Skip to content

Virgin बद्दल बायबलमधील वचने

35 वचने · 10 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पण जर तिच्या वडिलांनी ती त्याला देण्यास नाकारले, तरीही त्याने कुमारिकेची वधूकिंमत द्यावी.

  2. त्याने विधवा, घटस्फोटित किंवा वेश्यावृत्तीने भ्रष्ट झालेल्या स्त्रीसह विवाह करू नये, परंतु त्याने त्याच्या स्वतःच्याच वंशातील कुमारिकेशी विवाह करावा,

  3. एखाद्या पुरुषाने पत्नी केली आणि तिच्याशी समागम केल्यानंतर ती त्याला आवडेनाशी झाली

  4. आणि तिची निंदा केली आणि तिच्या नावाची बदनामी करून म्हटले, “मी या स्त्रीसोबत लग्न केले, पण जेव्हा मी तिच्याजवळ गेलो तेव्हा तिच्यात मला कौमार्याबद्दलचा पुरावा आढळला नाही,”

  5. तर मुलीच्या आईवडिलांनी तिच्या कौमार्याबद्दलचा पुरावा, त्या नगराच्या वेशीत वडील मंडळीपुढे साजरा करावा.

  6. तिच्या वडिलांनी त्यांना असे सांगावे, “मी माझी कन्या या मनुष्याला त्याची पत्नी व्हावी म्हणून दिली, परंतु आता ती त्याला आवडत नाही.

  7. आता त्याने तिची निंदा केली आणि म्हणाला, ‘मला तुमच्या कन्येमध्ये कौमार्याबद्दलचे पुरावे आढळले नाही.’ पण हे पाहा आमच्या कन्येच्या कौमार्याबद्दलचा पुरावा.” मग तिच्या आईवडिलांनी ते वस्त्र नगराच्या वडीलांपुढे सादर करावे,

  8. आणि मग नगरातील वडील मंडळीने त्या पुरुषाला घ्यावे आणि त्याला शिक्षा द्यावी.

  9. शंभर चांदीची नाणी दंडादाखल त्याच्याकडून वसूल करावी आणि मुलीच्या वडिलांना द्यावीत, कारण त्या तरुणाने एका इस्राएली कुमारिकेची बदनामी केली. ती त्याची पत्नी म्हणून राहील; तो जिवंत असेपर्यंत त्याने तिला कदापि घटस्फोट देऊ नये.

  10. परंतु आरोप सत्य असल्यास आणि तिच्या कौमार्याबद्दलचा पुरावा आढळला नाही,

  11. तर मात्र नगराच्या वडिलांनी त्या कन्येला तिच्या वडिलांच्या घराच्या दारापर्यंत न्यावे व तिथे नगरातील लोकांनी तिला मरेपर्यंत धोंडमार करावी. आपल्या आईवडिलांच्या घरात राहत असताना, व्यभिचारिणी होऊन तिने इस्राएलात घृणास्पद कृत्य केले आहे. अशा रीतीने तुमच्यामधील दोष काढून टाकण्यात यावे.

  12. ज्या कुमारिकेचा वाङ्निश्चय झालेला आहे, अशा कुमारिकेला जर एखाद्या नगरात एखाद्या पुरुषाने भ्रष्ट केले,

  13. तर त्या दोघांनाही नगराच्या वेशीच्या बाहेर घेऊन जावे आणि मरेपर्यंत धोंडमार करावा—त्या कुमारिकेला अशासाठी की नगरात असताना तिने मदतीसाठी आरडाओरडा केला नाही आणि त्या पुरुषाला अशासाठी की त्याने दुसर्‍या पुरुषाच्या स्त्रीला भ्रष्ट केले. अशा रीतीने तुमच्यामधून कलंक दूर करून शुद्ध करावे.

  14. परंतु माझी एक विनंती मान्य करा,” ती म्हणाली. “मला माझ्या सख्यांबरोबर दोन महिने डोंगरावर फिरू द्या आणि माझा विवाह कदापि होणार नाही, याबद्दल शोक करू द्या.”

  15. त्यावर तो म्हणाला, “ठीक आहे, तू जाऊ शकते.” त्याने तिला दोन महिन्यांसाठी जाऊ दिले. ती आणि तिच्या सख्या डोंगरावर गेल्या आणि तिचा विवाह कदापि होणार नाही, याबद्दल शोक केला.

  16. दोन महिन्यानंतर ती आपल्या पित्याकडे परत आली आणि त्याने नवस केल्याप्रमाणे तिच्यासोबत केले आणि ती कुमारिका होती. त्यानंतर इस्राएली लोकांमध्ये प्रथा पडली,

  17. तेव्हा त्याच्या सेवकाने तिला बाहेर काढले आणि तिच्यामागे दार बंद केले. राजाच्या कुमारी कन्या घालत असत त्याप्रकारचा पायघोळ झगा तिने घातला होता.

  18. म्हणून प्रभू स्वतः तुम्हाला एक चिन्ह देतील: कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.

  19. सीयोनकडे जाणारे रस्ते विलाप करीत आहेत, निर्धारित सणाला तिच्याकडे कोणीही येत नाही. तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत, तिचे याजक कण्हत आहेत, तिच्या तरुणी शोकग्रस्त आहेत, आणि तिला अत्यंत पीडा होत आहे.

  20. सीयोनकन्येचे वडीलजन मूकपणे जमिनीवर बसले आहेत; त्यांनी मस्तकांवर धूळ शिंपडून घेतली आहे आणि त्यांनी गोणपाट नेसले आहे. यरुशलेमच्या तरुणींनी माना खाली घातल्या आहेत.

  21. “कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील” (इम्मानुएलचा अर्थ “परमेश्वर आम्हाबरोबर”).

  22. “त्यावेळी स्वर्गाचे राज्य, आपआपले दिवे घेऊन वराला सामोर्‍या जाणार्‍या दहा कुमारींसारखे होईल.

  23. त्यांच्यापैकी पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या.

  24. मूर्ख कुमारींनी दिव्यांबरोबर आपले तेल घेतले नाही.

  25. शहाण्यांनी मात्र दिव्यांबरोबरच आपआपल्या कुपीत तेलही घेतले.