Skip to content
1 इतिहास ११:११-१९

1 इतिहास ११:११-१९

११
दावीदाच्या पराक्रमी योद्ध्यांची नावे: हखमोनी याशबआम हा दावीदाच्या सैन्यातील पहिल्या श्रेणीच्या वीरांपैकी होता; त्याने भाला उगारून एका हल्ल्यात तीनशे लोकांचा वध केला.
१२
त्याच्यानंतर अहोहचा रहिवासी, दोदोचा पुत्र एलअज़ार होता, तो तीन पराक्रमी योद्ध्यांपैकी एक होता.
१३
पस-दम्मीम येथे पलिष्ट्यांबरोबर केलेल्या लढाईत तो दावीदाबरोबर होता. तो जवाच्या शेतात असताना इस्राएली सैन्याने पलिष्ट्यांपुढून पळ काढला होता.
१४
परंतु ते त्या शेताच्या मध्यभागी उभे राहिले, त्यांनी सामना केला आणि पलिष्ट्यांना मारून टाकले आणि याहवेहने त्या दिवशी मोठा विजय मिळवून दिला.
१५
जेव्हा पलिष्ट्यांच्या टोळीने रेफाईमच्या खोर्‍यात छावणी दिली होती तेव्हा तीस मुख्य सेनापती योद्ध्यांपैकी तिघे जण दावीदाकडे अदुल्लाम गुहेतील खडकाकडे आले.
१६
त्यावेळी दावीद गडावर होता आणि पलिष्टी सेना बेथलेहेम नगरात होती.
१७
दावीदाला पाणी पिण्याची उत्कट इच्छा झाली व तो म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे झाले असते!”
१८
तेव्हा या तीन पराक्रमी योद्ध्यांनी पलिष्ट्यांच्या छावणीमधून घुसून, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी काढून दावीदाकडे आणले. परंतु दावीदाने ते पिण्याचे नाकारले; आणि ते याहवेहसमोर ओतले.
१९
त्याने म्हटले, “परमेश्वर न करो मला ते करावे लागेल. ज्या पुरुषांनी ते आपला जीव धोक्यात घालून आणले त्यांचे रक्त मी प्यावे काय?” कारण ते आणण्यासाठी त्यांनी त्यांचा जीव धोक्यात घातला होता. त्यामुळे दावीद ते पाणी प्याला नाही. अशी साहसी कामे त्या तीन पराक्रमी योद्ध्यांनी केली होती.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options