Skip to content
प्रेषित २७:१-८

रोमला जाण्यासाठी पौलाचा प्रवास सुरू

प्रेषित २७:१-८

रोमला जाण्यासाठी पौलाचा प्रवास सुरू

आम्ही इटलीस तारवातून जावे असे ठरले, तेव्हा पौल आणि इतर काही बंदिवानांना बादशाही रक्षकांच्या फलटणीतील यूल्य नावाच्या शताधिपतीच्या ताब्यात देण्यात आले.
तेव्हा आशियाच्या प्रांतातील किनार्‍यावरील अनेक बंदरावर थांबत जाणार्‍या व अद्रमुत्तीय शहरापासून निघालेल्या जहाजात बसून आम्ही समुद्राकडे निघालो, तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीका येथील रहिवासी अरिस्तार्ख नावाचा एक मनुष्य आमच्याबरोबर होता.
दुसर्‍या दिवशी आम्ही सीदोन बंदरात पोहोचलो; तेव्हा यूल्याने प्रेमाने पौलाला किनार्‍यावर उतरून मित्रांकडे जाण्याची परवानगी दिली म्हणजे त्याच्या मित्रांद्वारे त्याच्या गरजा भागविल्या जातील.
तिथून आम्ही पुन्हा समुद्र प्रवासास निघाल्यावर तोंडासमोर वारा येत असल्यामुळे सायप्रसच्या उत्तरेला असलेले बेट आणि मुख्य भूमी यांच्यामधून गेलो.
आम्ही समुद्राची यात्रा करून किलिकिया व पंफुल्या या प्रांतांच्या किनार्‍याने जाऊन लुक्यातील मूर्या येथे जाऊन पोहोचलो.
तिथे शताधिपतीला इटलीस जाणारे आलेक्सांद्रियाचे तारू सापडले तेव्हा त्याने आम्हाला त्या तारवात बसविले.
मग पुष्कळ दिवस आम्हाला मंद गतीने प्रवास करावा लागला आणि शेवटी आम्ही कनीदस बंदराजवळ आलो. वारा अद्याप तोंडासमोर येत असल्यामुळे क्रेताला वळसा घालून सलमोने शहराकडे जावे लागले.
पुढे वादळी वार्‍यातून मोठ्या प्रयासाने हळूहळू मार्ग काढीत दक्षिणेकडील किनार्‍याने आम्ही सुंदर बंदर जे लसया शहराच्या जवळ होते तिथे आलो.

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • प्रेषित २५:२५

    माझ्या मते त्याने मृत्युदंडास योग्य असे काहीही केलेले नाही, परंतु त्याने बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला रोम या ठिकाणी पाठविण्याचे मी ठरविले आहे.
    वचन १ मधून
  • प्रेषित २४:२३

    त्याने शताधिपतीला हुकूम केला की, पौलावर पहारा ठेवावे परंतु त्याला थोडीफार स्वतंत्रता दिली जावी आणि त्याच्या मित्रांना त्याची सेवा करण्याची अधिकृत परवानगी द्यावी.
    वचन १ मधून
  • प्रेषित १०:१

    कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा एक मनुष्य, जो इटलीच्या पलटणीचा शताधिपती होता.
    वचन १ मधून
  • प्रेषित २५:१२

    त्यावर फेस्ताने आपल्या सल्लागारांची मसलत घेऊन जाहीर केले, “ठीक आहे. तू कैसराजवळ न्यायाची याचना केली आहेस, तर तू कैसरापुढेच जाशील!”
    वचन १ मधून
  • प्रेषित २८:११

    तीन महिन्यानंतर आलेक्सांद्रियाचे जहाज हिवाळ्यासाठी थांबले होते त्याने आम्ही प्रवास सुरू केला. त्यावर त्याची निशाणी क्यास्टर व पोलक या जुळ्या दैवतांची मूर्ती बसवलेली होती.
    वचन ६ मधून
  • प्रेषित १८:२

    तिथे त्याला पोनतस गावाचा अक्विला नावाचा एक यहूदी भेटला, तो त्याची पत्नी प्रिस्किल्लाला घेऊन इटली देशातून काही दिवसांपूर्वीच तिथे आलेला होता. कारण रोममधून सर्व यहूदी लोकांनी निघून जावे, अशी क्लौडियस सीझरने आज्ञा केली होती. पौल त्यांच्या भेटीला गेला,
    वचन १ मधून
  • प्रेषित २७:११

    परंतु शताधिपतीने, पौलाच्या सूचनेपेक्षा तांडेल व तारवाचा कप्तान यांचा सल्ला स्वीकारला.
    वचन १ मधून
  • प्रेषित २८:१६

    पुढे आम्ही रोममध्ये आल्यानंतर, पौलाला एकटे राहण्याची परवानगी देण्यात आली, मात्र पहारा करणारा एक सैनिक त्याच्याबरोबर असे.
    वचन १ मधून
  • प्रेषित १९:२९

    लवकरच संपूर्ण शहरात एकच गोंधळ माजला. पौलाचे प्रवासातील सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख, यांना लोकांनी अटक केली आणि त्यांना नाटकगृहाकडे ओढून नेले.
    वचन २ मधून
  • प्रेषित ६:९

    परंतु लिबेर्तिन (असे ज्यास म्हणत होते त्या) सभागृहातील काही सभासद, कुरेनेकर, आलेक्सांद्रेयकर आणि किलिकिया व आशिया प्रदेशातील यहूदी लोक स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले.
    वचन ५ मधून
  • प्रेषित २७:२१

    अनेक दिवस कोणी काहीही खाल्ले नव्हते, मग शेवटी पौल उभा राहून त्यांना म्हणाला: “माणसांनो, तुम्ही माझा सल्ला ऐकून क्रेता बंदर सोडले नसते, तर हे नुकसान व हानी टळू शकली असती.
    वचन ७ मधून
  • प्रेषित २७:४३

    परंतु पौलाला वाचवावे अशी या शताधिपतीची इच्छा होती आणि म्हणून त्याने ती योजना मान्य केली नाही. मग त्याने हुकूम दिला की ज्यांना पोहता येत असेल, त्यांनी पहिल्याने उडी टाकून काठास जावे.
    वचन १ मधून
Paul's Journey to Rome (Part 1)
Paul's Journey to Rome (Part 1) View full PDF
Acts 27:1-7
Acts 27:1-7 View full PDF
All Acts Sites (Eastern Mediterranean)
All Acts Sites (Eastern Mediterranean) View full PDF

Map © Biblica Open Bible Maps · CC BY-SA 4.0

Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options