Skip to content
स्तोत्रसंहिता १०१:५-८

अधिकारी व नागरिकांसाठी मापदंड

स्तोत्रसंहिता १०१:५-८
५
आपल्या शेजार्‍यांची गुप्तपणे निंदानालस्ती करणार्‍यास, मी नष्ट करेन; दुसर्‍यांकडे तुच्छतेने पाहणार्‍याचा व अहंकारी हृदयाच्या मनुष्याचा सहवास मला असह्य वाटेल.
६
देशातील निष्ठावान लोकांवर मी माझी दृष्टी लावेन, जेणेकरून ते माझ्या सहवासात राहतील; ज्यांचे आचरण दोषरहित असेल, असेच लोक माझी सेवा करतील.
७
परंतु जे इतरांची फसवणूक करतात, अशांना मी माझ्या घरात राहू देणार नाही, आणि जे असत्य बोलतात, ते माझ्यापुढे उपस्थित राहणार नाहीत.
८
दररोज सकाळी मी आपल्या राज्यातील दुर्जनांना नष्ट करेन; याहवेह देवाच्या या नगरीतील प्रत्येक दुष्टाचा मी नायनाट करेन.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options