळण्याचे धोंडे ठेवून मग माझ्याविषयी विचारण्यास संदेष्ट्याकडे जातात, त्यांना मी याहवेह स्वतः उत्तर देईन.

  3. मी आपले मुख त्यांच्याविरुद्ध करेन आणि त्यांना एक चिन्ह व निंदेचा एक विषय असे करेन. मी त्यांना माझ्या लोकांमधून नाहीसे करेन, तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  4. “ ‘जर एखादा संदेष्टा भविष्य सांगण्यासाठी भुलविला गेला, तर त्याला मी याहवेहने भुलविले आहे आणि त्याच्याविरुद्ध मी माझा हात लांब करेन आणि माझ्या इस्राएली लोकांतून त्यांचा नाश करेन.

  5. तेव्हा इस्राएली लोक माझ्यापासून आणखी बहकून जाणार नाहीत किंवा ते स्वतःला आपल्या सर्व पापांनी आणखी विटाळविणार नाहीत. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

  6. याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  7. “हे मानवपुत्रा, जर एखाद्या देशाने अविश्वासू राहून माझ्याविरुद्ध पाप केले आणि त्यांचा अन्नपुरवठा बंद करण्यास व त्यावर दुष्काळ आणून त्यातील लोक व जनावरे मारून टाकण्यास त्याविरुद्ध मी माझा हात लांब केला,

  8. जरी नोआह, दानीएल व इय्योब हे तिघे त्या देशात असते; तरी त्यांच्या नीतिमत्वामुळे केवळ तेच वाचले असते, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  9. “किंवा त्या देशभरात मी जंगली जनावरे पाठवली आणि त्यांनी तो अपत्यहीन केला आणि जंगली जनावरांमुळे कोणीही त्यातून येणे जाणे करीत नाही, त्यामुळे देश ओसाड पडला,

  10. तर सार्वभौम याहवेह घोषित करतात की माझ्या जिवाची शपथ, जरी हे तीन पुरुष त्यात असले, ते आपल्या स्वतःच्या मुला-मुलींना वाचवू शकले नसते. केवळ तेच वाचले असते, परंतु देश ओसाड पडला असता.

  11. “किंवा त्या देशाविरुद्ध तलवार आणली आणि म्हटले, ‘तलवार संपूर्ण देशभर चालो,’ आणि त्यातील सर्व लोकांना व जनावरांना मारून टाकले,

  12. सार्वभौम याहवेह जाहीर करतात माझ्या जिवाची शपथ, जरी हे तीन पुरुष त्यात असले, ते आपल्या स्वतःच्या मुला-मुलींना वाचवू शकले नसते. केवळ तेच वाचले असते.

  13. “किंवा त्या देशावर मी मरी पाठवून त्यातील लोकांना व जनावरांना मारून रक्तपाताने माझा क्रोध त्यावर ओतला,

  14. तर सार्वभौम याहवेह जाहीर करतात की माझ्या जिवाची शपथ, जरी नोआह, दानीएल व इय्योब त्यात असते, ते आपल्या मुलांना किंवा मुलींना वाचवू शकले नसते. त्यांच्या नीतिमत्वामुळे केवळ ते आपलाच जीव वाचवू शकले असते.

  15. “कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ते किती भयंकर असणार, जेव्हा मी माझ्या चार उग्र शिक्षा; तलवार व दुष्काळ व जंगली जनावरे आणि मरी यरुशलेमविरुद्ध आणेन व त्यातील लोक व त्यांची जनावरे मारून टाकेन!

  16. तरीही त्यातून काही वाचतील; काही पुत्र व कन्या ज्यांना त्यातून बाहेर काढले जाईल. ते तुमच्याजवळ येतील आणि तुम्ही जेव्हा त्यांची वागणूक व त्यांची कृत्ये पाहाल, मी यरुशलेमवर आणलेल्या प्रत्येक अनर्थाविषयी तुम्ही सांत्वन पावाल.

  17. तुम्ही जेव्हा त्यांचे वर्तन व त्यांची कृत्ये पाहाल तेव्हा तुमचे सांत्वन होईल, कारण तुम्ही जाणाल की मी त्यात विनाकारण असे काहीही केले नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

  18. याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  19. “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जसे मी द्राक्षवेलीच्या लाकडाला वनातील इतर झाडांबरोबर अग्नीचे इंधन म्हणून दिले आहे, त्याचप्रमाणे यरुशलेमात राहणार्‍या लोकांशी मी वागेन.

  20. मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन. जरी ते अग्नीतून बाहेर आले, तरीही अग्नी त्यांना संपुष्टात आणेल. आणि जेव्हा मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन, तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  21. ते अविश्वासू आहेत म्हणून मी त्या देशाला ओसाड करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

  22. याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  23. आणि म्हण, ‘सार्वभौम याहवेह यरुशलेमास असे म्हणतात: तुझे पूर्वज व तुझा जन्म कनानी लोकांच्या देशातील आहे; तुझा पिता अमोरी आणि तुझी आई हिथी होती.

  24. “ ‘तेव्हा मी तिथून जाताना तुला तुझ्या रक्तात लोळताना पाहिले आणि तू तिथे तुझ्या रक्तात पडलेली असताना मी तुला म्हटले, “जिवंत राहा!”

  25. शेतातील रोपट्याप्रमाणे मी तुला वाढवले. तू वाढून मोठी होऊन वयात आलीस. तुझे स्तन विकसित झाले आणि तुझे केस वाढले, तरीही तू नग्नच होतीस.