मुख्य मजकुरावर जा

Elijah

92 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Elias

Elijah चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गिलआद येथील तिश्बे नगरातील उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीयाह तिश्बे अहाबाला म्हणाला, “याहवेह, इस्राएलचे जिवंत परमेश्वर ज्यांची मी सेवा करतो त्यांची शपथ, मी सांगितल्याशिवाय येणार्‍या काही वर्षांमध्ये दहिवर किंवा पाऊस पडणार नाही.”

  2. एलीयाह तिला म्हणाला, “भिऊ नकोस. घरी जा आणि तू म्हटल्याप्रमाणे कर. परंतु तुझ्याजवळ जे आहे त्यातून प्रथम माझ्यासाठी एक लहान भाकर बनव आणि माझ्याकडे आण आणि मग तुझ्यासाठी व तुझ्या मुलासाठी बनव.

  3. ती गेली आणि एलीयाहने तिला सांगितल्याप्रमाणे केले, म्हणून एलीयाह, आणि ती स्त्री व तिचे कुटुंब यांच्यासाठी रोज भोजन मिळत असे.

  4. एलीयाहद्वारे दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार भांड्यातील पीठ संपले नाही आणि तेलाची कुपी कोरडी झाली नाही.

  5. ती एलीयाहला म्हणाली, “अहो परमेश्वराच्या मनुष्या, तुम्ही माझ्याविरुद्ध आहात काय? माझ्या पापाची मला आठवण करून द्यायला व माझ्या मुलाला मारून टाकण्यास आला आहात काय?”

  6. याहवेहने एलीयाहची प्रार्थना ऐकली, आणि त्या मुलाचा जीव त्याच्यात परत आला आणि तो जिवंत झाला.

  7. मग एलीयाहने मुलाला उचलून त्या खोलीतून खाली आणले. त्याने त्याला त्याच्या आईच्या हाती दिले आणि म्हटले, “पाहा, तुझा मुलगा जिवंत आहे!”

  8. तेव्हा ती स्त्री एलीयाहला म्हणाली, “आता मला ठाऊक झाले की आपण परमेश्वराचे मनुष्य आहात आणि आपल्या मुखातील याहवेहचे वचन सत्य आहे.”

  9. काही काळानंतर, म्हणजे तिसऱ्या वर्षी याहवेहचे वचन एलीयाहकडे आले: “जा आणि अहाबाच्या समोर हजर हो, आणि मी देशावर पाऊस पाठवेन.”

  10. म्हणून एलीयाह अहाबासमोर हजर झाला. याकाळात शोमरोनामध्ये अतिशय तीव्र दुष्काळ पडला होता,

  11. ओबद्याह वाटेने चालत असता, त्याला एलीयाह भेटला. ओबद्याहने त्याला ओळखले व जमिनीकडे लवून त्याला दंडवत घालत म्हटले, “माझे स्वामी, एलीयाह ते आपणच आहात काय?”

  12. एलीयाह म्हणाला, “होय, जा, तुझ्या धन्याला सांग एलीयाह येथे आहे.”

  13. परंतु आता आपण मला सांगता त्याला जाऊन सांग, ‘एलीयाह येथे आहे.’

  14. आणि आता तुम्ही मला म्हणता, जाऊन माझ्या धन्याला मी सांगावे, ‘एलीयाह येथे आहे,’ तो मला मारून टाकील!”

  15. एलीयाह म्हणाला, “ज्या सर्वसमर्थ याहवेहची मी सेवा करतो त्या जिवंत परमेश्वराची शपथ, आज मी खचितच अहाबासमोर हजर होईन.”

  16. तेव्हा ओबद्याह अहाबाला भेटायला गेला आणि त्याला सांगितले आणि अहाब एलीयाहला भेटायला गेला.

  17. एलीयाहला पाहताच अहाब म्हणाला, “इस्राएलची छळणूक करणारा तो तूच आहेस काय?”

  18. एलीयाह लोकांच्या समोर जाऊन म्हणाला, “दोन मतांमध्ये तुम्ही कुठवर डगमगत राहणार? जर याहवेह हेच परमेश्वर आहे तर त्यांचे अनुसरण करा; परंतु जर बआल परमेश्वर आहे तर त्याला अनुसरा.” परंतु लोक काही बोलले नाही.

  19. मग एलीयाह त्यांना म्हणाला, “याहवेहचा संदेष्टा म्हणून मी एकटाच उरलो आहे, परंतु बआलाचे तर चारशे पन्नास संदेष्टे आहेत.

  20. एलीयाह बआलच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “प्रथम तुम्ही बैल निवडून घ्या आणि तो तयार करा, कारण तुम्ही संख्येने अधिक आहात. तुमच्या देवाचा धावा करा, परंतु अग्नी लावू नये.”

  21. मध्यान्हाच्या वेळी एलीयाह त्यांची थट्टा करीत म्हणू लागला, “अधिक मोठ्याने ओरडा, खचित तो देव आहे! कदाचित तो विचारात गढून गेला असेल किंवा व्यस्त किंवा प्रवास करीत असेल किंवा झोपला असेल आणि त्याला जागे केले पाहिजे.”

  22. तेव्हा एलीयाह सर्व लोकांना म्हणाला, “माझ्याजवळ या.” ते त्याच्याकडे आले आणि त्याने याहवेहची जी वेदी मोडून गेली होती ती दुरुस्त केली.

  23. “तुझे नाव इस्राएल असणार” असे याहवेहने ज्या याकोबाला म्हटले होते त्याच्या वंशजांच्या बारा गोत्रांइतके एलीयाहने बारा धोंडे घेतले.

  24. यज्ञाच्या वेळी, एलीयाह संदेष्टा पुढे आला आणि त्याने प्रार्थना केली: “हे याहवेह, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलच्या परमेश्वरा, आज हे जाहीर होवो की इस्राएलमध्ये केवळ तुम्हीच परमेश्वर आहात आणि मी तुमचा सेवक असून या सर्व गोष्टी मी आपल्या आज्ञेनुसार केल्या आहेत.

  25. मग एलीयाहने त्यांना आज्ञा दिली, “बआलच्या संदेष्ट्यांना पकडा, कोणालाही जाऊ देऊ नका!” तेव्हा त्यांनी पकडले आणि एलीयाहने त्यांना खाली किशोन ओहळाकडे नेऊन त्यांचा वध केला.