मुख्य मजकुरावर जा

Women बद्दल बायबलमधील वचने

304 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यावेळी याजकाने त्या स्त्रीस शपथ देऊन या शापाखाली आणावे—जेव्हा याहवेह तुझ्या उदराचा गर्भपात करेल आणि तुझे पोट फुगेल, तेव्हा याहवेह तुला तुझ्या लोकांमध्ये शापित करो.

  2. शाप देणारे हे पाणी तुझ्या शरीरात जावो, म्हणजे तुझे पोट फुगेल किंवा तुझा गर्भपात होईल.” “ ‘मग त्या स्त्रीने म्हणावे, “आमेन. असेच होवो.”

  3. “ ‘तेव्हा याजकाने हे शापाचे शब्द एका गुंडाळीवर लिहून ते शब्द त्या कडू पाण्यात धुवावे.

  4. ज्या पाण्यापासून शाप येईल ते कडू पाणी त्याने तिला प्यायला द्यावे आणि हे पाणी जे शाप व कडवट कष्ट आणते ते तिच्यात प्रवेश करेल.

  5. याजकाने ते मत्सराचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व याहवेहस ओवाळत ते वेदीकडे आणावे.

  6. त्या अन्नार्पणाचे प्रतीक म्हणून याजकाने त्या अर्पणातील मूठभर अन्न घेऊन ते वेदीवर जाळावे; व त्यानंतर त्याने ते पाणी त्या स्त्रीला प्यायला द्यावे.

  7. जर ती आपल्या पतीशी अविश्वासू राहून तिने स्वतःला भ्रष्ट केले असेल, तर त्याचा परिणाम असा असेल: जेव्हा तिला ते शाप आणि कडवट कष्ट आणणारे पाणी पाजले जाईल, ते तिच्या शरीरात जाईल, तिचे पोट फुगेल आणि तिचे उदर गर्भपात करेल आणि ती शापित होईल.

  8. पण त्या स्त्रीने जर स्वतःला भ्रष्ट केलेले नाही आणि ती शुद्ध असेल, तर ती निर्दोष ठरविली जाईल आणि तिला मुलेबाळे होतील.

  9. “ ‘जेव्हा एखादी स्त्री तिच्या पतीशी विवाहित असतानाही स्वतःला भ्रष्ट करते तेव्हा हा मत्सराचा नियम असावा,

  10. किंवा जेव्हा एखाद्या पुरुषाच्या मनात मत्सराची भावना येते, कारण तो आपल्या पत्नीवर संशय घेतो, याजकाने तिला याहवेहसमोर उभे करावे आणि हा संपूर्ण नियम तिला लागू करावा.

  11. तिचा पती कोणत्याही अन्यायापासून निर्दोष असेल, परंतु ती स्त्री आपल्या पापाचे परिणाम भोगेल.’ ”

  12. “एखादी स्त्री अजूनही आपल्या पित्याच्या घरात राहून याहवेहस नवस करते किंवा वचन देऊन स्वतःला बांधील करते

  13. आणि तिचा नवस किंवा शपथ याविषयी तिच्या पित्याने ऐकले आणि तिला काही बोलला नाही, तर ते वचन तिच्यावर कायम राहील.

  14. परंतु ते ऐकून त्याने तिला मना केले तर तिचे नवस व शपथ यापैकी कोणतेही कायम राहणार नाही; कारण तिच्या पित्याने तिला मनाई केली, म्हणून याहवेह तिला क्षमा करतील.

  15. “तिने नवस केल्यावर किंवा तिच्या ओठांनी अविचाराने शपथ उच्चारली व स्वतःला बांधील केल्यानंतर जर तिने विवाह केला

  16. आणि तिच्या पतीने त्याविषयी ऐकले आणि तिला काही बोलला नाही, तर तिचे नवस किंवा शपथ ज्याने तिने स्वतःला बांधील केले ते तिच्यावर कायम राहील.

  17. पण त्याविषयी ऐकून जर तिच्या पतीने तिला मनाई केली, तर ज्या नवसाने व शपथेने तिने स्वतःला बांधील करून घेतले आहे, ते तो रद्द करतो व याहवेह तिला क्षमा करतील.

  18. “विधवा किंवा घटस्फोट झालेली स्त्री शपथेने किंवा नवसाने स्वतःला बांधील करून घेते, तर ते तिच्यावर कायम राहील.

  19. “आपल्या पतीबरोबर राहून एखादी स्त्री जर नवस करते किंवा स्वतःला बांधील करून शपथ घेते

  20. आणि तिचा पती त्याविषयी ऐकून तिला काही बोलत नाही किंवा तिला मनाई करीत नाही, तर ज्या नवसांनी व शपथांनी तिने स्वतःला बांधील करून घेतले आहे ते कायम राहतील.

  21. पण त्याविषयी ऐकून जर त्याने ते रद्द केले, तर तिच्या मुखातून आलेले कोणतेही नवस किंवा शपथ कायम राहणार नाहीत. तिच्या पतीने ते रद्द केले आहेत आणि याहवेह तिला क्षमा करतील.

  22. तिचा पती तिने केलेला नवस किंवा स्वतःचा त्याग करण्यासाठी घेतलेली शपथ कायम करेल किंवा रद्द करेल.

  23. पण रोजच्यारोज जर तिचा पती त्याविषयी तिला काहीही बोलत नाही, तर तिने केलेले सर्व नवस व शपथ ज्यांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले आहे ते तो कायम करतो. तो काहीही बोलला नाही म्हणून तिने केलेले नवस तो कायम करतो.

  24. पण ते ऐकल्यानंतर काही काळाने जर त्याने ते रद्द केले, तर तिचा दोष त्याला भोगावा लागेल.”

  25. पुरुष व त्याची पत्नी, यांच्यामधील नाते व पिता व त्याची तरुण मुलगी जी अजूनही त्याच्या घरात राहते यांच्यामधील नाते याविषयी याहवेहने मोशेला दिलेले नियम ते हे आहेत.