- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
सिंहांच्या गुहेत दानीएल
दानीएल ६:१६-२४
सिंहांच्या गुहेत दानीएल
१६
तेव्हा राजाने हुकूम दिला आणि दानीएलला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. राजा दानीएलला म्हणाला, “ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस ते तुझी सुटका करो!”
१७
आणि एक मोठी शिळा आणण्यात आली आणि गुहेच्या तोंडावर ठेवली व राजाने आपल्या स्वतःच्या आणि अधिकार्यांच्या मुद्रांनी शिक्कामोर्तब केले, जेणेकरून दानीएलच्या परिस्थितीत कोणताच बदल करता येऊ नये.
१८
मग राजा आपल्या महालात परतला व काहीही जेवण न करता आणि कोणतीही करमणूक न करता त्याने संपूर्ण रात्र काढली आणि त्याला झोप येत नव्हती.
१९
राजा भल्या पहाटे उठला आणि लगबगीने सिंहांच्या गुहेकडे गेला.
२०
जेव्हा राजा गुहेच्या जवळ आला, त्याने दानीएलला मोठ्या दुःखाने त्याने हाक मारली. “दानीएला, दानीएला, जिवंत परमेश्वराच्या सेवका, ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस, त्यांनी तुला सिंहांपासून सोडविले आहे काय?”
२१
तेव्हा दानीएलने उत्तर दिले, “महाराज चिरायू असो!
२२
माझ्या परमेश्वराने आपले दूत पाठविले आणि त्याने सिंहांची तोंडे बंद केली. त्यांनी मला उपद्रव केला नाही. कारण मी त्यांच्या दृष्टीत निरपराधी आढळलो आहे. तसेच महाराज, मी तुमच्यासमोरही काही अपराध केलेला नाही.”
२३
तेव्हा राजा अतिशय आनंदित झाला आणि दानीएलला गुहेतून बाहेर काढण्याचा त्याने हुकूम सोडला. जेव्हा दानीएलला गुहेतून वर काढण्यात आले, तेव्हा त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती, कारण त्याने आपल्या परमेश्वरावर भरवसा ठेवला होता.
२४
नंतर राजाने आज्ञा केली त्याप्रमाणे दानीएलवर खोटे आरोप करणार्यांना पकडण्यात आले व त्यांच्या पत्नी व मुलांसहित त्या सर्वांना सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. आणि ते गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच सिंहांनी प्रबळ होऊन झेप घातली आणि त्यांच्या सर्व हाडांचे तुकडे केले.
या उताऱ्यात
- कोण
- कोठे
- केव्हा
- About
हे देखील पहा
शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.
2 तीमथ्य ४:१७
परंतु प्रभू माझ्याजवळ उभे राहिले आणि धैर्याने माझ्या संपूर्ण संदेशाची घोषणा व्हावी व ती सर्व गैरयहूदीयांनी ऐकावी म्हणून त्यांनी मला संधी दिली. सिंहापुढे टाकले जाण्यापासून मला सोडविले.वचन २२ मधूनइब्री ११:३३
विश्वासाद्वारे या सर्व लोकांनी राज्ये जिंकली, न्यायीपणाने सत्ता गाजवली व वचनफळ प्राप्त केले; सिंहाची तोंडे बंद केली;वचन २२ मधूनस्तोत्रसंहिता ३७:३९
याहवेहद्वारे नीतिमानांचे तारण होते. संकटकाळी ते त्यांचे आश्रयदुर्ग असतात.वचन १६ मधूनस्तोत्रसंहिता ३७:४०
याहवेह त्यांचे साहाय्य करतात आणि त्यांना मुक्त करतात; दुष्टांपासून सुटका करून त्यांचे रक्षण करतात, कारण त्यांनी याहवेहचा आश्रय घेतला आहे.वचन १६ मधूनइय्योब ५:१९
सहा संकटातून ते तुला वाचवतील; आणि सातव्यात तुम्हाला कोणतेही अनिष्ट स्पर्श करणार नाही.वचन १६ मधूनप्रेषित १२:११
पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला निश्चित कळून आले की प्रभूने त्यांचा देवदूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहूदी लोक ज्या गोष्टींची अपेक्षा करीत होते त्यापासून मला सोडविले आहे.”वचन २२ मधूनस्तोत्रसंहिता ९१:१४
याहवेह म्हणतात, “तो मजवर प्रीती करतो, म्हणून मी त्याला सोडवेन, त्याचे रक्षण करेन, कारण त्याने माझा नामाधिकार मान्य केला आहे.वचन १६ मधूनस्तोत्रसंहिता ९१:१६
दीर्घायुष्य देऊन मी त्याला तृप्त करेन, आणि त्याला माझ्या तारणाचा अनुभव घडवेन.”वचन १६ मधूनस्तोत्रसंहिता ९१:११
कारण ते आपल्या स्वर्गदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देतील, म्हणजे तू जाशील तिथे तुझे रक्षण व्हावे.वचन २२ मधूनस्तोत्रसंहिता ९१:१३
तू सिंह आणि नागाला चिरडशील; भयंकर सिंहाला व सर्पाला तू आपल्या पायाखाली तुडवशील.वचन २२ मधूनप्रेषित २४:१६
यामुळेच मी परमेश्वरासमोर आणि मनुष्यासमोर माझी विवेकबुद्धी सतत स्वच्छ ठेवण्यासाठी खूप कष्ट घेतो.वचन २२ मधूनदानीएल ३:२८
तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, “शद्रख, मेशख व अबेदनगोचे परमेश्वर धन्यवादित असो. ज्यांनी राजाची आज्ञा मोडून आपल्या परमेश्वराशिवाय अन्य दैवतांची सेवा किंवा उपासना करावयाची नाही असे ठरवून मरण पत्करले, तेव्हा त्याने आपला दिव्यदूत पाठवून आपल्या विश्वासू सेवकांची सुटका केली.वचन १६ मधून
हे कोठे घडते

अभ्यास टीप
Settings