Skip to content
1 इतिहास ११:१०-१४

1 इतिहास ११:१०-१४

१०
दावीदाच्या काही अत्यंत शूर योद्ध्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत—याहवेहच्या कराराप्रमाणे या योद्ध्यांनी इस्राएली पुढार्‍यांसह राज्याची वाढ करण्यासाठी त्याला मजबूत आधार दिला.
११
दावीदाच्या पराक्रमी योद्ध्यांची नावे: हखमोनी याशबआम हा दावीदाच्या सैन्यातील पहिल्या श्रेणीच्या वीरांपैकी होता; त्याने भाला उगारून एका हल्ल्यात तीनशे लोकांचा वध केला.
१२
त्याच्यानंतर अहोहचा रहिवासी, दोदोचा पुत्र एलअज़ार होता, तो तीन पराक्रमी योद्ध्यांपैकी एक होता.
१३
पस-दम्मीम येथे पलिष्ट्यांबरोबर केलेल्या लढाईत तो दावीदाबरोबर होता. तो जवाच्या शेतात असताना इस्राएली सैन्याने पलिष्ट्यांपुढून पळ काढला होता.
१४
परंतु ते त्या शेताच्या मध्यभागी उभे राहिले, त्यांनी सामना केला आणि पलिष्ट्यांना मारून टाकले आणि याहवेहने त्या दिवशी मोठा विजय मिळवून दिला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options