- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
पीडित व व्याकुळाची प्रार्थना
स्तोत्रसंहिता १०२:१-११
१
संकटसमयीच्या आक्रांत पुरुषाची अभ्यर्थना. तो अत्यंत उदास आहे आणि याहवेहच्या समोर स्वतःच्या हृदय-वेदनेचे वर्णन करीत आहे. हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका; माझी मदतीची विनवणी तुमच्यापर्यंत पोहचो.
२
मी संकटसमयात असता तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका. जेव्हा मी तुमचा धावा करेन तेव्हा मला त्वरेने उत्तर द्या; तुमचे कान माझ्याकडे लावा.
३
कारण माझे दिवस धुरासारखे विरून जात आहेत; माझ्या हाडांचा जळत्या कोळशासारखा दाह होत आहे.
४
माझे हृदय गवताप्रमाणे करपून व कोमेजून गेले आहे; अन्न सेवन करण्याचेही मला स्मरण होत नाही.
५
निराशेने आता अधिकच उच्चस्वरात कण्हत असून मी कातडी व हाडे यांचा सापळा झालो आहे.
६
ओसाड प्रदेशातील घुबडासारखा, भग्नावशेषातील घुबडासारखा मी झालो आहे.
७
मी जागाच राहतो. छपरावर एकाकी असणार्या पक्ष्यासारखा मी झालो आहे.
८
माझे शत्रू दिवसेंदिवस मला टोचून बोलतात; आणि माझा उपहास करणारे माझे नाव एखाद्या श्रापासारखे देतात.
९
मी अन्न म्हणून राख खात आहे; आणि माझे अश्रू माझ्या पेयात मिश्रित होतात,
१०
तुम्ही माझ्यावर क्रोधाविष्ट झाला आहात; कारण संतापाने तुम्ही मला उचलून फेकून दिले.
११
सायंकाळच्या सावलीप्रमाणे माझे आयुष्य वेगाने संपत आहे; मी गवताप्रमाणे वाळून जात आहे.
Settings