Skip to content
मत्तय २१:२८-३२

दोन मुलांचा दाखला

मत्तय २१:२८-३२

दोन मुलांचा दाखला

२८
“तुम्हाला काय वाटते? एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मोठ्या मुलाला म्हणाला, ‘मुला, आज द्राक्षमळ्यामध्ये जा व काम कर.’ ”
२९
मुलगा म्हणाला, “ ‘मी द्राक्षमळ्यात जाणार नाही,’ पण नंतर त्याने आपले मन बदलले आणि तो गेला.
३०
“मग पिता धाकट्या मुलालाही तसेच म्हणाला. मुलगा म्हणाला, ‘मी जातो, बाबा.’ पण तो गेलाच नाही.”
३१
मी विचारतो, “पित्यास जे पाहिजे होते ते या दोन मुलांपैकी कोणत्या मुलाने केले?” “वडील मुलाने,” त्या लोकांनी उत्तर दिले. मग येशू आपल्या दाखल्याचा खुलासा करीत म्हणाले, “मी खरे सांगतो, जकातदार लोक आणि वेश्या तुमच्या आधी परमेश्वराच्या राज्यात जात आहेत.
३२
कारण योहान नीतिमत्वाचा मार्ग दाखवित तुम्हाकडे आला, पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; उलट जकातदार लोक आणि वेश्यांनी तसे केले. हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेले असतानाही, तुम्ही पश्चात्ताप करण्याचे आणि विश्वास ठेवण्याचे नाकारले.

हे देखील पहा

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • लूक ७:२९

    जकातदारांसह सर्व लोकांनी येशूंचे हे शब्द ऐकले. परमेश्वराचे मार्ग न्याय्य आहेत, हे त्यांनी योहानाकडून पूर्वीच बाप्तिस्मा घेऊन मान्य केले होते.
    वचन ३१ मधून
  • लूक ७:३७

    येशू परूश्याच्या घरी भोजनास गेले आहेत हे ऐकून, त्या नगरातील एक पापी स्त्री मोलवान सुगंधी तेलाने भरलेली एक संगमरवरी कुपी घेऊन तिथे आली.
    वचन ३१ मधून
  • लूक ७:५०

    येशू त्या स्त्रीला म्हणाले, “तुझ्या विश्वासाने तुझे तारण झाले आहे; शांतीने जा.”
    वचन ३१ मधून
  • 1 करिंथकरांस १५:५८

    यास्तव, माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो, खंबीर व्हा आणि कशानेही विचलित होऊ नका. आपल्या स्वतःला पूर्णपणे प्रभूच्या कार्यात वाहून घ्या, कारण तुम्हाला माहीत आहे की प्रभूमध्ये तुमचे श्रम कधीही व्यर्थ होणार नाही.
    वचन २८ मधून
  • मत्तय ७:२१

    “जो कोणी मला, ‘प्रभूजी, प्रभूजी’ म्हणत राहतो, तो प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल असे नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल.
    वचन ३१ मधून
  • 1 करिंथकरांस १०:१५

    मी बुद्धिमान लोकांबरोबर बोलतो; मी जे तुम्हाला सांगत आहे त्याची पारख तुम्हीच करा.
    वचन २८ मधून
  • मत्तय २०:१

    “स्वर्गाचे राज्य एका जमीनदारासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यातील हंगामाचे पीक कापण्याकरिता मजूर शोधण्यासाठी अगदी सकाळीच बाहेर पडला.
    वचन २८ मधून
  • तीता १:१६

    ते परमेश्वराला ओळखतात असा दावा करतात, परंतु त्यांच्या कृत्याने ते चुकीचे सिद्ध होते. ते घृणास्पद, आज्ञा न पाळणारे आणि कोणत्याही चांगल्या कार्यासाठी अयोग्य आहेत.
    वचन ३० मधून
  • मार्क १३:३४

    हे एका दूरच्या प्रवासावर निघालेल्या मनुष्यासारखे आहे: तो आपले घर सोडतो, त्याच्या दासांना अधिकार देतो, प्रत्येकाला ज्याचे त्याचे काम वाटून देतो आणि तो परत येईपर्यंत बारकाईने लक्ष ठेवावे, असे द्वारपालाला सांगतो.
    वचन २८ मधून
  • यहेज्केल १८:२८

    त्याने केलेली आपली सर्व पापे लक्षात आणून त्यापासून तो वळला, म्हणून ती व्यक्ती खचितच वाचेल; आणि मरणार नाही.
    वचन २९ मधून
  • यहेज्केल १८:३२

    कारण कोणाच्याही मरणाने मला आनंद होत नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. पश्चात्ताप करा आणि जिवंत राहा!
    वचन २९ मधून
  • यहेज्केल ३३:३१

    नियमाप्रमाणे येतात तसे माझे लोक तुझ्याकडे येतात आणि तुझे वचन ऐकण्यासाठी तुझ्यासमोर बसतात, परंतु ते त्याप्रमाणे अनुसरण करीत नाहीत. ते मुखाने प्रीतीविषयी बोलतात, परंतु त्यांची हृदये अन्यायाने लाभ मिळविण्यासाठी लोभी आहेत.
    वचन ३० मधून

हे कोठे घडते

All Matthew Sites (Jerusalem)
All Matthew Sites (Jerusalem) View full PDF
Jesus' Final Return to Jerusalem in the Synoptic Gospels
Jesus' Final Return to Jerusalem in the Synoptic Gospels View full PDF
The Last Week of Jesus' Life (With Reference Table)
The Last Week of Jesus' Life (With Reference Table) View full PDF

Map © Biblica Open Bible Maps · CC BY-SA 4.0

Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options